अतिक्रमण कारवाई थांबवा! : महापौरांचे प्रशासनाला आदेश : पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने

Categories
PMC पुणे
Spread the love

अतिक्रमण कारवाई थांबवा!

: महापौरांचे प्रशासनाला आदेश

: पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने

पुणे: कोरोनामुळे पथारी व्यावसायिक अडचणीत सापडले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे.  दुकाने सील केले जात असल्याच्या विरोधात पथारी व्यावसायिकांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेपुढे निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. सणासुदीचे दिवस असल्याने सध्या अतिक्रमण कारवाई थांबवा. असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

: आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी

पथारी व्यावसायिक पंचायतीतर्फे निदर्शने करण्यात आली. शहराच्या विविध भागात अतिक्रमणाची कारवाई व पोलिस कारवाई सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थचक्र थंडावले आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील रस्ता विक्रेते , परवाना धारक , हातगाडीवाले , पथारी ,स्टॉलधारक व्यवसाय सावरत असताना अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.गणपती, गौरी यासह इतर सण येत असताना यातून पथारी व्यवसायिकांना सावरण्याची संधी मिळत आहे, पण महापालिकेचे धोरणांमुळे पुन्हा अडचणीत येत आहेत. याबाबत शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी केली. याबाबत सर्व खाते प्रमुखांसोबत बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन दिले. तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही सध्या कारवाई करू नये, चर्चा करून तोडगा काढू असे आदेश प्रशासनाला दिले. इकबाल आळंद, मोहन चिंचकर,प्रदीप पवार, संगीता चव्हाण, बारिकराव चव्हाण, हरिभाऊ बिरादार, जब्बार शेख, रमेश अडसूळ ,रवींद्र हुले, सुनंदा घाणेकर, निलम अय्यर हजर होते उपस्थित होते.
पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे म्हणाले, उपायुक्त माधव जगताप यांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. परवाना धारक पथारी वर कारवाई करणे योग्य नाही. त्यामुळे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेपुढे निदर्शने करण्यात आली. आयुक्तांशी व महापौरांशी बाबा आढाव यांनी फोनवरून संपर्क साधून कारवाई थांबविण्याची मागणी केली. आयुक्तांनी गुरुवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. महापौरांनी कारवाई थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेकडे  गाऱ्हाणे मांडले आहे. आमचे म्हणणे एकच आहे, की आम्हाला सन्मानाने वागू दिले पाहिजे. अतिक्रमण कारवाई थांबवावी म्हणून महापालिकेकडे मागणी केली आहे, तरीही कारवाई सुरू राहिली तर रोज एका आमदाराच्या घरावर मोर्चा काढू.

-डॉ. बाबा आढाव, कामगार नेते.

Leave a Reply