Residential irrigation area | निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून द्या  | महापालिका जलसंपदा विभागाला करणार मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

निवासी करण्यात आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून द्या

| महापालिका जलसंपदा विभागाला करणार मागणी

पुणे | पुणे महानगरपालिकेस २०.३४ टी.एम.सी पाणी आवश्यक असून पुढील कालावधीत शहर व नव्याने समाविष्ट ३४ गावांचे क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाणात पाण्याचे मागणीमध्ये वाढ होणार आहे. तरी पुणे महानगरपालिकेची  पाण्याची निकड विचारात घेऊन पुणे पाटबंधारे मंडळाचे अखत्यारीतील खडकवासला प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये निवासी करणेत आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका जलसंपदा विभागाला करणार आहे. याबाबतचे पत्र पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे पाठवले आहे. आयुक्तांकडून लवकरच हे पत्र जलसंपदा विभागाला पाठवले जाणार आहे.
पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार पुणे पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत खडकवासला प्रणालीमधील प्रकल्पीय (पाणीसाठा) क्षमता २९.१५ टी.एम.सी. आहे. जलसंपदा विभागाकडून प्रकल्पाचे अखत्यारीतील लाभक्षेत्रामध्ये यापूर्वी सिंचन क्षेत्र (शेती) व बिगर सिंचन क्षेत्र या पद्धतीने पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. प्रकल्पावर अवलंबित सिंचन (शेती) क्षेत्र भागात मागील काही वर्षाच्या कालावधीत निवासी क्षेत्र बदलले आहे. त्याबाबत पूर्वीची व सद्य स्थितीची आकडेवारी विचारात घेता निवासी क्षेत्रात बदल करून झालेल्या सिंचन क्षेत्राचा पाणी वापर कमी होणार असल्याने, सदरचे पाणी शिल्लक राहणार आहे. खडकवासला लाभक्षेत्र पुन्हा नव्याने dcliniate करून निवासी क्षेत्र व बिगर निवासी (शेती) क्षेत्र दर्शविणे आवश्यक आहे व कमी झालेल्या बिगर निवासी क्षेत्राचा पाण्याचा कोटा अस्तित्वातील निवासी क्षेत्रासाठी वाढवून मिळणे गरजेचे आहे. पाणी कोटा तपासून सदर कोटा निवासी क्षेत्रासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचा सूचना मा.जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी दि. २८/०९/२०२२ चे सुनावणी वेळी जलसंपदा विभागास दिलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेने सन २०२२-२३ ची लोकसंख्या ६९,४१,४६० नमूद करून पुणे महानगरपालिकेसाठी सन २०२२-२३ चे वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक यापूर्वी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांनी जलसंपदा  विभागाकडे सादर केले आहे. पुणे महानगरपालिकेस २०.३४ टी.एम.सी पाणी आवश्यक असून पुढील कालावधीत शहर व नव्याने समाविष्ट ३४ गावांचे क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाणात पाण्याचे मागणीमध्ये वाढ होणार आहे. तरी या बाबींचे अवलोकन करून व पुणे महानगरपालीकेचे पाण्याची निकड विचारात घेऊन पुणे पाटबंधारे मंडळाचे अखत्यारीतील खडकवासला प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये निवासी करणेत आलेल्या सिंचन क्षेत्राचे पाणी पुणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात यावे. असे पत्रात म्हटले आहे.