Childrens Day : Sachin Aadekar : बालदिनाचे औचित्य साधत नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

Categories
Political पुणे
Spread the love

बालदिनाचे औचित्य साधत नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

पुणे : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साज-या केल्या जाणा-या बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम ब्लाॅक काॅंग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच प्रभागातील कै.सुभाष तात्या तोंडे आणि कै.मारुती नाना निकम यांच्या स्मरणार्थ नवी पेठेतील ठोसरपागा स्मशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

बालदिनाचे महत्व आणि पं. नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन लहान मुले आणि मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहानमुलांना गुलाबाचे फुल आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच आकाशामध्ये फुगे सोडून मुलांनी शांतीचा संदेश दिला.

पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष सोनाली मारणे, माजी नगरसेविका नीता परदेशी, पं. जवाहरलाल नेहरु स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, साहिल केदारी, राष्ट्रवादी चे प्रभाग अध्यक्ष मच्छिंद्र उत्तेकर, शिवसेनेचे अनंत घरत उपस्थित होते. श्रीमती स्मिता सुभाष तोंडे आणि श्रीमती कमल मारुती निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभाग क्र. २९ मधील जेष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Leave a Reply