Ajit Pawar | एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार

Categories
Breaking News Political पुणे

Ajit Pawar | एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार

 

Ajit Pawar | Pune News | पुणे | प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले. (Ajit Pawar | Pune News)

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी  करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहेत. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.

आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.

सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भांबुर्डा येथील सारथी मुख्यालय, ‘शिक्षण भवन’ वास्तू बांधकाम, शिवाजी नगर येथील प्रस्तावित ‘कृषी भवन’ इमारत, साखर संकुल येथील सहकार आयुक्त कार्यालय आणि वाकडेवाडी येथील ‘कामगार भवन’ इमारतीच्या जागेची पाहणी केली.
0000

Ajit Pawar | चांगले मित्र निवडा, नैतिकतेचा विसर पडू देऊ नका | अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar | चांगले मित्र निवडा, नैतिकतेचा विसर पडू देऊ नका | अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 

Ajit Pawar | विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा नावलौकिक उंचवावा. यशाची शिखरे गाठताना शाळेला किंवा शिक्षकांना विसरू नये. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले मित्र निवडावे. नैतिकतेचा विसर पडू देऊ नये आणि नियमित व्यायाम करावा. व्यसनापासून दूर रहात आवडते छंद जोपासावे. आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखत शाळेचा आणि देशाचा नावलौकिक उंचवावा, असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी उपस्थित होते. (Teacher Award)

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी यासाठी योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या काळातील आव्हाने ओळखून पारंपरिक विचार न करता नवे आणि आवडीचे क्षेत्र निवडावे,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहीचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीने शिकविता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावे. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही श्री.पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षांपासून १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंपरागत शिक्षण पद्धतीत रोजगार देण्याची क्षमता आणि विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला कमी वाव होता. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पुढील वर्षांपासून पहिलीच्या आधीची तीन वर्षे महत्वाची मानली जाणार आहेत. या तीन वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून परंपरेविषयी अभिमान निर्माण व्हावा असा प्रयत्न आहे. संस्कारावर भर, शालेय स्तरापासून व्यवसायाभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण या बाबींवरही लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक प्रवाहांचा विचार करण्याची गरज आहे. जगाला ज्ञानवान, कर्तृत्ववान आणि आपल्या कामाप्रति निष्ठा असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. असे विद्यार्थी घडावेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात ३ हजार ६६८ शाळा असून प्रत्येक गणातून २ शिक्षकांची निवड पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी जिल्हाभर मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आले.

Maha DBT Portal | ‘महाडीबीटी’ मार्फत मिळणारा लाभ नाकारता येण्यासाठी; दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन देणार

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maha DBT Portal | ‘महाडीबीटी’ मार्फत मिळणारा लाभ नाकारता येण्यासाठी; दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन देणार

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Maha DBT Portal | राज्य शासनामार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत (Maha DBT Portal) अनुदानाचे थेट हस्तांतरण करण्यात येते. मात्र एकदा मिळालेले अनुदान परत करण्यासंदर्भात व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही त्यांना ते नाकारता येण्यासाठी दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) या प्रश्नी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना दिली. (Maha DBT Portal)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरचे अनुदान (LPG Cylinder Subsidy) नाकारण्यासाठी ‘पहल’ सुविधा निर्माण केली होती. या अंतर्गत अनुदानाची आवश्यकता नसणाऱ्या महाराष्ट्रातील 16 लाख 52 हजार लाभार्थ्यांनी आपले अनुदान नाकारले. या योजनेचे सर्वत्र कौतुक झाले. यामुळे एक वेगळा, चांगला पायंडा पडला. या योजनेत नाकारलेले अनुदान इतर गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मिळू शकते. राज्य शासनामार्फत विविध योजनांचे अनुदान ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून दिले जाते. मात्र ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही त्यांना अनुदान नाकारण्यासाठी कोणतीही व्यवस्था पोर्टलमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वित्त विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधून अनुदान नाकारण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. ही प्रक्रीया जलद गतीने राबवून येत्या दोन महिन्यात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


News Title | Maha DBT Portal | To deny the benefit through ‘MahaDBT’; Arrangement will be made available in two months | Deputy Chief Minister Ajit Pawar’s information

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा? 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा?

