PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

 | वेतन आणि पेन्शन मिळण्यात येणार गती | वेतन आणि पेन्शन साठी एकच प्रणाली

PMC Pay Roll and Pension Software – (The Karbhari News Service) –  महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना वेतन (Pay roll) आणि पेन्शन (Pension) हे ऑनलाईन प्रणाली द्वारे दिले जाते. मात्र ही सिस्टम फार जुनी झाली आहे. त्यामुळे महापालिका आता नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन साठी रखडत बसावे लागणार नाही. याला आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग (PMC Education Department) देखील आता यामध्ये जोडण्यात आला आहे. जानेवारी पासून याची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक कारणामुळे याची सुरुवात मे महिन्यापासून केली जाणार आहे.  अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी दिली. (PMC HRMS Pay Roll and Pension System) 

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation)
 pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे. यामुळे आता वेतनासाठी जी 10 तारखेची वाट पाहावी लागते. ती पाहावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळेल. तसेच आज पेन्शनसाठी सेवानिवृत्त सेवकांना रखडावे लागते, ती अडचण देखील कमी होणार असून लवकरात लवकर पेन्शन हातात मिळण्यास मदत होणार आहे. जगताप यांनी सांगितले कि, हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी महापालिकेला बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने सीएसआर (CSR) अंतर्गत चांगली मदत केली आहे. या प्रणालीचा वापर करण्यास  प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती.

बिनवडे यांनी सांगितले कि,  सॉफ्टवेअरवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संपुर्ण माहिती, वेतनश्रेणी आणि त्यानुसार देण्यात येणारे भत्ते, सर्व्हिस बुकमधील माहिती अपलोड करण्यात आली आहे. तर पेन्शनरांची माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाने हे सॉफ्टवेअर आणि जुन्या पद्धतीने पगार करण्यास प्रायोगीक तत्वावर सुरूवात केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या नव्या सॉफ्टवेअरचे सर्व पगार बिल क्लार्कला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे वेतन मे मध्ये या सॉफ्टवेअरद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

बिनवडे यांनी सांगितले, की प्रत्येक कर्मचार्‍याला मोबाईलवरूनही त्याच्या पगारबिलाची तसेच सर्व्हिस बुकची माहिती घेण्याची सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये आहे. यासाठी कर्मचार्‍याला आधार क्रमांक आणि कर्मचारी आयडी क्रमांकाच्या माध्यमांतून लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांना यापुढील काळात रजेचे अर्जही ऑनलाईनच सादर करावे लागणार आहेत. सर्व्हिस बुकमधील सद्यस्थिती देखिल या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचार्‍याला समजू शकणार आहे.

सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला सहा महिने अगोदरच कोणती कागदपत्र सादर करायची, कोणत्या विभागाच्या एनओसी घ्यायच्या आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यांना स्वत: पेन्शनची प्रकरणे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे पेन्शन प्रकरणांचा विलंब कमी होणार असून निवृत्तीनंतरच्या पुढील महिन्यांपासून पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे नंतरही दोन महिने पुर्वीची पगाराची पद्धत समांतरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

Water Meter in Pune | महापौर बंगल्यावर पाण्याच्या लाईनवर मीटर शोभेपुरताच! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Water Meter in Pune | महापौर बंगल्यावर पाण्याच्या लाईनवर मीटर शोभेपुरताच!

