Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून भ्रष्टाचार

| कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप

मनपाच्या बहुतांशी सर्व विकासकामांवर दर्जा तपासणीसाठी ई आय एल या संस्थेची नेमणूक वादग्रस्त रित्या प्रशासनाने केलेली आहे. सदर नेमणूक ही आयुक्तांचे  परिपत्रकाशी पूर्णतः विसंगत आहे सदर परिपत्रकानुसार आयुक्तांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षा साठी त्रयस्थ संस्थेची निवड केवळ निविदा पद्धतीने काढण्यास मान्यता दिलेली होती. मात्र मनपा च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयुक्तांची दिशाभूल करून तब्बल 2500 कोटींच्या विकासकामे दर्जा तपासणी काम EIL यांना विना टेंडर विना स्पर्धा दिलेले आहे .तसेच त्रयस्थ संस्थेची निवड मान्यतेनुसार केवळ 2 वर्षा करिता करणे अपेक्षित असताना प्रशासनाने ही निवड 5 वर्षांकरता केलेली आहे. असा आरोप कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.

याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार मनपाच्या अख्यतारीत जवळपास 30 वर्षं सेवा कालावधी असलेले प्रथम श्रेणी उत्तीर्ण जवळपास 500 चे आसपास स्थापत्य अभियंते आहेत .त्यातील जवळपास 150 च्या आसपास स्ट्रक्चर, पर्यावरण, ट्रासपोर्टेशन, टाऊन प्लांनिंग या विषयात मास्टर डिग्री असलेले अभियंते आहेत. तर काहींच्या स्थापत्यशास्त्र निगडित पुस्तकांना, लेखांना पुरस्कार मिळालेले आहेत.या अभियंत्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह ठेवून अवघे 16 अभियंते (त्यातही काही फ्रेशर) असलेल्या त्रयस्थ संस्थेवर टेंडर न मागविता स्पर्धेला सामोरे न जाता विश्वास ठेवणे ही निश्चितच अनाकलीय बाब आहे
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पद प्रतिष्ठेचा गैरवापर करून EIL या संस्थेस काम मिळवून दिल्याने या संस्थेच्या मनमानी व दादागिरी बद्दल कोणताही अधिकारी धजवत नाहीत. EIL चे पदाधिकारी तर शहर अभियंत्यांच्या थाटात वावरत असतात. असे शिंदे यांनी म्हटले आहे.

| शिंदे यांनी  खालील मागण्या आयुक्ताकडे केल्या आहेत.

1) Skada यंत्रणेचा दर घेऊन नॉन skada काम करणाऱ्या ठेकेदारांना गेले 10 वर्ष तब्बल जवळपास 500 कोटी रुपये रक्कम कन्सल्टंट च्या भ्रष्टतेमुळे जास्त गेलेत .सदर रक्कम ठेकेदार ,कन्सल्टंट ,अधिकारी यांच्या कडून वसूल करून घ्यावी
2) EIL दर्जाच्या जवळपास 25 कंपन्या अस्तित्वात आहेत नवीन आर्थिक वर्षांपासून त्रयस्थ संस्थेचे काम टेंडर काढून स्पर्धात्मक रित्या देण्यात यावे
3) EIL संस्थेला ज्या पद्धतीने भ्रष्ट पद्धतीने विना निविदा काम दिले याची चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी

हे  प्रकरण भ्रष्टाचाराचे उघड प्रतीक असून आपण प्रशासक या नात्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी. …प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी यास वाचवण्यासाठी पुरेश्या गांभीर्याने कारवाई न केल्यास लोकप्रतिनिधी या नात्याने योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईन याची दखल घ्यावी. असेही शिंदे यांनी म्हटले आहे.