PMC 74th Anniversary Special | पुणे महानगरपालिका : पुण्याच्या वारशाची संरक्षक आणि पुण्याच्या आशादायक भविष्याची शिल्पकार! 

Categories
PMC social पुणे संपादकीय

PMC 74th Anniversary Special | पुणे महानगरपालिका : पुण्याच्या वारशाची संरक्षक आणि पुण्याच्या आशादायक भविष्याची शिल्पकार!

Pune Municipal Corporation Anniversary Special Article | महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले, पुणे हे एक दोलायमान शहर म्हणून उभे आहे जे आधुनिकतेच्या वेगवान प्रगतीसह आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे अखंडपणे मिश्रण करते.  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) शहराचे कल्याण आणि विकास सुनिश्चित करण्याचे प्रमुख आहे.  कार्यक्षम नागरी सेवा पुरविण्याच्या आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन झालेली, PMC अर्थात पुणे महापालिका पुण्याचे नशीब घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पुणे महापालिकेचा आज 74 वा वर्धापनदिन. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. (PMC 74th Anniversary)
 ऐतिहासिक मुळे | पुणे महानगरपालिकेची मुळे 1858 मध्ये पुणे नगरपालिका म्हणून स्थापन झाली तेव्हा ब्रिटीश काळात शोधली जाऊ शकतात. गेली वर्षानुवर्षे, शहराचा विकास होत असताना, नागरी संस्थांच्या जबाबदाऱ्याही वाढल्या.  15 फेब्रुवारी 1950 ला पुणे नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. वाढत्या शहरासाठी महापालिका असणे गरजेचं होतं. या श्रेणीत अजून सुधारणा होणे गरजेचे आहे. जे शहराचे वाढते महत्त्व प्रतिबिंबित करते.
 प्रशासन आणि रचना | PMC लोकशाही व्यवस्थेच्या अंतर्गत कार्य करते. शहराच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी निर्वाचित प्रतिनिधी जबाबदार असतात.  महानगरपालिका अनेक प्रशासकीय झोनमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक निवडून आलेल्या नगरसेवकांद्वारे पुण्यातील रहिवाशांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. महापौर, ज्यांची निवड नगरसेवकांद्वारे केली जाते, ते पीएमसीचे औपचारिक प्रमुख म्हणून काम करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नगरसेवक आणि महापौर असे कोणीही कार्यरत नाही. या सर्वांचे काम हे प्रशासक अर्थात महापालिका आयुक्त करत आहेत. असे असले तरी नागरिकांना मात्र अजूनही नगरसेवकांची कमी भासते.

 पुणे महापालिका शहरासाठी काय करते?

 शहरी नियोजन आणि विकास | PMC हे पुण्याच्या शहरी लँडस्केपचे मुख्य शिल्पकार आहे.  सुसंवादी आणि शाश्वत वाढीचा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी ते मास्टर प्लॅन, झोनिंग नियम आणि विकास धोरणे तयार करते आणि अंमलात आणते.
 पायाभूत सुविधांचा विकास: पुणे येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिका रस्ते, पूल, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन यासह महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेते.
 आरोग्यसेवा आणि शिक्षण: आरोग्यसेवा आणि शिक्षणासह अत्यावश्यक सेवा देण्यासाठी PMC वचनबद्ध आहे.  महानगरपालिका शहरातील लोकसंख्येच्या कल्याणासाठी आणि शिक्षणासाठी रुग्णालये, दवाखाने आणि शाळा चालवते.
 सामाजिक कल्याण उपक्रम: महापालिका उपेक्षित समुदायांचे उत्थान, सर्वसमावेशकता वाढवणे आणि पुण्याच्या एकूण सामाजिक बांधणीत वाढ करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक कल्याण कार्यक्रम घेते आणि त्यावर अमल करते.
 पर्यावरण संवर्धन: पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व ओळखून, पीएमसी हरित जागा जतन करण्यासाठी, कचऱ्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकूल पद्धती लागू करण्यासाठी पुढाकार घेते.
पुणे महापालिके पुढील आव्हाने आणि नवकल्पना:
प्रशंसनीय प्रयत्न असूनही, पीएमसीला वेगाने शहरीकरण, वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन समस्या यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो.  मात्र, या आव्हानांना तोंड देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानाचाही स्वीकार केला आहे.  स्मार्ट सिटी सोल्यूशन्स, डिजिटल गव्हर्नन्स आणि नागरिक-केंद्रित सेवा यासारखे उपक्रम शहराच्या फायद्यासाठी नाविन्यपूर्णतेचा लाभ घेण्यासाठी PMC ची वचनबद्धता दर्शवतात.
 लोकसहभाग: पीएमसीच्या कामकाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागावर भर देणे.  सामूहिक बैठका, अभिप्राय मंच आणि नागरिक-केंद्रित उपक्रमांद्वारे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाते.  या सहयोगी दृष्टिकोनामुळे शहराच्या विकास योजनांमध्ये नागरिकांचा आवाज ऐकला जातो आणि त्याचा विचार केला जातो.
  पुणे महानगरपालिका ही समतोल आणि शाश्वत शहरी विकासासाठी पुणे शहराच्या बांधिलकीचा पुरावा आहे.  पुणे जसजसे विकसित होत आहे, तसतसे PMC आघाडी घेत जात आहे. महापालिका पुणे शहराला प्रगती, सर्वसमावेशकता आणि पर्यावरणीय कारभाराच्या सुसंगत भविष्याकडे नेत आहे.  पुणे महापालिका ही नागरी चमत्कार म्हणजे केवळ प्रशासकीय संस्था नाही;  ती पुण्याच्या वारशाची संरक्षक आणि त्याच्या आशादायक भविष्याची शिल्पकार आहे.
The Karbhari वृत्तसंस्थेच्या वतीने पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