– विवेक वेलणकर यांनी उजेडात आणला प्रकार

Water Meter in Pune – (The Karbhari News Service) – बऱ्याच पाठपुराव्या नंतर महापौर बंगल्यावर (Pune Mayor Bungalow) पाण्याच्या लाईनवर मीटर बसला खरा; पण घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून (PMC Ghole Road Ward office) घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाण्याचा वापर सुरु असल्याचे समोर आणले आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर (Vivek Velankar Pune) यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. (PMC Water Supply Department)
The karbhari - pmc water supply department
 याबाबत वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि,  गेल्या दीड वर्षापासून आम्ही पाणीपुरवठा विभागाशी पाठपुरावा करतोय की महापालिका आयुक्त बंगला, महापौर बंगला , जिल्हाधिकारी बंगला येथे अन्य पुणेकरांप्रमाणे पाणी मीटर बसवा म्हणजे त्यांचा पाणीवापर किती आहे हे कळेल.  आज थोड्या वेळापूर्वी महापौर बंगल्यावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलो असता, असे दिसून आले की तिथे येणाऱ्या पाण्याच्या लाईनवर मीटर बसला आहे, मात्र त्यातून पाणीपुरवठा होत नाही.  तर शेजारच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाणी पुरवठा होतो. याचाच अर्थ मीटर शोभेचाच आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
वेलणकर यांनी पुढे म्हटले कि, पाणीपुरवठा विभागास तातडीने आदेश देऊन महापालिका आयुक्त बंगला, जिल्हाधिकारी बंगला, अन्य वरीष्ठ सरकारी / निमसरकारी बंगले या ठिकाणी तत्काळ पाणी मीटर बसवण्यास सांगावे. ही सर्व मंडळी दरडोई दरदिवशी १५० लिटरपेक्षा कमी पाणी वापरतात असे उदाहरण आकडेवारी सह पुणेकरांपुढे ठेवावे. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

Categories
Breaking News PMC social पुणे

Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा नागरिक केंद्रित प्रशासनावर भर

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांतून तसेच समाविष्ट गावांतून नागरिक विविध समस्या घेऊन महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) येत असतात. मात्र कधी कधी नागरिकांना महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयात नुसत्याच चकरा माराव्या लागतात. आगामी काळात याच गोष्टी टाळण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. नागरिक केंद्रित प्रशासनावर भर देत नागरिकांच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी  एक धोरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी दिली. (Pune PMC News)

| मूलभूत सुविधा देताना महापालिकेची दमछाक

पुणे महापकिकेत 34 समाविष्ट गावांचा समावेश झाला आहे. या गावांमध्ये मूलभूत समस्यांचा अभाव आहे. गावे आणि मूळ शहराला सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशातच आपल्या विविध समस्या घेऊन नागरिक महापालिकेत आयुक्तांना तसेच क्षेत्रीय कार्यालयात भेटण्यासाठी येतात. मात्र बऱ्याच वेळा नागरिकांच्या प्रश्नाचे निराकारण होत नाही. नागरिकांना फक्त चकरा माराव्या लागतात. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. (Pune Municipal Corporation Latest News)

| सर्व खातेप्रमुखानी सोमवारी आणि गुरुवारी आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य

प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०.३० ते १२.३० वा. नागरिक त्यांच्या समस्येबाबत  महापालिका आयुक्त यांचे भेटीस येत असतात. या वेळेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण शक्यतो जागेवरच करणे व त्या अनुषंगाने संबंधित खातेप्रमुखांना  महापालिका आयुक्त सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०.३० ते १२.३० वा. महापालिका आयुक्त कार्यालय, येथे सर्व खाते प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ भोसले यांनी दिले आहेत.

| नागरिकांच्या प्रश्नाचे स्वरुप जाणून घेतले जाणार

याबाबत महापालिका आयुक्त डॉ भोसले यांनी सांगितले कि, आयुक्त कार्यालयात सर्व खाते प्रमुख यांच्यासोबत बसून नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले जातील. त्यांच्या प्रश्नाचे स्वरूप जाणून घेण्यात येईल. त्यानंतर एक रूपरेषा ठरवली जाईल. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कुठले प्रश्न सोडवायला हवेत, खाते प्रमुख स्तरावर कुठले प्रश्न सोडवले जातील, तसेच आयुक्त स्तरावर कुठल्या प्रश्नाचा निपटारा करायचा, याचा आढावा घेतला जाईल. याबाबत एक धोरण तयार केले जाईल. त्यानुसार नागरिकांना कमीत कमी वेळात त्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल, यावर अंमल केला जाईल. नागरिक केंद्रस्थानी ठेऊन या धोरणावर अमल केला जाईल. असेही आयुक्त डॉ भोसले यांनी सांगितले.

