24*7 water project : 24*7 योजनेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

24*7 योजनेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे

: महापालिका आयुक्तांनी घेतला योजनेचा आढावा

पुणे : शहरात पाणी समस्येवरून बराच गदारोळ सुरु आहे. समान पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे ही समस्या निर्माण होत आहे. कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला होता. शिवाय महापालिका आयुक्तांच्या घरी देखील दौरा केला होता. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले होते कि समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 योजनेचे काम मार्गी लागण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली जाईल. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती केली आहे. शिवाय योजनेच्या कामाचा आढावा देखील आयुक्तांनी सोमवारी घेतला.

: 7 टाक्यांचे काम भूसंपादन अभावी रखडले

महापालिकेच्या वतीने शहरात नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा, याकरिता 24*7 योजना हाती घेतली आहे. 2018 सालापासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र योजनेचे काम अधुरे आहे. याअंतर्गत 82 पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. त्यातील काहीँचे काम पूर्ण झाले आहे, तर काही अधुऱ्या आहेत. जवळपास 7 टाक्यांचे काम भू संपादन अभावी रखडले आहे. यामध्ये एफ सी रोड, बिशप स्कुल, मुंबई पुणे रोड, चिखलवाडी अशा विभिन्न जागांचा समावेश आहे.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या योजनेचा आढावा घेतला. तसेच अतिरिक्त आयुक्त यांना निर्देश दिले कि योजनेचा वेळोवेळी आढावा घ्या आणि योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. तसेच नागरिकांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यास देखील सांगण्यात आले.

: राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पाणीपुरवठा अधिकाऱ्याची भेट

दरम्यान राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समान पाणीपुरवठा योजनेचा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खुलासा करण्याची मागणी केली. शिवाय नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले.

Leave a Reply