तुघलकी कारभार बंद करा! : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले

Categories
PMC पुणे
Spread the love
तुघलकी कारभार बंद करा!
: विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले
पुणे. शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित केले होते.  याचे पडसाद शहरभर उमटू लागले होते. नागरिक व व्यापारी वर्गातून याचा विरोध केला जाऊ लागला. त्यामुळे महापालिकेने आपल्या पहिल्या आदेशात बदल केला आहे. 10 लाखाचे उद्दिष्ट्य, नजरचुकीने लिहिले गेले होते, असे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेशात म्हटले आहे. यावर महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले आहे. तुघलकी कारभार बंद करा. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.
टॅक्स वसुली करण्यावर भर द्या 
याबाबत धुमाळ म्हणाल्या कि, कोरोना काळात सर्वच व्यावसायिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. पथारी व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे.  गोरगरिबांना जगण्याची भ्रांत असताना दैनंदिन 10 लाख दंड सक्तवसुली चे आदेश काढणे कितपत योग्य आहे?धुमाळ पुढे म्हणाल्या की, महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मिळकत  कर वसूल करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच ज्या मिळकतीवर टॅक्स लावला नाही त्या शोधून टॅक्स लावला पाहिजे. खर्चात बचत म्हणजे देखील उत्पन्न असते.
कोट्यवधी चे टेंडर रिंग न करता कसे होतील यावर जरी भर दिला तरी करोडो रुपये वाचणार आहेत. कामे न करता बिले देने यावर लक्ष दिले पाहिजे. पण सत्ताधारी यांच्या दबावाने मोठे घोटाळे करायचे आणि मग गोरगरिबांना नाहक त्रास द्यायचा असला तुघलकी कारभार बंद करा. पुणेकर येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील. असे ही धुमाळ म्हणाल्या.

Leave a Reply