Music School PMC : Deeapali Dhumal : संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा  : शिक्षण समिती समोर प्रस्ताव

Categories
Education PMC Political पुणे

संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करा

: शिक्षण समिती समोर प्रस्ताव

पुणे : 2013 साली महापालिकेच्या वतीने प्रभात रोड वर श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे बंद आहे. कोरोनाचा प्रसार आता कमी झाला आहे. त्यामुळे आता हे संगीत विद्यालय सुरु करावे. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी केली आहे. तसा प्रस्ताव शिक्षण समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रस्ताव

शिक्षण समिती समोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार २०१३ साली शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना पुणे प्रभात रोड गल्ली नं.१५ पुणे महानगरपालिकेच्या इमारती मध्ये पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने ई-लर्निंग व श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय सुरू करण्यात आले होते. आज तगायात हजारो विद्यार्थी या संगीत विद्यालयाच्या माध्यमातुन तबला वादन, हार्मोनियम, गायन इति या संगित क्षेत्रात या संगित विद्यालयामार्फत घडविण्यात आले आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये संगित प्रशिक्षणा मध्ये अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उर्तीण झाले आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम पुणे मनपाच्या शाळांमध्ये सुरू आहे.परंतु मागील दोन वर्षापासुन कोरोना काळात सदर उपक्रम बंद होता. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे सर्व शाळा देखील पुर्ववत नियमित सुरू झाल्या असुन श्री.संत तुकाराम महाराज संगीत विद्यालय नियमित सुरू करण्यात यावे. अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.