MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला ! कारण जाणून घ्या

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

आमदार सुनिल टिंगरे 6 एप्रिल पासून बसणार उपोषणाला! कारण जाणून घ्या

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (vadgaonsheri constituency) विविध मूलभूत प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) उपोषणाला बसणार आहेत. टिंगरे यांनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांना निवदेन दिले आहे. वडगाव शेरीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा निवेदन देवून सुद्धा तसेच वारंवार बैठका घेऊनही या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नसल्याने नागरिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 6 एप्रिल पासून आमदार उपोषणाला (Hunger strike) बसणार आहेत.
 आमदार सुनिल टिंगरे यांच्या निवेदनानुसार    माझ्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील विविध मूलभूत प्रश्नांबाबत मी सातत्याने आपल्याकडे बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहार यामाध्यमातून पाठपुरावा केला आहे.  विधिमंडळ अधिवेशनातही या प्रश्नांकडे मी शासनाचे लक्ष वेधले आहे. असे असतानाही या प्रश्नांची आपल्याकडून दखल घेतलेली जात नाही. प्रत्येक वेळेस केवळ आश्वासने देऊन माझी बोळवण केली जात आहे. मात्र आता मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न इत्यादीनी गंभीर रूप धारण केले आहे. आपणाकडून त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर नाईलाजास्तव येत्या गुरुवार दि. 6 एप्रिल पासून मी स्वतः  व माझ्या मतदार संघातील नागरिकांसमवेत महापालिका भवनासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केलेला आहे.  यासंबंधीची दखल आपण घ्यावी. असे टिंगरे यांनी म्हटले आहे.
| या आहेत मागण्या!
1) पोरवाल रोड वाहतूक कोंडी
2 एअरफोर्स जागेतील (509) ते धानोरी रोड
3) नदी काठचा प्रलंबित रस्ता
4)  विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे.
5) नगर रोड वाहतूक कोंडी
6) लोहगावचा पाणी प्रश्न
7) खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड
8) सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनर्वसन
9) धानोरी लक्ष्मी टाऊनशिप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड
10) धानोरी सर्वे नं. 5  ते सर्वे नं. 12 रोड
11) धानोरी पेलेडीयम रोड ते सर्वे नं. 6  रोड