मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता (DA) देण्याबाबतचे परिपत्रक जारी
| फरकासह महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार
पुणे | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (Dearness Allowance) अदा करण्यात येतो. 1 जुलै पासून महागाई भत्ता 4% ने वाढवून तो 38% इतका करण्यात आला आहे. त्यानुसार मनपा कर्मचाऱ्यांनाही (PMC Pune employess) याचा लाभ मिळणार आहे. याला आयुक्तांनीही मंजूरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक (Circular) येणे बाकी होते. मुख्य वित्त व लेखा विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा लाभ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबर (November paid in December) च्या वेतनात मिळेल. असे महापालिका प्रशासनाकडून (PMC Official) सांगण्यात आले. तर सेवानिवृत्त सेवकांना डिसेंबर पेड इन जानेवारी च्या वेतनात अदा होईल.
पुणे महानगरपालिका अधिकारी / सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे. केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मनपा मुख्य सभा ने २३.१२.१९७७ ला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०२२ पासुन ३४% दराने महागाई भत्ता आदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ३४% वरून ४% ने वाढवून ३८% इतका करण्यात आलेला आहे. (Pune Municipal corporation)
महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ४% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ३८% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस महापालिका आयुक्त यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (circular of DA)

