Social and political crimes | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

पुणे : सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे आज केली. यावेळी पोलिस आयुक्तांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेत राजकीय गुन्हे पुढील तीन महिन्यात मागे घेण्याचे आश्वासन दिले.

कॉँग्रेसच्या वतीने पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी  प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहनदादा जोशी,  माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे , संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, नगरसेवक रवींद्र धंगेकर, नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते.

कॉँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करोना काळात सर्वसामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्य शासनामार्फत शासन निर्णय ( जीआर ) प्रमाणे परिमंडळ उपयुक्तंमार्फत समिती गठीत करून त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.  राज्य सरकारने या संदर्भात आदेश दिले असले तरी पुणे पोलिसांनी अद्याप सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेतलेले नाहीत असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी यांनी कॉँग्रेस शिष्टमंडळाने केलेल्या सामाजिक व राजकीय गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असे संगत पुढील तीन महिन्यात दाखल राजकीय, सामाजिक गुन्ह्यांची पडताळणी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे  सांगितले.