Prithviraj Sutar | पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने सलग १७ व्या वर्षी उन्हाळी शिबीराचे आयोजन

Categories
cultural Education Political पुणे
Spread the love

पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने सलग १७ व्या वर्षी उन्हाळी शिबीराचे आयोजन

पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्यावतीने श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) व बाल विकास केंद्र नॉर्थ डहाणूकर कॉलनी यांच्या संयुक्त सहकार्याने कोथरूड परिसरातील ३ ते १५ वर्षांच्या वयोगटातील मुला मुलींसाठी श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबीराचे आयोजन दि. २० मे ते ३१ मे या कालावधीमध्ये करण्यात आले होते.

 या कालावधीमध्ये मुला मुलींसाठी नृत्य प्रशिक्षण, हस्तकला, मातीकाम, लाठी-काठी चालविणे, चित्रकला, संगीत, गायन, पपेट शो, अॅक्टींग यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच इतिहासातील छत्रपती श्री शिवाजी महारांजाचे मावळे म्हणजेच स्वराज्य योध्दे मुलांना कळण्यासाठी मावळा हा खेळ
मुलांकडून खेळून घेण्यात आला. दररोज सायं ५ ते ७ या वेळेत या शिबीराचे आयोजन नॉर्थ डहाणूकर कॉलनीच्या मैदानावर करण्यात आले. रोज मुलांना पोहे, उपीट, शिरा, वडापाव, कच्छी दाबेली, भेळ, उत्तपा असा खाऊ देण्यात आला, समारोपाच्या दिवशी सर्व मुलांना व पालकांना सॅन्डवीच व आईस्क्रिम देण्यात आले.
समारोपाच्या कार्यक्रमात शिबिराच्या काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील ६० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सदरची बक्षिसे शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या शुभहस्ते देण्यात आली.
आपल्या भाषणात पृथ्वीराज सुतार यांनी या शिबिराचे आयोजिन करण्याचा उद्देश हा लहान मुलांची मानसिक व शारिरिक वाढ व्हावी, सर्वागीण विकास व्हावा, मुलांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिराचे १७ वे वर्ष असून, दरवर्षी साधारण तीनशे ते साडेतीनशे मुले यामध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीतून आता आपण सगळेजण बाहेर पडत आहोत. गेल्या दोन वर्षांपासुन कोरोना मुळे लहान मुलांना मोकळ्या मैदानावर खेळता येत नव्हते. परंतु या शिबीरामुळे मुलांना अनेक मित्र मिळाले, त्यांच्या आवडीने खेळ खेळता आले. त्यांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास या शिबिराची मदत झाली. पुढच्यावर्षीपासुन कोथरूडच्या विविध
भागात या शिबिराचे आयोजन करावे तसेच पालकांसाठी सुध्दा अशा संस्कार शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी सर्व पालकांनी केली.
या कार्यक्रमास बालविकास केंद्राच्या प्रमुख अपर्णाताई वेर्णेकर, स्मिताताई वाळीबे, बुचकेसर, दिपालीताई देशमुख, अर्चनाताई बडबडे, सीमाताई भोज, प्राजक्ताताई बाभुर्डे, अनघाताई कुंटे, रायकर ताई ऐश्वर्याताई डेरे,छायाताई हुलाळकर, फेडरेशनचे संस्थापिका डॉ. दिपालीताई फाटक, राहुल यादव, हे
उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनंदताई डेरे यांनी केले तर आभार राजेश्वरीताई यादव यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश क्षीरसागर, चंद्रकांत बोहुडे, नचिकेत घुमटकर,विशाल उभे, भरत कोळपे, जितेंद्र खुंटे, योगेश चौधरी, अविनाश इंगळे, चेतन डेरे, विष्णू फाले यांनी सहकार्य केले.

Leave a Reply