Cycle tour | जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural PMC देश/विदेश पुणे
Spread the love

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे | पुण्यात (pune) होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत (G 20 conference) नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे (PMC Cycle Club) सायकल फेरीचे (Cycle tour) आयोजन करण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार आणि विकास ढाकणे यांनी झेंडा दाखवून या फेरीचा शुभारंभ केला.

सायकल फेरीच्या माध्यमातून ‘जी-२०’ बाबत तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. महापालिका मुख्य भवनापासून सुरू झालेली सायकल फेरी जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, शनिवार वाडा आणि पुन्हा महानगरपालिका इमारत अशा मार्गाने पूर्ण करण्यात आली.

सुमारे पंधराशे सायकलप्रेमी नागरिक या सायकल फेरीत सहभागी झाले. पुणे महापालिकेचे सर्व विभाग प्रमुखदेखील या सायकल फेरीत सहभागी झाले होते.

या सायकल फेरीचे नियोजन पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी आणि महापालिकेचे उपायुक्त (क्रीडा) संतोष वारुळे यांनी केले.