Pune Municipal Corporation | PMRDA | नगर रोड वरील १०७ अनधिकृत बांधकामावर कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

Pune Municipal Corporation | PMRDA | नगर रोड वरील १०७ अनधिकृत बांधकामावर कारवाई

| ७५ हजार चौरस फुट बांधकाम पाडले

Pune Municipal Corporation | PMRDA | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पुणे महानगर पालिका (PMC pune), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त अतिक्रमण  कारवाई (Encroachment) अंतर्गत पुणे- नगर रोड वरील वाघोली मध्ये जकात नाका ते बकोरी फाटा या भागात एकूण १०७ अतिक्रमण बांधकामावर (Illegal constuction) कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७५ हजार चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC pune and PMRDA encroachment action)

कारवाई ही रोड मध्यापासून १५ मी च्या आत असलेल्या अतिक्रमणावर करण्यात आली असून नागरिकांना १५ मी. अंतरमधील अतिक्रमणे स्वतः हुन काढून घेण्याचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडून करण्यात आले आहे.

दोन्ही बाजूस मिळून चार मीटर रस्त्याची रुंदी वाढली असून पीडब्ल्यूडी व पुणे महानगरपालिका रस्ता बांधण्याचे काम तातडीने सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली अनाधिकृत बांधकामे काढणे बाबत कारवाई सातत्याने घेतली जाणार असून पीएमआरडीएमार्फत सर्व संबंधित नागरिकांना नोटीस देण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. असे पुणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

अतिक्रमण कारवाईला पुणे महानगर विकास प्राधिकरण च्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार  बजरंग चौगुले, पोलीस निरीक्षक  महेशकुमार सरतापे व क.अभियंते, पुणे महानगपालिकेच्या वतीने उप आयुक्त पुणे शहर  माधव जगताप, उप आयुक्त परिमंडळ किशोरी शिंदे व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उप विभागीय अभियंता  राहुल कदम, कनिष्ठ अभियंता सलीम तडवी हे उपस्थित होते.


Pune Municipal Corporation | PMRDA | Action on 107 unauthorized construction on Nagar Road