Corona influence on Municipal Elections | कोरोनाचा महापालिका निवडणुकीवर प्रभाव!  

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

कोरोनाचा महापालिका निवडणुकीवर प्रभाव!  

: सरकार  निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करू शकते 

 

महापालिका निवडणुका घेण्याबाबत पुन्हा अडचण उभी राहिली आहे. निवडणूक घेण्याबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होत आहेत. इतके दिवस obc आरक्षण आणि आता राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका (local body elections) पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्येत वाढ सुरूच राहिल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला (Election Commission)  करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)  यांनी दिली.


राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले  आहे. पुढचे आठ ते दहा दिवस रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिल्यास निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणाही ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हा कालावधी अधिक असला तरी, काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का, याबाबत विचार करावा लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारला देखील याची चिंता वाटत आहे. त्यामुळे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करू शकते. मात्र यामुळे पुन्हा इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Pune Corporation employees | 79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!   : सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

79 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!

: सुमारे 40 कोटी रक्कम दिली गेली

: मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते. मात्र महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य दिले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. यासाठी कुठलेही निकष नसतील. फक्त रुग्णालयाचे सर्टिफिकेट लागेल. त्यानुसार यासाठी 84 कर्मचारी पात्र होत आहेत. महापालिकेने आतापर्यंत 79 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख दिले आहेत. 3 कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कडून मदत मिळाली आहे. बाकी 6 लोकांना लवकरच हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांनी दिली.
 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका
 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली आहे.  महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाईल.  महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले आहे.  कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले आहेत.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 1 कोटीची आर्थिक मदतदिली जाईल.  जर वारसला नोकरी हवी असेल तर नोकरी आणि 75 लाखांची मदत दिली जाईल.  या योजनेशी संबंधित सर्व अधिकार कामगार कल्याण निधी समितीकडे असतील.  या योजनेत दोन टप्पे होते. त्यानुसार केंद्राच्या योजनेत न बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी दिले जाणार होते. तर त्या योजनेत बसणाऱ्या लोकांना 50 लाख दिले जाणार होते. मात्र केंद्राकडून थोड्याच लोकांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारने तर आपले हात वर केले होते.
 –  95कर्मचाऱ्यांचा मृत्यू
  या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  आतापर्यंत 95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे.
: 57 वारसांना नोकरी
याबाबत दौंडकर यांनी सांगितले कि एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारीतर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 79 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे. महापालिकेने यासाठी जवळपास 40 कोटी दिले आहेत.  दौंडकर पुढे म्हणाले, महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे.