PMC : Ravindra Binwade : कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त  : महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त

: महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

: ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

पुणे : कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने पीएमपी चे कर्मचारी कोरोनाच्या विविध कामासाठी नियुक्त केले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना काम कमी आहे. याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

: कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नियुक्त केले होते कर्मचारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्याला तोंड देण्यासाठी पालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले.  क्वारंटाईन रूमपासून विविधकक्षांवर  प्रशासनाची देखरेख होती.  त्याचबरोबर सर्वेक्षणाचे कामही सुरू होते.  त्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  त्यानंतर पीएमपीचे कर्मचारीही या कामात गुंतले होते.  शहरात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रयत्न केले जात होते.  महामंडळाने आपल्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.  यामध्ये क्वारंटाईन रूम आणि आयसोलेशन रूममध्ये काम करणे, सर्वेक्षण करणे, कोरोनाच्या कामाचा अहवाल देणे, निवारागृहांमध्ये काम करणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांबाबत जनजागृती करणे, अशा कामांचा समावेश आहे.  त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांना काम दिले आहे.  यामध्ये पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम कमी आहे.  याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आपल्या मूळ कामावर रुजू होण्याचे आदेश या कर्मचाऱ्याना देण्यात आले आहेत.  महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

Leave a Reply