Solapur Road Traffic | सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

| अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून रस्त्याची पाहणी 
पुणे | शहरातील सोलापूर रस्ता (Solapur road) हा वरचेवर वाहतुकीसाठी फारच अडचणीचा ठरू लागला आहे. हडपसर (Hadapsar) पर्यंत तर वाहतूक कोंडीचा (Traffic) नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे महापालिका (Pmc Pune) प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional commmissioner vikas Dhakne) यांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
सोलापूर रस्ता हा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या रस्त्यावरून छोट्या तसेच मोठया वाहनांची देखील वर्दळ पाहायला मिळते. कारण याच रस्त्यावरून सोलापूर, बारामती, सासवड अशा ठिकाणी नागरीक ये जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने असतात. ज्यामुळे कोंडी हा नित्याचा भाग होऊन बसला आहे. या रस्त्याला मोकळा श्वास घेता यावा आणि नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचाच प्राथमिक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, झोनल उपायुक्त संदीप कदम, क्षेत्रीय अधिकारी आणि मनपा पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)
सोलापूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महारपट्टा चौक  तसेच सासवड रोड वरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. तसेच फुटपाथ दुरुस्ती केली जाणार आहे. ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी आधी सर्वेक्षण केले जाईल. पहिल्या टप्प्यात भैरोबा नाला ते गोळीबार मैदान या दरम्यानचे तिथले नियोजन केले जाईल. इथे रहदारी फार असते. तो सोडवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांना विश्वासात घेत वाहतूक सुरळीत करण्यासठी विशेष प्रयत्न करावेत. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. अशी माहिती दांडगे यांनी दिली.
रस्त्याची पाहणी करत असताना सायकल ट्रॅक वर बसेस उभा असणे, त्यावरून टू व्हीलर जाणे, यामुळे सायकल ट्रॅक चा  उपयोग होत नाही. ट्रॅक चा व्यवस्थित उपयोग करण्याच्या दृष्टीने  नियोजन सुरु करण्यात येणार आहे. असे ही दांडगे यांनी सांगितले.