PM Modi | प्रधानमंत्री मोदी जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ३० मे ला साधणार ऑनलाइन संवाद

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

प्रधानमंत्री मोदी जिल्ह्यातील अनाथ बालकांशी ३० मे ला साधणार  ऑनलाइन संवाद

पुणे : ‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत उद्या ३० मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून, या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील १०६ अनाथ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहे. यामध्ये १८ वर्षावरील अनाथ मुले प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार असून, १८ वर्षाखालील मुले वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी या बालकांना पी एम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, प्रधानमंत्री यांचे पत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड,पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील अनाथ बालकांचे सध्याचे पालक/नातेवाईक, लोकप्रतिनिधी, बालकल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य हेही सहभागी होणार आहेत.

Leave a Reply