PMC: Transfers orders: अधिकार नसताना अतिरिक्त आयुक्तांच्या परस्पर खातेप्रमुख सेवकांच्या करताहेत बदल्या

Categories
Breaking News PMC पुणे

अधिकार नसताना अतिरिक्त आयुक्तांच्या परस्पर खातेप्रमुख सेवकांच्या करताहेत बदल्या

:खाते प्रमुखांवर  प्रशासकीय कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी  अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत करतात. ही बाब चुकीची असल्याने आगामी काळात खाते प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

: बदल्यांचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे धोरण महापालिका सभेने  मंजूर केलेले आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी – ब ते श्रेणी – ड मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना सुपूर्त केलेले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात/खात्यात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत

करतात.  सुपूर्त केलेले बदलीचे अधिकार बाबत अवलोकन  केल्यास खातेप्रमुख अधिकार नसताना बदली आदेश पारित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठानी दिलेल्या आदेशात परस्पर फेरबदल करणे तसेच वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व  आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही.
तरी, सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार अधिकारी/ कर्मचारी यांना बदलीचे खात्यात रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच बदल्यांचे आज्ञापत्रामध्ये / आदेशामध्ये खातेप्रमुख यांनी परस्पर फेरबदल करू नयेत. अशाप्रकारे फेरबदल केल्याचे / बदली आज्ञापत्राची / आदेशाची अंमलबजावणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

PMC : Ravindra Binwade : कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त  : महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

कोरोनाचे काम करणारे पीएमपी चे सर्व कर्मचारी कार्यमुक्त

: महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

: ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

पुणे : कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने पीएमपी चे कर्मचारी कोरोनाच्या विविध कामासाठी नियुक्त केले होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांना काम कमी आहे. याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.

: कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नियुक्त केले होते कर्मचारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्याला तोंड देण्यासाठी पालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले.  क्वारंटाईन रूमपासून विविधकक्षांवर  प्रशासनाची देखरेख होती.  त्याचबरोबर सर्वेक्षणाचे कामही सुरू होते.  त्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  त्यानंतर पीएमपीचे कर्मचारीही या कामात गुंतले होते.  शहरात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी महापालिकेकडून अनेक प्रयत्न केले जात होते.  महामंडळाने आपल्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.  यामध्ये क्वारंटाईन रूम आणि आयसोलेशन रूममध्ये काम करणे, सर्वेक्षण करणे, कोरोनाच्या कामाचा अहवाल देणे, निवारागृहांमध्ये काम करणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांबाबत जनजागृती करणे, अशा कामांचा समावेश आहे.  त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांना काम दिले आहे.  यामध्ये पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम कमी आहे.  याबाबत ‘द कारभारी’ ने वृत्त दिले होते. त्यानुसार आता पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आपल्या मूळ कामावर रुजू होण्याचे आदेश या कर्मचाऱ्याना देण्यात आले आहेत.  महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आदेश जारी केले आहेत.