Impact | सेवानिवृत्त सेवकांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लागणार मार्गी! | लेखा परीक्षण विभागाकडे उपलब्ध केली अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज | ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

सेवानिवृत्त सेवकांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लागणार मार्गी!

| लेखा परीक्षण विभागाकडे उपलब्ध केली अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज

| ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

पुणे | पुणे महापालिका आपल्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करते. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ वेळेवर होताना दिसत नाही. कारण सेवकांना निवृत्त झाल्यानंतर दोन दोन वर्षांनी याचा लाभ मिळताना दिसतो आहे. यामुळे कमर्चारी त्रासून गेले आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाकडील माहितीनुसार विविध खात्यात अजून 519 पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे प्रलंबित राहण्याबाबत खातेप्रमुखांची उदासीनता कारणीभूत मानण्यात येत आहे. याबाबत ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि सुधारित वेतन देण्यासाठी लेखापरीक्षण विभागाकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज देण्यात आली आहे. प्रकरणे मार्गी लागेपर्यंत या कर्मचाऱ्यांना तिथेच काम करायचे आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC retired employees)
519 प्रलंबित प्रकरणामध्ये सर्वच क्षेत्रीय कार्यालयापासून सर्वच खात्याचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रकरणे ही प्राथमिक शिक्षण विभागाची आहेत. विभागाकडे सुमारे 111 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याखालोखाल आरोग्य विभागाकडे 65 प्रकरणे प्रलंबित आहेत. पाणीपुरवठा विभागाकडे 46 प्रकरणे प्रलंबित आहेत. ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे प्रत्येकी 26 प्रकरणे प्रलंबित आहेत. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे 23, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशी सर्वच विभागात काही ना काही प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी भरडले जात आहेत. त्यातही वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचारी तर सेवानिवृत्त झाल्यावर पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून असतात. त्याच कर्मचाऱ्यांची संख्या पालिकेत जास्त आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना दोन दोन वर्षानंतर पेन्शन मिळते. पेन्शन मिळाली तरी ती सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी पालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. काही कर्मचाऱ्यांना तर पेन्शन वारंवार फॉलो अप घेऊनही लवकर पेन्शन मिळत नाही. बऱ्याच कर्मचाऱ्यांना उतारवय असल्याने वेगवेगळे आजार जडलेले असतात, त्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते. मात्र तो वेळेवर मिळत नाही. पेन्शन मिळण्यागोदर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. काही लोकांच्या घरातील फॉलोअप घेतात तर काही त्या फंदात ही पडत नाहीत. (PMC Pune)
दरम्यान कर्मचाऱ्यांची प्रकरणे मार्गी लागण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी नुकतीच एक बैठक घेऊन सर्व खात्याना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता लेखा परीक्षण विभागाकडे महापालिका आयुक्त यांचे नियंत्रण असलेले विविध विभागातील 13 कर्मचारी लेखा परीक्षण विभागाकडे उपलब्ध करून दिले आहेत. या कर्मचाऱ्यांनी 31 जुलै पर्यंत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करायचा आहे. तसेच सेवानिवृत्त सेवकांना सुधारित वेतन देण्याची कार्यवाही करायची आहे. त्यानंतर त्यांना आपल्या मूळ खात्यात जात येणार आहे. दरम्यान यामुळे मात्र सेवानिवृत्त सेवकांना दिलासा मिळणार असून त्यांची प्रकरणे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. (Pune Municipal Corporation)