PMC IWMS System | पुणे महापालिकेची IWMS यंत्रणा खिळखिळी! | ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत ठोकावा लागला मुक्काम

Categories
Breaking News PMC पुणे

PMC IWMS System | पुणे महापालिकेची IWMS यंत्रणा खिळखिळी!

| ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत ठोकावा लागला मुक्काम

PMC IWMS System – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation (PMC) अंदाजपत्रकिय तरतुदी नुसार विविध विभागांमार्फत प्रकल्पीय, भांडवलीय आणि महसुली कामे निविदा प्रक्रियेतून (Tender Process) केली जातात. या  विकास कामांकरिता आणि बिले सादर करण्यासाठी सुधारित संगणक प्रणाली (Intelligent Works Management System ) वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही यंत्रणा खिळखिळी असल्याचे समोर आले आहे. कारण यंत्रणेतील त्रुटींचा महापालिका कर्मचारी आणि ठेकेदारांना फटका बसला. परिणामी या लोकांना गुरुवारी रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत मुक्काम करावा लागला. या यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी ठेकेदार संघटनेकडून करण्यात आली आहे. (PMC IWMS System)

पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) विविध विभागामार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. तसेच ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट पूर्णपणे भरणेची जबाबदारी ज्या विभागामार्फत डॉकेट मान्येतेसाठी सादर करण्यात येते त्या विभागातील संबधित कनिष्ठ अभियंता यांची राहील. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

तसेच सर्व विकास कामांचे पूर्वगणक पत्रक ( पु.ग.प.), जी. आय. एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लाँकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके ( एम. बी.) इत्यादी कामे IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार ही यंत्रणा काम करत आहे. मात्र यात त्रुटी असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्ष रविवार ३१ मार्चला संपत आहे. परंतू शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार आणि रविवार साप्ताहित सुट्टया असल्याने गुरुवारी महापालिकेमध्ये कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांनी (PMC Contractor) गर्दी केली होती. परंतू IWMS मधील तांत्रिक अडचणींमुळे ठेकेदारांसह कर्मचार्‍यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत आहे. अशातच गुरूवारी शेवटचा वर्कींग डे असल्याने मागील काही महिन्यांत महापालिकेची विविध कामे केलेले ठेकेदारांनी बिले सादर करण्यासाठी महापालिकेत गर्दी केली होती. यंदा प्रथमच महापालिकेने तयार केलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये म्हणजेच IWMS यंत्रणेत बिले सादर करायची असल्याने इंटरनेटमधील अडचणींमुळे व्यत्यय येत होता. तसेच सॉफ्टवेअरमध्येही काहीना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. अशातच संध्याकाळी उशिरापर्यंत महापालिकेने कुठलिच मुदतवाढ न दिल्याने अनेकांना रात्री उशिरापर्यंत बिले सादर करण्यासाठी थांबून राहावे लागले. दरम्यान यंत्रणेतील त्रुटी तशाच आहेत. फक्त औपचारिक पद्धतीने बिले पूर्ण केली आहेत.

– IWMS यंत्रणेत या आढळल्या त्रुटी

1)  High speed internet लावले तरी IWMS चे काम खूप हळू होते
2) बिलांची रक्कम  मॅच होत नव्हती. रकमेत तफावत दिसून आली.
3) एकच computer operator होता.
4) अवघे एक Bill ची file पूर्ण करायला २ तास लागले.
5) M.B चे item एका क्रमवारीत आले नाही त्यामुळे त्याला rearrange करायला लागते.  त्यामुळे त्याला वेळ लागला.

महापालिकेची IWMS यंत्रणा योग्यच आहे. मात्र त्यातील काही त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. फक्त ठेकेदारच नाही तर महापालिका कर्मचाऱ्यांना देखील यात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर कराव्या, अशी आमची महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे. 

विशाल भोसले, अध्यक्ष, महापालिका ठेकेदार संघटना. 