| श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड – बहिरट

 

Datta Bahirat Patil | पुणे | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) प्रभाग क्रमांक ११ (PMC Ward no 11) येथील आशा नगर पाण्याच्या टाकीची (PMC Aasha Nagar Water Tank) उभारणी काँग्रेसच्या आणि माझ्या प्रयत्नातून झाली असून प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) उदघाटन कॉंग्रेस कार्यकर्ते करतील, असे माजी नगरसेवक दत्ता बहिरट (Datta Bahirat Ex Corporator) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (Datta Bahirat Patil Pune Shivajinagar)

या पत्रकार परिषदेला माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) उपस्थित होते.

The karbhari - Datta Bahirat pune shivajinagar
पत्रकार परिषदेला दत्ता बहिरट यांच्यासोबत माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते.

नगरसेवक या नात्याने  २० एप्रिल २०१२ रोजी आशानगर टाकीचे काम सुचविले. टाकीसाठी आशा नगर हौसिंग सोसायटी यांच्याशी संवाद साधून विनामोबदला जागा मिळवून दिली. नंतर सातत्याने पाठपुरावा केला, सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या. माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ असे नाव निश्चित केले,अशी माहिती बहिरट यांनी दिली. भाजपचे स्थानिक आमदार केवळ श्रेय उपटू पहात आहेत, असा आरोप बहिरट यांनी केला.

आशानगर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता दत्ता बहिरट यांनी सन २०१रपासून अथक प्रयत्न केले. वीस लाख लिटर्स क्षमतेची टाकी झाली आणि आता भाजपचे स्थानिक आमदार आयत्या बिळावर रेघोट्या मारत पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ तारखेला उदघाटन करीत आहेत, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टाकी उभारणी कामाचे श्रेय बहिरट यांचे मान्य करावे, त्यांना डावलू नये अशी विनंती पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. या उपरही टाकी उदघाटन कार्यक्रम होणार असेल तर कॉंग्रेस कार्यकर्ते दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता करतील, असे आमदार रवि धंगेकर यांनी सांगितले.

PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेच्या भरती परीक्षेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती | अधिक्षक, उपाधिक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेच्या भरती परीक्षेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 22 जून आणि 7 जुलै ला होणार आहे. त्यासाठीचे परीक्षा केंद्राची तयारी iBPS संस्थेकडून पूर्ण झाली आहे. या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 44 कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केल्या आहेत.  (PMC Pune Bharti Exam)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग – ३ संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया  IBPS या संस्थेकडून पार पाडली जात आहे. यापूर्वी इच्छुक उमेदवारांचे आवेदन अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने
मागविणेत आले आहेत. प्राप्त आवेदन अर्जानुसार संबंधित उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही IBPS या संस्थेने प्राधिकृत केलेल्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर  २२/०६/२०२३ व ०२/०७/२०२३ रोजी तीन सत्रात संपन्न होणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) उक्त प्रमाणे आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेल्या मान्यतेनुसार 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधिक्षक, उपाधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. याबाबत उद्या या लोकांचे प्रशिक्षण देखील ठेवण्यात आले आहे.

