PMC Retired Servants | मनपा सेवानिवृत्त सेवकांना शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनाचा फरक मिळेना  | काही विभागांची उदासीनता कारणीभूत 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

मनपा सेवानिवृत्त सेवकांना शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनाचा फरक मिळेना

| काही विभागांची उदासीनता कारणीभूत

पुणे | मनपाच्या काही खात्यामार्फत १.१.२०१६ नंतर मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेल्या / सेवानिवृत्तीनंतर मयत झालेल्या मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्यांचे शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनाचा फरक आदा करण्यात आलेला नाही. याबाबत पुणे मनपा सेवानिवृत्त कर्मचारी संघ वारंवार मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे विभागाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. 25 नोव्हेंबर नंतर बिले घेतली जाणार नाहीत. असा इशारा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिला आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार १.१.२०१६ नंतर मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेल्या / सेवानिवृत्तीनंतर मयत झालेल्या मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्यांचे शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनाचा फरक संबधित खात्याकडून बिल तयार करून आदा करण्याचे काम चालू आहे.

तथापि, अद्यापही काही मनपा खात्यामार्फत दिनांक १.१.२०१६ नंतर मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त
झालेल्या / सेवानिवृत्तीनंतर मयत झालेल्या मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार
त्यांचे शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनाचा फरक आदा करण्यात आलेला नसून याबाबत पुणे मनपा
सेवानिवृत्त कर्मचारी संघ वारंवार मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत.

तरी, दिनांक १.१.२०१६ नंतर मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेल्या । सेवानिवृत्तीनंतर मयत झालेल्या मनपा अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार शिल्लक हक्काच्या रजेचा फरकाची रक्कम पुणे मनपाच्या ज्या खात्याकडून अद्यापही आदा करण्यात आलेली नाही, अशा सर्व खात्यांनी कोणत्याही परीस्थितीत दिनांक २५.११.२०२२ पर्यंत शिल्लक हक्काच्या रजेची बिले तयार करून सदरची बिले पगारबिल विभागाकडून तपासून घ्यावीत. दिनांक २५.११.२०२२ नंतर सेवानिवृत्त झालेल्या / सेवकांच्या शिल्लक हक्काच्या रजेची कोणतीही बिले तपासून मिळणार नाहीत, याबाबतची नोंद घेण्यात यावी. असे ही म्हटले आहे.