Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे

     अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण बैठा सत्याग्रह करण्यात आला.

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने घेतलेले चूकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय सूडबुध्दीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना लक्ष करून ईडीच्या चौकशीसाठी बोलविले जात आहे. हे हुकूमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असून या विरूध्द आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडी चौकशी मार्फत त्रास देत आहे व काँग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असावा असे काँग्रेस पक्षाला वाटते परंतु या ठिकाणी केंद्रातील भाजप सरकार हे हिटलरशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचे काम करीत आहे.’’

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अविनाश बागवे आदींनी आपले विचार व्यक्त केले.     तसेच यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, आबा बागुल, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर, महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, रफिक शेख, अजित दरेकर, नरेंद्र व्यवहारे, अण्णा राऊत, नीता रजपूत, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, सतीश पवार, भरत सुराणा, अविनाश अडसुळ, प्रशांत सुरसे, शिलार रतनगिरी, राजू साठे, राहुल तायडे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा, ॲड. निलेश बोराटे, राजू नाणेकर, उमेश कंधारे, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे, भगवान कडू, बाळासाहेब प्रताप, रवि मोहिते, कान्होजी जेधे, शिवराज भोकरे, अक्षय माने, वैशाली परदेशी, अनुसया गायकवाड, वाल्मिक जगताप, सुरेश कांबळे, सचिन सावंत, चेतन आगरवाल, शाबीर खान, नर.सिंह आंदोली, हनुमंत राऊत, विक्रम खन्ना, बाबा सय्यद, हेमंत राजभोज, ॲड. अश्विनी गवारे, श्रीकृष्ण बराटे, अविनाश गोतारणे, रवि पाटोळे आदी उपस्थित होते.

     सत्याग्रहाचे सूत्रसंचालन द. स. पोळेकर यांनी केले तर आभार सचिन आडेकर यांनी मानले.