Palkhi | Pune municipal corporation | पालखी सोहळ्यात महापालिकेची देखील असणार ‘कामगार दिंडी’! 

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र
Spread the love

पालखी सोहळ्यात महापालिकेची देखील असणार ‘कामगार दिंडी’!

पुणे | गेली दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा आयोजित केला गेला नव्हता. यंदा मात्र हा सोहळा दिमाखात साजरा होणार आहे. त्याची तयारी देखील सुरु आहे. दरम्यान या सोहळ्यात महापालिकेची देखील कामगार दिंडी असणार आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून महापालिकेकडून या दिंडीचे आयोजन केले जाते. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कामगार अधिकारी यांनी केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बुधवारी आळंदीहून पुण्यात मुक्कामाला येणार आहे. सोबतच संत तुकाराम महाराजांची पालखी देखील असते. दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. पुणे महापालिका देखील यात आपला सक्रिय सहभाग नोंदवते. महापालिकेकडून कामगार दिंडीचे आयोजन करण्यात येते. कामगार कल्याण निधी अंतर्गत याचे आयोजन करण्यात येते. याचे सभासद यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे यंदाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान या दिंडीत महापालिकेकडून सामाजिक संदेश देण्यात येतात. यावर्षी देखील तसेच नियोजन करण्यात आले आहे.