Covid Center : Ravindra Binwade : कोविड सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त!  : आपल्या मूळ खात्यात रुजू होण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

कोविड सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त!

: आपल्या मूळ खात्यात रुजू होण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

पुणे : शहरातील कोरोनाचा(Corona) प्रसार कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या(Civic body) वतीने विभिन्न उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून शहरात कोविड सेंटर(covid senter) ची स्थापना करण्यात आली होती. इथे काम करण्यासाठी आरोग्य विभागातील(Health Department) कर्मचारी अपुरे पडत होते. त्यामुळे इतर खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. शिवाय काही नगरसेवकांनी(corporators) देखील या कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ खात्यात पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोविड सेंटर वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना आपल्या मूळ खात्यात काम करण्यास सांगितले आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे(Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी नुकतेच जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खालील कोविड केअर सेंटर (CCC) सुरु करण्यात आले होते. उपरोक्त कोविड केअर सेंटर येथे कामकाजासाठी परिमंडळ क्र. १ ते ४ चे मध्ये आदेशान्वये अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपरोक्त कोविड केअर सेंटर बंद झाल्यामुळे सदर ठिकाणी कामकाजास असलेले अधिकारी/कर्मचारी यांना या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी कामकाजास असणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या मूळ खात्यात रुजू व्हावयाचे आहे. उपरोक्त अधिकारी/कर्मचारी यांना कार्यमुक्त केल्यानंतर भविष्यात कोविड केअर सेंटर येथे सदर सेवकांची आवश्यकता भासल्यास सदर सेवकांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. तरी संबंधीत खातेप्रमुख यांनी पुढील योग्यती तजवीज करावी.

Leave a Reply