Water Closure | महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

महत्वाची बातमी | पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद!

महापालिकेकडून गुरूवारी शहराच्या महत्वाच्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर,गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, पर्वती एमएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकरजलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पाणी बंद असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणी कमी दबाने सोडण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग- 
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड,

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर,कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनिय स्कूल, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रस्ता परिसर

पॅनकार्ड क्‍लब जीएसआर टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्‍लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरन नगर, दत्त नगर

वारजे जीएसआर टाकी परिसर –  कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधामसोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11 , इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1ते 10

एस.एन.डी.टी. टाकी परिसर – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, गोखले नगर मॉडेल कॉलनी संपूर्ण भाग, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटेरोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, कर्वेरोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी,

पर्वती टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर

चतुश्रुंगी टाकी परिसर : औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.