International Women’s Day 2024 | महिला दिनानिमित्त महापालिकेतील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सवलत

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

International Women’s Day 2024 | महिला दिनानिमित्त महापालिकेतील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सवलत

Pune – (The Karbhari News Service) – International Women’s Day 2024 | | जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महापालिकेतील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना (PMC Women Officers and Employees) विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7 मार्च ला अर्ध्या दिवसाची सवलत दिली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक (PMC Circular) महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. (International Women’s Day 2024)
दरवर्षी 8 मार्च ला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या निमित्ताने महिलांशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पुणे महापालिकेत देखील विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान यावर्षी 8 मार्च ला महाशिवरात्री निमित्त महापालिकेला सुट्टी आहे. त्यामुळे महापालिकेत 7 मार्च लाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7 मार्च महापालिका महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सवलत दिली जाणार आहे. (Pune PMC News)
प्रशासनाच्या परिपत्रकानुसार वर्ग 1 ते 3 मधील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना दुपारी 3 नंतर सवलत दिली जाणार आहे. तर वर्ग 4 मधील सेविकांना सकाळी 10:30 नंतर अर्ध्या दिवसाची सवलत दिली जाणार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या खात्यातील महिला याबाबत अवगत करण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
The Karbhari- PMC Circular

PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका

| 95 लाखांचा येणार खर्च

PMC Wheelbarrow | पुणे महापालिकेच्या )Pune Municipal Corporation) विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कचरा गोळा केला जातो. हा संकलित केलेला कचरा वाहतुक करण्यासाठी ढकल गाड्यांची (Pushkarts) आवश्यकता असते. त्यामुळे क्षेत्रीय कार्याकाया कडून मागणी केली जाते. त्यानुसार 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो (Wheelbarrow) महापालिका खरेदी करणार आहे. यासाठी 95 लाखांचा खर्च येणार आहे. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)

पुणे मनपा मोटार वाहन विभागाच्या कर्मशाळा विभागाकडून मनपाच्या विविध कार्यालयातील लाकडी फर्निचर दुरुस्ती, नवीन तयार करणे तसेच कचरा संकलनासाठी उपलब्ध तरतूदीनुसार ढकलगाडे, व्हिलबॅरो खरेदी करुन पुरविणे त्यांची दुरुस्ती करणे व इतर तदनुषंगिक कामे करण्यात येतात. पुणे मनपाच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीमधील विविध ठिकाणावरून ओला व सुका कचरा संकलनाचे काम मनपा सेवक व स्वच्छ संस्थेमार्फत करण्यात येते. विविध ठिकाणावरून संकलित केलेला कचरा उचलणे व तो अनलोडिंगच्या ठिकाणापर्यंत वाहतुक करणेसाठी सेवकांमार्फत ढकलगाडे, व्हिलबॅरो, गाळगाडे यांचा वापर केला जातो. (PMC Solid Waste Management Department)

केंद्र शासनाकडील १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पुणे महानगरपालिकेला सन २०२०-२१ ते २०२५-२६ एस डब्ल्यू वॉटरसाठी सुमारे ४५८ कोटी टप्याटप्याने वितरीत करण्यात येत आहे. यामधील पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार २ बकेट असलेली १५०० नग व्हिलवॅरो (पुशकार्टस) व ४ बकेट असलेली १५०० नग ढकलगाड्या (पुशकार्टस) खरेदी करणे कामी  महापालिका आयुक्त यांची मान्यता मिळाली आहे.
तथापि, मोटार वाहन विभागाकडे याकामासाठी तांत्रिक सेवकवर्ग अत्यंत अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने घनकचरा विभागाचे मागणीनुसार विविध क्षेत्रीय कार्यालयासाठी २ बकेटसह असलेले व्हिलबॅरो (पुशकार्टस) पद्धतीने जाहीर निविदा मागवुन खरेदी करणे प्रस्तावित होते.  त्यानुसार याची टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. हे काम पायल इंडस्ट्रीज ला देण्यात आले आहे. यासाठी 95 लाख इतका खर्च येणार आहे.

Mahatma Phule Mandai | Pune | मेट्रो आणि पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने  महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट

Categories
Breaking News PMC social पुणे

 मेट्रो आणि पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने  महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट

महात्मा फुले मंडई येथे मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम वेगाने सुरु आहे. महात्मा फुले मंडईची ऐतिहासिक वास्तू आणि त्या परिसरात असणारे विविध वस्तूंचे मार्केट, दुकाने  यामुळे हा परिसर अतिशय गजबजलेला असतो. तसेच कसबा पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठ या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वास्तू आहेत, जसे कि लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा, पुण्याचे ग्राम दैवत कसबागणपती आणि तांबडी जोगेश्वरी, दगडूशेट गणपती, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग इ. या सर्व ठिकाणांना जोडण्यासाठी आणि एक ‘हेरिटेज वॉक’ द्वारे या ठिकाणांची माहिती देण्यासाठी पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांनी एक आराखडा बनवला असून त्यासंबंधीच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारावर पुणे महानगरपालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे मेट्रोतर्फे अतुल गाडगीळ, संचालक (कार्य) यांनी स्वाक्षरी केली.

