Spread the love

‘किडनी केअर’ॲपचे लोकार्पण

: सुनील माने यांची माहिती

पुणे: किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘किडनी केअर’ या ॲपची ‘कोडेक्वे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ने’ निर्मिती केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कायनेटिक कम्युनिकेशन्सचे संचालक तसेच एमसीसीआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शैलेश काकडे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत कलशा आदी उपस्थित होते.

: रुग्णांना वरदान ठरेल

संस्थापक सुनील माने म्हणाले की, ‘किडनी केअर ‘ हे एक व्यापक आणि सुरक्षित ॲप आहे. रुग्णांना त्यांच्या सर्व वैद्यकीय अहवालाचा मागोवा ठेवण्यास आणि डॉक्टरांना रुग्णांच्या माहितीचे विभाजन कमी करण्यास हे ॲप अत्यंत लाभदायी ठरेल.  हे ॲप रुग्णांना लॉगिन आणि त्यांची माहिती अद्ययावत करण्याची परवानगी देते. तसेच रुग्णांना संबंधित डॉक्टर ही निवडता येतात. यामुळे फक्त संबंधित डॉक्टरच रुग्णाची माहिती पाहू शकतात. केवळ रुग्णांनाच नव्हे तर डॉक्टरांना सुद्धा या ॲपवर लॉग इन करून त्यांना किती रुग्णांना सल्ला दयायचा आहे हे पाहू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे अद्ययावत वैद्यकीय अहवाल तपासू शकतात, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित काळजी किंवा उपचार आवश्यक असल्यास संबंधित रुग्णांना त्याविषयी सूचित करू शकतात. ठराविक डॉक्टरांच्या देखरेखीखाली, अनुभवी परिचारिका देखील वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्ण यांच्यात माध्यम म्हणून काम करू शकतील. यामुळे रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत आहे की नाही यावर बारीक लक्ष आणि नियंत्रण ठेवणे शक्य होईल. असे हि माने म्हणाले.

Leave a Reply