किती आणि कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे?

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023)

हे आहेत सेवक

कार्यालयीन आदेश_6

News Title |PMC Pune Bharti Exam | Appointment of 44 employees for Pune Municipal Corporation recruitment exam | Including Superintendent, Superintendent and Senior Clerk

Finance Committee | PMC Pune | ६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत | महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत

| महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई

पुणे | विविध विकास कामे करण्यासाठी वित्तीय समितीची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार समिती विविध कामांना मंजुरी देते. मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामे होत नाहीत. असे लक्षात येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वित्तीय समितीने मान्यता दिलेल्या कामांचे अजूनही कार्यादेश देण्यात आले नाहीत. असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त शिस्त भंगाची कारवाई करणार आहेत. त्यानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सर्कुलर जारी केले आहे.

काय आहेत आदेश ?

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात करावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने  वित्तीय समितीच्या बैठकीत कामांनिहाय मान्यता देण्यात आलेल्या आहेत. तदनुषंगाने, माहे एप्रिल व मे २०२२ मध्ये वित्तीय समितीमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या कामांचे कार्यादेश अद्यापही दिले गेले नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. ही बाब गंभीर असून महापालिका आयुक्त यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही
करणेबाबत  महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत.
तरी, माहे एप्रिल व मे २०२२ च्या वित्तीय समितीच्या बैठकीमध्ये मान्य झालेल्या कामांचे कार्यादेश देण्याची कार्यवाही दिनांक २८.०९.२०२२ पर्यंत पूर्ण करुन केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आमचेकडे दिनांक २८.०९.२०२२ रोजी सायं ५.०० वाजेपर्यंत सादर करावा. सदरबाबत
आवश्यक पूर्तता न केल्यास जबाबदारी निश्चित करुन सक्त कारवाई करण्यात येईल.असे आदेशात म्हटले आहे.

 

Security Guard Issues | मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

पुणे :- महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघाने अनेक तक्रारी केल्या होत्या व आंदोलने केली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक घेतली. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असा विश्वास यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

या बैठकीला सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख व मनपा उपायुक्त माधव जगताप, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, उज्वल साने, अरविंद आगम स्वप्नील कामठे, उमेश कोडीतकर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक  काळे हे उपस्थित होते.

यावेळी सुरक्षारक्षकांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही, कामगार कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोयी सवलती मिळत नाहीत, ड्रेस, बूट, स्वेटर, काठी, सिटी इत्यादी साहित्य मिळत नाही. किमान वेतन कायद्यामध्ये झालेल्या वाढीच्या दराचा फरक मिळत नाही. कोणतेही कारण न सांगता पगारातून कपात केली जाते, कामावरून काढून टाकण्यात येते, अशा सर्व तक्रारींचा पाढा यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त  यांच्या समोर वाचला. या सर्व बाबींकडे महापालिकेकडून हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.

या सर्व प्रश्नांची गंभीर दखल कुणाल खेमनार यांनी घेतली. वेळेवर पगार करण्यास संदर्भातली व इतर सोयी सवलती व सुरक्षेची साधने देण्यासंबंधी चे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. जर कंत्राटदाराने दिलेले आदेश पाळले नाहीत तर संबंधित कंत्राटदारा वर कडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले व कामगार कायद्यामध्ये असणाऱ्या विविध सवलती बाबत कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांचे कडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही खेमनार यांनी या बैठकीत सांगितले.

Insurance broker | Re-tender | इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार

| पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

महापालिका कर्मचारी आणि कर्मचारी संघटना अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालू राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने देखील केली आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तशी खात्री देखील देण्यात आली होती. कारण कर्मचाऱ्यांना ही योजना आपली वाटते. मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात ही योजना गेली तर आमचे नुकसान होईल, असा महापालिका कर्मचाऱ्यांचा दावा आहे. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र पहिली निविदा रद्द करून फेरनिविदा काढली जाणार आहे. मात्र याबाबत अजूनही वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

| प्रशासन काय म्हणते?

