Health Scheme | शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख करा

| अभिजित बारवकर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | राज्य सरकारच्या (State Govt) धर्तीवर महापालिकेच्या (PMC Pune) शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार रुपये करा, अशी मागणी अभिजित बारवकर (Abhijit Baravkar) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

बारवकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाकडील अधिसूचनेनुसार निर्धन व गरीब घटकातील रुग्णासाठी वार्षिक उत्पनाची अट हि ७५०००/- वाढवून 1 लाख ६० हजार अशी करण्यात आली आहे. पुणे मनपाच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे वार्षिक उत्पनाची अट १ लाख आतील असल्यामुळे नागरिकांना तहसीलदार उत्पन दाखला काढताना नाहक त्रास होत आहे, त्यामुळे नागरिक चुकीची उत्पनाबाबतची माहिती देत आहेत. तरी आपणास विनंती आहे कि, महाराष्ट्र शासनाकडील २३/२/२०१८ अधिसूचनेनुसार शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख पर्यंत अशी अट करण्यात यावी. असे बारवकर यांनी म्हटले आहे. (pune municipal corporation)

Stray Dogs | भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा

| अभिजित बारवकर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | शहरात शहरात गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्याचा (Stray Dogs) प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्याची संख्या लाखाच्या पुढे पोहचली असून मागील 2 वर्षात शहरातील १० हजाराहून अधिक नागरिकाचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार ANIMAL BIRTH CONTROL MONITORING COMMITTEE स्थापन करा. अशी मागणी अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Administrator Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

याबाबत बारवकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार याचिकेमधील आदेशानुसार भटक्या कुत्र्यामुळे होणाऱ्या वाढत्या नागरी त्रासामुळे त्याची संख्या मर्यादित ठेवणे, मनुष्य – कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार ANIMAL BIRTH CONTROL MONITORING COMMITTEE स्थापन करणेबाबत आदेश झाले आहेत.

शहरात गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्याची
संख्या लाखाच्या पुढे पोहचली असून मागील 2 वर्षात शहरातील १० हजाराहून अधिक नागरिकाचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. रात्रीच्या वेळी पादचारी, वाहनचालकाच्या मागे हि
कुत्री धावतात, परिणामी अपघाताला निमंत्रण मिळते. त्यामुळे  सर्वोच्य न्यायालयच्या आदेशानुसार ANIMAL BIRTH CONTROL MONITORING COMMITTEE स्थापन करून भटक्या कुत्र्यावर नियंत्रण येईल. असे बारवकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Manual scavengers | हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी नियुक्तीस मनाई करा

Categories
Breaking News PMC social पुणे

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी नियुक्तीस मनाई करा

| अभिजित बारवकर यांची मागणी

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचारी (Manual scavangers) नियुक्तीस प्रतिबद्ध करण्याची मागणी माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर (Abhijit Baravkar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांचे  पुनर्वसन करणे अधिनियम 2013 कायद्याची प्रभावी अंबलबजावणी पुणे महापालिकेकडून (PMC Pune) करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

बारवकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रामध्ये सफाई कर्मचारी चेंबर्स व मलवाहिन्यांतील साफसफाई सद्यस्थितीत पारंपारिक पद्धत, अपुऱ्या यंत्रसामुग्री व हाताने केली जातं आहे. दररोज मनपाचे व ठेकेदार नियुक्त सफाई कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय मलवाहिन्यामध्ये रॉड व इतर साहित्याने मैला काढून साफसफाई करत आहेत. काही कर्मचारी फावडे आणि घमेले घेऊन मैला काढत आहेत. अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजघटकांकडून हे काम करण्यात येत असून ते अशिक्षित असल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. (Pune Municipal corporation)

आपली महापालिका स्वच्छते बाबत राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषिके मिळवित असून उपरोक्त कायद्याचे अनुपालन करीत नाही ही बाब लाजिरवाणी आहे. याबाबत आम्ही 2 वेळा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्ली यांचेकडे तक्रार केली असता, उप आयुक्त, घनकचरा विभाग यांनी याबाबत उपरोक्त नमूद कायद्याद्वारे कारवाई न करता राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली यांस असे परत पुणे महापालिकेकडून घडणार नाही असे कळविले आहे. सदर कायद्याचे प्रभावी अनुपालन होणेकामी संबंधित उप आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त, संबंधित अभियंते, संबंधित आरोग्य निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करावी. त्याचे  अनुपालन पुणे महापालिकेकडून न झाल्यास त्या त्या महापालिका सहाय्यक आयुक्त यांस अथवा संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून सदर कायद्यानुसार त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे ही निवेदनात म्हटले आहे. या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल आम्हास व राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्ली यांस लेखी स्वरूपात कळविण्यात यावा. अशी ही मागणी करण्यात आली आहे. (PMC Commissioner Vikram Kumar)

Resolutions of the subject committees : प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत

: ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्याची मागणी

पुणे : महापलिकेत प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत.  त्यामुळे हे ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्याची मागणी माजी स्वीकृत सभासद अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

बारवकर यांच्या निवेदनानुसार महापालिका मुख्य सभा विसर्जित झाल्यापासून प्रशासन राजवट आल्यापासून दिनांक १३/४/२०२२ पासून पुणे महानगरपालिका चे संकेतस्थळवर मुख्य सभा , स्थायी व इतर समिती चे एकही ठराव उपलब्ध करण्यात आलेले नाही . सदरची गोष्ट ही लोकाभिमुख कारभारा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .व तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (1) (क) आणि कलम 4 (1) (ख) तसेच कलम 5(1) व 5(2) आजही अंमलबजावणी काटेकोरपणे केलेली दिसत नाही.

विनंती आहे की , मुख्य सभा , स्थायी व इतर समितीचे ठराव पालिका संकेतस्थळवर प्रसिध्द करण्यात यावेत.

Gov. Schemes : Abhijit Barawkar : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत शासकीय योजनांचे कार्ड वाटप : शहर चिटणीस अभिजित आणि दिपाली बारवकर यांचा उपक्रम 

Categories
Political पुणे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत शासकीय योजनांचे कार्ड वाटप

: शहर चिटणीस अभिजित आणि दिपाली बारवकर यांचा उपक्रम

पुणे : लोकनेते खासदार  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी मैदान, दत्तवाडी, पुणे येथे विविध शासकीय योजनांच्या कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा  कार्यक्रम राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मीटर, याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर चिटणीस  अभिजित बारवकर व  दिपाली अभिजित बारवकर यांनी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे कार्ड वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पवार साहेबांनी नेहमीच लोकसेवेला प्राधान्य दिलं आहे, आज हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल साहेबांनाही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटेल हा विश्वास व्यक्त करतो.

यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष  रविंद्र माळवदकर, नगरसेविका अश्विनी कदम, नगरसेविका प्रिया गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष  नितीन कदम, कसबा विधानसभा अध्यक्ष  गणेश नलवडे, शहर प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  महेश हांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते