Comrade Appasaheb Bhosale | कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांच्या कार्याचे स्मरण | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून अभिवादन

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र
Spread the love

कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांच्या कार्याचे स्मरण | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून अभिवादन

महाराष्ट्र राज्यातील कामगार चळवळीतील अग्रणी, अत्यंत आक्रमक कामगार नेते व कामगार युनियन व पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी स्वर्गीय कॉम्रेड आप्पासाहेब भोसले (Comrade Appasaheb Bhosale) यांचा 19 नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त पीएमसी एम्प्लॉईज युनियन (PMC Employees Union) कडून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आणि त्यांना अभिवादन करण्यात आले. (Pune Municipal Corporation)


याबाबत त्यांच्या आठवणी जागृत करताना युनियन चे सरचिटणीस आशिष चव्हाण यांनी सांगितले कि, त्यांच्या नेतृत्वाखाली राजातील मोठ्या कामगार चळवळी झाल्या.  त्यात महागाई भत्ते, वारस हक्क, सफाई सेवकांसाठीचा घाण भत्ता व वारस हक्क, सानुग्रह अनुदान, धोका भत्ता इ मागण्या लढा देऊन मान्य करून घेतल्या.  गोरगरीब, कष्टकरी, शहरासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कामगारांच्या हक्कांसाठी वेळप्रसंगी संप,आंदोलन मार्ग अवलंबले या दिवंगत कामगार नेत्याच्या त्यागाला कामगार कधीच विसरू शकत नाहीत.
कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांना विनम्र अभिवादन. लाल सलाम.