निविदा प्रक्रिया आणि या योजनेबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले कि या टेंडर बाबत प्री बीड मिटिंग मध्ये वेगवेगळ्या मागण्या आल्या. त्यावर अमल झाला असता तर मूळ योजनाच बदलावी लागली असती. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण वैद्यकीय विमा काढणार आहोत. मात्र अंशदायी योजनेत आपण कुठलाही बदल करणार नाही. उलट सदस्य आणि महापालिका कर्मचाऱ्यांना यातून पहिल्यापेक्षा जास्त फायदाच होणार आहे. तसेच यावर पूर्णपणे महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. आरोग्याची चांगली सुविधा देण्याचाच महापालिकेचा प्रयत्न आहे. अतिरिक्त आयुक्त पुढे म्हणाले, ही योजना कॅशलेस राहणार आहे. याचाही कर्मचाऱ्यांना फायदाच होणार आहे. याबाबत कर्मचारी संघटनांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे.

| कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम

प्रशासनाने योजनेची चांगली बाजू सांगितली असली तरी कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि, पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सन १९६७ पासून अविरतपणे आजतागायत सुरु आहे. प्रशासनाने अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना बंद करून खाजगी विमा कंपनीस वैद्यकीय योजना चालविणेस देणेबाबत प्रक्रिया सुरू केलेली आहे. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन(मान्यताप्राप्त) व सहयोगी
संघटनांना मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. सदर योजना खाजगी विमा कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी
कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तरी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कायमस्वरूपी बंद होऊन विमा कंपनीमार्फत नवीन वैद्यकीय योजना राबविल्यास सर्वच कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सन १९६७ पासून सुरू असलेली कामगारांचे आरोग्याशी निगडीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अशीच यापुढे देखील चालू राहावी, असे ही पदाधिकारी म्हणाले.

Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप

: राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

पुणे : २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. अशी टीका राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

जगताप म्हणाले,  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो, ते आरक्षण मंगळवार, दि. ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक शाखेने पुणे महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या सोडतीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य महापौरपदी विराजमान व्हावा, यासाठी मागील काही महिन्यांपासून आम्ही सर्व सहकारी व पदाधिकारी जिद्दीने कार्यरत आहोत. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. त्यामुळे, या पाच वर्षांत काहीही ठोस कामगिरी करता न आलेला आणि आत्मविश्वास गमावलेला भाजप आमच्याविरोधात निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकू, असा विश्वास आहे.

प्रभागनिहाय जे आरक्षण जाहीर झाले आहेत, त्यानुसार सक्षम व ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे निश्चितच जड आहे. पक्षाचे उत्तम संघटन व आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यांमुळे या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर विराजमान होईल, अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देतो. असे ही जगताप म्हणाले.

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या

: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.

: असे असेल नियोजन

उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.

Pune City | Water Supply | गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

गुरूवार 2 जून रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार ३ जून रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)-
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
चतु:श्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर,जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
 • मुळा रोड, खडकी, MES, HE Factory,हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Teacher Recruitment | PMC | अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत  | महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक 

Categories
Breaking News Education PMC पुणे

अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत

| महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक

पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांच्या नियुक्‍त्या करण्यात येणार आहेत. सहा महिन्यांकरिता मानधनावर या नियुक्त्या होणार आहेत. यासाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

सन 2022-23 हे शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक भरती करण्याची गरज भासू लागली आहे. दरमहा 15 हजार रुपये मानधनावर हंगामी स्वरूपात या शिक्षकांच्या नेमणुका होणार आहेत. प्राथमिक शिक्षक या पदांसाठी निवड, प्रतीक्षा यादी, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे यांना प्राधान्य देऊन नेमणुका होणार आहेत.

 

शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व अटींची पुर्तता करणाऱ्या वैयक्तिक माहितीसहचे अर्ज, गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसाक्षांकित, छायांकित प्रतीसह महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत समक्ष अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. पोस्टाने किंवा टपालाने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज सादर करताना उमेदवारांनाच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीही करण्यात येणार आहे.