Tag: aashadhi wari
Aashadhi Wari 2023 Timetable | आषाढी वारी २०२३ चे वेळापत्रक जाणून घ्या
११/०६/२०२३
माऊली प्रस्थान आळंदी
१२/०६/२०२३ आळंदी ते पुणे, २९ कि.मी
१३/०६/२०२३ पुणे मुक्काम
१४/०६/२०२३
पुणे ते सासवड, ३२ कि.मी*
१५/०६/२०२३ सासवड मुक्काम
१६/०६/२०२३ सासवड ते जेजुरी,१६ कि.मी
१७/०६/२०२३ जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी
१८/०६/२०२३ वाल्हे ते लोणंद,२० कि.मी
१९/०६/२०२३ लोणंद मुक्काम
२०/०६/२०२३ लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी
२१/०६/२०२३ तरडगाव ते फलटण २१ कि.मी .
२२/०६/२०२३ फलटण ते बरड, १८ कि.मी
२३/०६/२०२३ बरड ते नातेपुते, २१कि.मी
२४/०६/२०२३ नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी
२५/०६/२०२३ माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी
२६/०६/२०२३ वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी
२७/०६/२०२३ भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी
२८/०६/२०२३ वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी
२९/०६/२०२३ : देवषयनी आषाढी एकादशी
आषाढी एकादशी च्या पुढे ३ जुलै पौर्णिमा पर्यंत दिंडीचा पंढरपुर मुक्काम, ३ जुलै ला गोपाळ काला व परतीचा प्रवास
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
Sant Tukaram Maharaj Palkhi Soahala| ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari 2023) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) आज पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala)
देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आदी पूजेला उपस्थित होते.
पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. (Pandharpur Wari)
महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
News Title |Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | Departure of Sant Tukaram Maharaj palanquin to the alarm of tala-mridanga
Palkhi Sohala 2023 | मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर
Palkhi Sohala 2023 | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या (Marathwada Charitable Trust) वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर (Water Tanker) देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीवर पंढरपूरपर्यंत (Pandharpur) चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. (Palkhi Sohala 2023)
मराठवाडा जनविकास संघाच्या (Marathwada Janvikas Sangh) वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे व मुख्य पालखी सोहळ्यासोबत असे चार पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत. (Pandharpur Wari)
या टँकरचे पूजन पिंपळे गुरव येथे करण्यात आले. यावेळी संतासेवक, ह ,भ ,प ,मारुती ज्ञानोबा कोकाटे अध्यक्ष: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ह.भ. प. तांदळे महाराज, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, शशिकांत महाराज कुलकर्णी, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक नाना काटे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप अण्णा जोगदंड प्रा.गणेश ढाकणे, रवींद्र जाधव अमोल नागरगोजे, अमोल लोंढे, विकास आघाव, सुरेश कंक त्रिमुख यलुरे, गोरक्ष सानप, हनुमंत घुगे, प्रभाकर साळुंके, उमाकांत तलवाडे, धनराज धायडे, राजू रेड्डी, किशोर अट्टरगेकर, म्हाळप्पा म्हेत्रे, अनिल पाटील, रंजीत कनकट्टे, शोभा माने, मीनाक्षी खैरनार, विजया नागटिळक, विश्वनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते. (Aashadhi wari 2023)
अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ह.भ.प. तुकाराम सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.
——————————–
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अरुण पवार यांचा ५००० वर्ष लागवड करण्याचा संकल्प :
राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५००० वर्ष लागवड करण्याचा संकल्प मराठवाडा ग्रामीण विकास संघाच्या वतीने अरुण पवार यांनी केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यातील ५ ते ६ फूट उंचीच्या ५०० झाडांचे वाटप चार टँकर पूजन कार्यक्रमात करण्यात आले. उर्वरित वृक्षारोपण पाऊस झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
News Title | Palkhi Sohala 2023 | Four tankers of drinking water along with Palkhi ceremony by Marathwada Charitable Trust
Palkhi Sohala 2023 | पालखी मुक्काम कालावधीत पुणे महापालिका 3093 पोर्टेबल स्वच्छतागृह पुरवणार
| महापालिकेच्या घनकचरा विभागाची पालखीची तयारी पूर्ण
Palkhi Sohala 2023 | सालाबादप्रमाणे श्री. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) यांचा आषाढी पालखी सोहळा (Aashadhi Palkhi Sohala) पुणे शहर मार्गे पंढरपूर (Pune Via Pandharpur) येथे जाणार आहे. दोन्ही पालख्यांचा १२ जून २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत पुणे शहरात (Pune City) मुक्काम असणार आहे. पुणे शहरात सन २०२३ च्या पालखी साठी क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार पहिल्या दिवशी १२९० Portable Toilet सीट्स व दुस-या दिवशी १२९० Portable Toilet सीट्स तसेच तिसऱ्या दिवशी ५१३ Portable Toilet सीट्स असे एकूण ३०९३ Portable Toilet सीट्स पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023)
Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा
Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये
Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील (Solapur, pune, Satara District) पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी (Nirmal Wari) ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे. (Pandharpur Aashadhi Wari palkhi sohala)
आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Rural devlopment minister Girish Mahajan) यांनी सांगितले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे. (Aashadhi ekadashi)
पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. (Aashadhi wari palkhi sohala)
पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
News Title | Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| 4 crore 21 lakhs for Nirmal Vari to Gram Panchayats of Solapur, Pune and Satara districts