Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Sant Tukaram Maharaj Palkhi Soahala|  ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari 2023) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) आज पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala)

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आदी पूजेला उपस्थित होते.

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. (Pandharpur Wari)

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.


News Title |Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | Departure of Sant Tukaram Maharaj palanquin to the alarm of tala-mridanga