Big Breaking News | PMC Pune | वर्ष होत आले तरी स्थायी समितीच्या सदस्यांच्या हिशोबाचा घोळ मिटेना | आज कहरच झाला!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

वर्ष होत आले तरी स्थायी समितीच्या सदस्यांच्या हिशोबाचा घोळ मिटेना

| मोठ्या प्रकल्पांच्या विषयावरून वादंग आहे सुरु

पुणे : महापालिका सदस्यांचा (PMC) पर्यायाने स्थायी समिती (Standing Committee) सदस्यांचा कालावधी संपून वर्ष पूर्ण होत आले आहे. तरीही समितीतील सदस्यांचा हिशोबाचा घोळ मिटताना दिसत नाही. पालिकेतील मोठ्या प्रकल्पांच्या (Big project) विषयावरून हे वादंग सुरु आहे. दरम्यान हा वाद आज चांगलाच पेटला. समितीतील काही सदस्यांनी याबाबत माजी समिती अध्यक्ष्यांच्या कार्यालयात जात जाब विचारला. मात्र या माजी अध्यक्षाने नेहमीप्रमाणे आपले हात वर केले. त्यामुळे हा वाद आता कधी संपणार, याबाबत मात्र उत्सुकता लागून राहिली आहे.

पदावर असताना टक्केवारीची ठरलेली रक्कम स्थायी समितीच्या अध्यक्षाने पद गेले तरी न दिल्याने त्या समितीतील तत्कालीन सदस्यांनी आज त्या अध्यक्षाच्या खासगी कार्यालयात जाऊन जाब विचारला. प्रत्येक सदस्याची काही रक्कम  या अध्यक्षाने दिले नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.  एका महिला सदस्याने उग्र रूप धारण करत या माजी पदाधिकाऱ्याची पाचावर धारण बसवली.

मिळालेल्या माहितीनुसार पीपीपी रस्ते, नदी सुधार योजना अशा मोठ्या प्रकल्पाच्या विषयावरून हा वाद सुरु आहे. समितीचा कालावधी संपल्यापासून हा वाद सुरु आहे. समितीचे सदस्य जेव्हा याबाबतचा हिशोब माजी अध्यक्षांना विचारतात तेव्हा ते अध्यक्ष पालिकेच्या एका माजी पदाधिकाऱ्या कडे बोट दाखवतात. तर संबंधित पदाधिकारी मात्र राज्यातल्या भाजपच्या मोठ्या आणि महत्वाच्या नेत्याकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या वादाचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे.

दरम्यान आज मात्र कहर झाला. काही सदस्यांनी या अध्यक्ष्यांच्या कार्यालयात जात जाब विचारला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली. सदस्यांना मात्र हा हिशोब कधी मिटतो आहे. याची चिंता लागली  आहे. दरम्यान यातील काही सदस्यांना ‘द कारभारी’ कडून संपर्क करण्यात आला. मात्र सर्वांनी कानावर हात ठेवत आम्हाला याबाबत काही माहिती नाही, असे सांगितले.