यानिमित्त मंडई परिसरात घेण्यात येणाऱ्या कामांची सूची-

१. मंडई मेट्रो स्थानक आणि बुधवार पेठ मेट्रो स्थानक यामुळे या परिसरात वाहतुक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे. त्याअनुषंगाने बस थांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीन चाकी, चारचाकी पार्किंग यांचा सर्वसमावेशक विचार करून वाहतूक कोंडी कमीकरण्यासाठी उपाययोजना करणे.

२. पादचाऱ्यांसाठी पादचारी मार्ग आणि भूमिगत पादचारी मार्ग यांचे योग्यनियोजन करून या परिसरात हेरिटेज वॉक टूरसाठी आवश्यक त्याबाबींची पूर्तता करणे. या परिसरात असणाऱ्या ऐत्याहासिक वास्तू, तांबटआळी, बुरुड आळी धार्मिक स्थळे, म. फुले मंडई आणि तुळशीबाग यासर्व ठिकाणे सहज पायी चालत जाण्याजोगी आहेत. त्यामुळे ‘सेल्फगाईडेड ऑडिओ टूर’ सुरु करण्याचे नियोजन आहे.

३. मेट्रो कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे मंडईच्या बाजूला नवीनभवन बांधून पुनर्वसन करणे. हे नवीन भवन जुन्या मंडईच्या भवनालाअनुरूप असे असेल. नवीन भावनांचेबाह्यरूप हे मंडईच्या हेरिटेज वास्तूलासाम्य असणारे बनविण्यात येणार आहे.

४. तसेच मंडई परिसरात एक टेरेस ओपन एअर थिएटर बांधण्यात येऊनवेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी लागणाऱ्या सोयीची पूर्तताकरण्यात येईल.

५. मंडईच्या मुख्य वास्तूच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी ‘स्पेशल बॅरिअर फ्रीपेडेस्ट्रीयन झोन’ बनविण्यात येईल. या भागात दुचाकी, तीन चाकी, चारचाकी अश्या वाहनांना मज्जाव असेल.

महात्मा फुले मंडई परिसरात विकासासाठी अंदाजे ११.६८ कोटी खर्चयेणार असून पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका हे दोघे मिळून हा खर्चकरणार आहेत. या कामामुळे मंडई परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतहोऊन भूमिगत पादचारी मार्गांमुळे पादचाऱ्यांसाठी विना अडथळा यापरिसरात फिरणे शक्य होणार आहे. हेरिटेज टूरमुळे पर्यटकांना यापरिसराची इत्यंभूत माहिती व अनुभव घेता येईल. ओपन एअर थिएटरमुळेविविध सांस्कृतिक कार्यक्रम करणे शक्य होणार आहे. महात्मा फुले मंडईयेथील मेट्रो स्थानकामुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर महात्माफुले मंडई आणि परिसराशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या परिसरातीलव्यापारउदीम वाढण्यास मदत होईल.

यापरासंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, “महामेट्रो केवळ मेट्रो स्थानकांच्या विकासाव्यतिरिक्तमेट्रो स्थानकांभोवतीच्या परिसराचादेखील विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे महानगरपालिका यांच्या सहकारीमुळे महात्मा फुलेमंडई परिसराचा विकासाचा आराखडा करण्यात आला आहे. प्रस्तावितआराखड्यामुळे या परिसराचे रूप पालटणार आहे. संपूर्ण महात्मा फुलेमंडई पादचारी स्नेही करण्यात येणार आहे.”

Election of representatives of Hawkers | पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात! | महापालिकेने मागवल्या हरकती सूचना

Categories
Breaking News PMC पुणे

पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात!

| महापालिकेने मागवल्या हरकती सूचना

गेल्या एक ते दीड वर्षापासून रखडलेली शहरातील पथारी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची निवडणूक प्रक्रिया अखेर महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. निवडणुकीसाठीची 22,899 नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांची यादी महापालिका प्रशासनाने शनिवारी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीवर पुढील 15 दिवसांत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत.

