Pune Municipal Corporation Retired Sevak Sangh | मागण्यांवर अंमल करा अन्यथा 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन .!  | पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचा मनपा प्रशासनाला इशारा 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

मागण्यांवर अंमल करा अन्यथा 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन .!

| पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचा मनपा प्रशासनाला इशारा

सेवानिवृत्त सेवकांच्या विविध मागण्यासाठी ०५ एप्रिल रोजी मनपा भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. रवींद्र बिनवडे (अतिरिक्त महापालिका आयुक्त, जनरल) यांचेशी चर्चा झाली होती. त्यावेळी माहे मे पेड जून २०२२ चे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणेत येईल. असे आश्वाशित करण्यात आले होते. परंतु दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या एकाही सेवानिवृत्ती सेवकांचे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचे वतीने पुनश्चः एकदा सर्व प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावर 1 सप्टेंबर पर्यंत अंमल नाही झाला तर 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाने दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

1) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांच्या शिल्लक
हक्काचे रजेच्या वेतनाचा फरक दि.०८/०८/२०२२ चे पूर्वी अदा
करण्यात यावा.
2) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना १ जानेवारी २०२२ पासून केंद्र सरकारने घोषित केलेला महागाई भत्ता फरकासह माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबरमध्ये मिळावा.
३) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व निवृत्तीवेतन निश्चित करून माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर २०२२ ला सुधारीत निवृत्तीवेतन मिळावे.
4) सातव्या वेतन आयोगास महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मान्यतेमध्ये दि.०१ जानेवारी २०२१ ते प्रत्यक्ष वेतनात सातव्या वेतन आयोगाचे अमलबजावणीचे दिनांकापर्यंतचा वेतन फरक रोखीने द्यावा. असे नमूद केलेले आहे. त्यानुसार मनपा सेवेतील सेवकांना दहा महिन्याचा फरक ही अदा करण्यात आला आहे. दि.०१/१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार अद्यापही अदा केलेले नाही. त्यामुळे जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीतील निवृतीवेतन फरकापोटी रक्कम रु.१,००,०००/- अॅडव्हान्स पोटी दि.१५/०८/२२ पूर्वी देण्यात यावी.

५) सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे निवृत्तीवेतन फरक महाराष्ट्र शासनाने मान्यतेनुसार दोन हप्त्यात देण्यात यावे. दि ०१/०१/२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना त्यापैकी एक हप्ता माहे ऑगस्ट २०२२ मध्ये अदा करण्यात यावा.

6) दि.०१/०१/२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना जानेवारी २०२१ ते ऑक्टोंबर २०२१ च्या दहा महिन्याचा निवृत्तीवेतनाचा फरक मे पेड इन जून २०२२ ला अदा करणेत येणार होता. तो अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. या दहा महिन्याचा निवृत्ती वेतनाचा फरक दि. १० ऑगस्ट २०२२ पूर्वी अदा करणेत यावा.