Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे
Spread the love

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प

| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन  आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.

याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.