केंद्र शासनाच्या पथ विक्रेता (पथ विक्रेता व उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) 2014 नुसार, पथारी व्यावसायिकांच्या शहर फेरीवाला समितीसाठी पथपदाथावरील विक्रेत्यांचे प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठीची 22,899 नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांची यादी महापालिका प्रशासनाने शनिवारी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीवर पुढील 15 दिवसांत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये, पाच परिमंडळे तसेच अतिक्रमण विभागात या मतदार याद्या उपलब्ध असून, त्यावर 5 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. या हरकतींच्या सुनावनीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करून पालिकेकडून पथारी व्यावसायिक प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, करोनामुळे ही प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नव्हती.

नगरविकास विभागाने फेरीवाला समितीसाठी पथारी संघटनांचे प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणूकीसाठी हजार मतदारांची प्रारूप यादी जाहीर केली आहे. ही मतदार यादी अंतिम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक पार पडेल.
माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Repaired 90% potholes | महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा  | शहरात मात्र खड्डेच खड्डे 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा

| शहरात मात्र खड्डेच खड्डे

पुणे महानगरपालिकेच्या जुन्या व नवीन समाविष्ट गावांमध्ये पावसाळ्यामध्ये पथ विभागामार्फत रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून गेल्या तीन दिवसात सुमारे 90% खड्डे दुरुस्तीची कामे व चेंबर दुरुस्तीची कामे तसेच पावसाचे पाणी साठल्याच्या ठिकाणाचे निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असा दावा महापालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि शहरात रस्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा दावा पोकळच ठरत आहे.

पथ विभागामार्फत खालील प्रकारे कामे करण्यात आलेली आहेत

1. कोल्ड मिक्स डांबरीमाल वापरून
2. कोल्ड इमल्शन वापरून
3. जेट पॅचर मशीनद्वारे
4. पूनावाला ग्रुप यांचे मशीनद्वारे
5. केमिकल युक्त काँक्रीट वापरून
पथ विभागाकडील 5 रोलर व 15 आर एम व्ही टीम तीन पाळीमध्ये अहोरात्र काम करून पथ विभागाकडील सर्व अभियंते आपापल्या कार्यक्षेत्रात काम करीत आहेत.

दिनांक 16.7.2022 ते 18.7.2022 या कालावधीत खालील प्रमाणे कामे करण्यात आलेली आहेत.
1. खड्डे दुरुस्ती =968
2. चेंबर उचलणे =65
3. पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची ठिकाणे =11
वरील कामांसाठी पथ विभागामार्फत खालील प्रमाणे माल मटेरियल वापरण्यात आलेले आहे.
1. कोल्ड मिक्स =1260बॅग
2. इमल्शन ड्रम =50
3. खडी /ग्रीट =50 टन

पथ विभागामार्फत अनाधिकृत पणे खोदाई करणाऱ्याना आळा बसवण्यासाठी, भरारी पथकाची अहोरात्र नेमणूक करण्यात आली आहे.(रविवार वगळून) नागरिकांना तक्रार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे तक्रारीसाठी नागरिकांना खालील जनसंपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.

1. कार्यालयीन वेळेत – 020-25501083
2. फिरते पथक मो. नं.+91-9049271003

Pune Rain | खडकवासला साखळीतील चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!  | पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका 

Categories
Breaking News PMC social पुणे

खडकवासला साखळीतील ४ चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!

| पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी  झाला आहे. दरम्यान आता हे पाणी आगामी ५ महिने पुरेल इतके आहे. त्यामुळे आता पुणे शहरात पाणीकपात होईल, अशी शक्यता  दिसत नाही. असे प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.

खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात होईल असे चित्र दिसत नाही. ह पुणेकरांसाठी दिलासाच आहे.

धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ५  महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला होता. शनिवारी सायंकाळी हा साठा ६.९५ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८५ मिमी, वरसगाव ८६  मिमी तर टेमघर धरणात १०० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.