Pune Lok Sabha By-election | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha  constituency) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताकदीचा हवाला देत दावा केला आहे कि पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवणार.  पुण्याची लोकसभेची जागा परंपरेनुसार काँग्रेसनेच (INC)  लढवली आहे. त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) साथीदाराला फारसे पटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता मानली जात आहे. (Pune Lok Sabha By-election)
 पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार  गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीने यावर दावा केला आहे. याआधी देखील पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP pune City President Prashant Jagtap) यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला होता.   महाविकास आघाडीत  – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) हे पक्ष आहेत.  काँग्रेस परंपरेने पुणे लोकसभेची जागा लढवत आहे आणि पवारांच्या विधानामुळे युतीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. (Pune Lok Sabha bypoll)
अजित पवार म्हणाले कि, “माझे मत आहे की, निवडणुका जाहीर झाल्या की ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद जास्त असेल त्याला तिकीट मिळाले पाहिजे.  आता कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे हे कसे ठरवायचे?  तुम्ही महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुकांमधील निवडणूक निकाल पहा आणि विश्लेषण केल्यास पक्षांची तुलनात्मक ताकद दिसून येईल.  पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे अनेक आमदार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांना तुम्ही खाजगीत विचाराल तर ते सांगतील की कसबा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना खूप मदत केली,” (Pune Lok Sabha by-election)
 पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) मागील निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तर काँग्रेसची फारशी कामगिरी झाली नाही.  पुणे शहरातून काँग्रेसकडे फक्त एकच आमदार आहे, तर राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
 पवार म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीला कमी अवधी असल्याने पोटनिवडणूक होऊ शकत नाही, असे आयोगाने यापूर्वी सांगितले होते, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे त्यांचे मत बदलले आहे.  “माझ्या मते सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष उरले आहे, त्यामुळे पुणे लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार नाही.  पण आता मला अंतर्गत वर्तुळातून असे कळले आहे की निवडणुका जाहीर होण्याची तयारी सुरू आहे,” (NCP Leader Ajit Pawar)
 पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक मानकरही नशीब आजमावण्यास इच्छुक आहेत.  दुसरीकडे काँग्रेसने ही जागा लढवावी, असा आग्रह धरला आहे.  या जागेसाठी काँग्रेस नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) , मोहन जोशी (Mohan Joshi) आणि रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे मोजकेच दावेदार आहेत.
 “निवडणुकीबाबत कोणताही निर्णय उच्च पातळीवर घेतला जातो.  आम्ही राज्यातील नेत्यांना आधीच कळवले आहे की काँग्रेस पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. कारण पुणे जिल्ह्यातील उर्वरित लोकसभेच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे,” असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. (Ajit Pawar)
 पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते, या संकेतावर जिल्हा निवडणूक कार्यालयाने नुकतेच मॉक पोलिंग केले.  पुणे महानगरपालिकेने निवडणूक ड्युटीवर असलेल्या 120 नागरी अधिकार्‍यांना देखील मॉक पोलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.  गैरहजर असलेल्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असाही इशारा महापालिकेने दिला होता. (Pune Lok Sabha bypoll mock polling)
 बापट यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला एक वर्ष बाकी असताना या वर्षी २९ मार्च रोजी निधन झाले.  काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करून मे 2019 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते.  कायद्यानुसार लोकसभेची जागा सहा महिन्यांपेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही. (MP Girish Bapat)
 संभाव्य पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची बरीच उत्सुकता आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष बाकी आहे आणि पोटनिवडणुकीचा निकाल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल निश्चित करेल.  नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हेमंत रासने  यांचा पराभव केला होता.  भाजपने मागील सहा निवडणुकांमध्ये जागा जिंकून पुण्याच्या राजकारणावर आपली पकड सिद्ध करण्यासाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.  भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक झाली होती. (Pune Lok Sabha constituency)
—-
News Title | Pune Lok Sabha By-election | Pune Lok Sabha By-Election | Why does Ajit Pawar want the seat of Pune despite the possibility of failure in the alliance?

Supriya Sule | Ajit Pawar | मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 

: सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी 

पुणे : देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण केलं पण अजित पवार यांना भाषण करू दिले गेले नाही. त्यामुळं यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचं होतं, याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आलं नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळं हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथं भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करु द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणं लोहगाव विमानतळ ते देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाणं अजित दादांना हजर राहणार हा प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

देहू संस्थानने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, “हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.