महापालिकेच्या मिळकतीची होणार चौकशी!

Categories
PMC
Spread the love

 

महापालिकेच्या मिळकतींची होणार चौकशी! 

द कारभारी वृत्तसेवा

पुणे. महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास, भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज संबंधित खात्यांना दिले आहेत.

रासने म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पूर्वी महापालिकेच्या भवन विभागामार्फत २६६ मिळकती भाड्याने दिल्या आहेत. जवळजवळ १६२५ भाड्याने  दिलेल्या मिळकतींची गेल्या वर्षी मार्च अखेरची थकबाकी ३४ कोटी ४८ लाख रुपये इतकी आहे. या वर्षी एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ अखेरची भाड्याची थकबाकी १८ कोटी ९२ लाख रुपये इतकी होते. म्हणजेच एकूण १९८१ भाड्याने दिलेल्या मिळकतींची भाड्याची थकबाकी एकूण ५३.५० कोटी रुपये इतकी आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापालिकेचे महसुली उत्पन्न बुडत आहे.

रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेच्या विविध विभागांकडून विकसित करण्यात आलेल्या मालमत्ता वर्षानुवर्षे वापराविना पडून आहेत, अनेक मिळकतींचा करार झालेला नाही, काही मिळकतींवर अर्धवट बांधकाम झालेले आहे, अनेक मिळकतींवर अतिक्रमण झालेले आहे, करारानुसार वापर न होणार्या मिळकतींची संख्या खूप मोठी आहे, अनेक मिळकतींच्या भाड्याची वसुलीच होत नाही अशा सर्व मिळकती शोधून काढून त्या ताब्यात घेऊन जागा वाटप वितरण नियमावलीनुसार त्याचे वितरण करण्याचे आदेश दिले.’

—–

Leave a Reply