Tag: अंशदायी सहायता योजना
इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार
| पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय
पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
| प्रशासन काय म्हणते?
| कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम
संघटनांना मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. सदर योजना खाजगी विमा कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी
कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तरी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कायमस्वरूपी बंद होऊन विमा कंपनीमार्फत नवीन वैद्यकीय योजना राबविल्यास सर्वच कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सन १९६७ पासून सुरू असलेली कामगारांचे आरोग्याशी निगडीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अशीच यापुढे देखील चालू राहावी, असे ही पदाधिकारी म्हणाले.
ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत
| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी
पुणे | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना बंद करून खाजगी विमा कंपनीस वैद्यकीय योजना चालविणेस देणेबाबत आरोग्य विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या माध्यमातून ब्रोकर नेमण्यात येणार आहे. मात्र यात महापालिका कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) या संघटनेकडे ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष प्रदीप महाडिक आणि सरचिटणीस आशिष चव्हाण यांनी कामगार युनियन च्या सरचिटणिसांना पत्र देखील दिले आहे.
| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने काय म्हटले आहे?
पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सन १९६७ पासून अविरतपणे आजतागायत सुरु आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती गठीत असून या समितीमध्ये आपण सदस्य म्हणून कार्यरत आहात. ०१ जून २०२२ रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन पुणे मनपा प्रशासनाने अंशदायी वैद्यकीय सहाय्य
कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
ईन्शुरंस ब्रोकर नेमणुकीची निविदा प्रक्रिया रद्द करा
| कर्मचारी संघटनांची महापालिका आयुक्ताकडे मागणी
संघटनाचे काय आहे म्हणणे?
1967 सालापासुन अंमलात आहे, व हि योजना कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागू आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली जात आहे. व या योजनेचा सकारात्मक
परीणाम कर्मचाऱ्यांच्या काम करण्यात सुध्दा दिसुन येतो. एकाएकी ही योजना मेडिक्लेम कंपनीकडे देण्यासंबंधी आपण सुरवात केली आहे. याला आमचा तिव्र विरोध असुन आम्ही आपल्यास विनंती करतो
की, हि ईन्शुरंस ब्रोकर नेमणुकिची निविदा प्रक्रिया रद्द करावी. त्याचबरोबर या बाबत चर्चा करण्याकरीता आपली वेळ देण्यात यावी. ही विनंती.