Biometric attendance | बायोमेट्रिक हजेरीबाबत महापालिका प्रशासन पुन्हा गंभीर  | 20 डिसेंबर ची डेडलाईन 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

बायोमेट्रिक हजेरीबाबत महापालिका प्रशासन पुन्हा गंभीर

| 20 डिसेंबर ची डेडलाईन

पुणे | महापालिकेत अधिकारी (PMC Pune) आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही अधिकारी / सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच याबाबतचे  प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुषंगाने संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी सदर प्रमाण पत्र सादर केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही बाब प्रशासनाने पुन्हा गंभीरपणे घेतली आहे. आता प्रशासनाकडून यासाठी 20 डिसेंबर ची डेडलाईन (deadline) देण्यात आली आहे.  (Pune Municipal corporation)
| असे आहेत आदेश
Aadhar Enable Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये सूरू करण्यात आलेली आहे.  आदेशान्वये संबंधित खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी / सेवक यांचे “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” च्या बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले आहे किंवा नाही याबाबतची खातरजमा करून यासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रा प्रमाणे प्रमाणित करून खातेप्रमुख यांचे स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्याबाबत संदर्भ  निर्देश देण्यात आले होते. अद्यापही काही अधिकारी / सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच  प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुषंगाने संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी सदर प्रमाण पत्र सादर केल्याचे दिसून येत नाही.

त्यानुषंगाने सादर खातेप्रमुख / विभागप्रमुख यांना आदेशित करण्यात येते की आपले विभागातील / क्षेत्रिय कार्यालयातील सर्व अधिकारी / सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण करून २०/१२/२०२२ पर्यंत बायोमेट्रिक हजेरी प्रणालीत पूर्ण क्षमतेने चालू करावयाचे आहे. ज्या अधिकारी/सेवकांची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये हजेरी लावली जाणार नाही त्या अधिकारी/सेवक यांचेमहिने महाचे वेतन अदा करण्यात येणार नाही. याची सर्व अधिकारी/सेवक यांनी नोंद घ्यावयाची आहे. संबंधित विभाग / क्षेत्रिय कार्यालय यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबत काही तक्रारी / अडचणी येत असल्यास श्री. श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग मोबाईल नं. ९६८९९३१३७४ यांचेशी संपर्क साधावा. असे आदेशात म्हटले आहे.