PMC Health Schemes | लाखोंचा मिळकत कर भरूनही शहरी गरीब योजनेचा फायदा लाटू पाहणाऱ्यांना पुणे मनपा आरोग्य विभागाने शिकवला धडा

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Health Schemes | लाखोंचा मिळकत कर भरूनही शहरी गरीब योजनेचा फायदा लाटू पाहणाऱ्यांना पुणे मनपा आरोग्य विभागाने शिकवला धडा

| महापालिकेने एप्रिल पासून 41 प्रकरणे नाकारली

PMC Health Schemes | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरातील गरीब लोकांना (Poor People) आरोग्य सुविधा (Health service) मिळावी यासाठी शहरी गरीब योजना सुरु केली आहे. मात्र यातून गरिबांपेक्षा धनदांडग्याचाच लाभ होताना दिसत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या योजनेचे संगणकीकरण (Online) केले आहे. या माध्यमातून महापालिकेला खरा गरीब कोण हे शोधता येणे सोपे झाले आहे. लाखोंचा मिळकतकर (Property Tax) भरणारे लोकदेखील चुकीचा उत्पन्नाचा दाखला दाखवून या योजनेचा लाभ घेऊ पाहत होते. मात्र महापालिकेच्या ऑनलाईन योजनेत अशा लोकांचे पितळ उघडे पडले आहे. एप्रिल पासून असा 41 केसेस महापालिका आरोग्य विभागाने नाकारल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाचले आहेत. शिवाय खऱ्या गरिबांना लाभ देखील मिळू लागला आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी दिली. (PMC Health Scheme)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. चालू आर्थिक वर्षांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. सुरुवातीला नागरिकांना याबाबतच्या गोंधळाला सामोरं जावे लागले. मात्र आता यात सुसूत्रितपणा आला आहे. तसेच पूर्वी जी महापालिकेची फसवणूक केली जायची ती देखील कमी झाली आहे. (PMC Pune Health Department)
याबाबत डॉ नाईक यांनी सांगितले कि, एप्रिल महिन्यापासून online शहरी गरीब योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या संबंधित लोकांची माहितीसाठी  आम्ही त्यांच्याकडून रेशन कार्ड, उत्पन्नाचा  दाखला तसेच आधार कार्ड घेतो. शहरी गरीब योजनेचे सॉफ्टवेअर हे प्रॉपर्टी टॅक्स विभागाशी लिंक आहे. त्यामुळे आम्हाला लाभार्थ्यांची पटकन माहिती मिळते. लाखोंचा मिळकत कर भरणारे नागरिक देखील 1 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला दाखवत आहेत. त्यामुळे अशा केसेस आम्ही तात्काळ नाकारतो. डॉ नाईक यांनी सांगितले कि एप्रिल पासून आम्ही अशी 42 प्रकरणे नाकारली आहेत. यामुळे महापालिकेचे लाखों वाचले आहेत शिवाय महापालिकेची फसवणूक देखील थांबली आहे. (Pune Municipal Corporation News)
डॉ नाईक यांनी पुढे सांगितले कि, बोगस रेशन कार्ड सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याबाबत आम्ही नुकताच एक गुन्हा देखील दाखल केला आहे. आगामी काळात देखील गुन्हे दाखल केले जातील. (PMC Pune Marathi News)
—-
ऑनलाईन शहरी गरीब योजनेचा चांगला फायदा होताना दिसतो आहे. महापालिकेची फसवणूक करणाऱ्यावर आम्ही आळा घालतोय. त्यामुळे महापालिकेची पैशाची बचत झालेली आहे.  खऱ्या गरजू आणि गरीब लोकांपर्यंत ही योजना पोचवणे आवश्यक आहे. श्रीमंत लोकांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये.
डॉ मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी 
—-
News title | PMC Health Schemes |  The Pune Municipal Health Department has taught a lesson to those who seek to benefit from the Urban Poor Scheme despite paying lakhs of income tax.