Pune Water Cut Update |  पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द! | पुणेकरांना दिलासा 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update |  पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द!

| पुणेकरांना दिलासा

Pune Water Cut Update | संत ज्ञानेश्वर महाराज  (Sant DnyaneshwarMaharaj Palkhi) व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या (Sant Tukaram Maharaj Palkhi) पुण्यात असल्याने सोमवारची पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. याबाबत मागणी झाल्यामुळे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून (PMC Water Supply Department) हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (PMC Head of water supply department Aniruddha Pawaskar) यांनी दिली. (Pune Water Cut Update)
याबाबत माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख  यांची भेट घेत पाणी कपात रद्द करण्याबाबत पत्र दिले होते.  सोमवारी आणि मंगळवारी पालख्या पुणे शहरात मुक्कामाला आहेत. दरवर्षी  लाखो वारकरी पुण्यामध्ये वारीला जात असताना मुक्कामी येतात. पुणेकर देखील त्यांची सेवा मनोभावे करतात. यथोचित आदरातिथ्य करतात. पुणे शहरातील  सिंहगड रस्त्यासह पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येतो. परंतु, पालख्यांचे आगमन पाहता, हा पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता शहरात सोमवारी पाणी बंद असणार नाही. पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे. (Pune Municipal corporation)
—-
News Title |Pune Water Cut Update | Monday’s water cut canceled in Pune city!| Relief for Pune residents

Pune Water Cut New Timetable | पुणे महापालिकेकडून आता पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक | जाणून घ्या तुमच्या परिसरात कधी पाणी बंद असणार? 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut New Timetable | पुणे महापालिकेकडून आता पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक | जाणून घ्या तुमच्या परिसरात कधी पाणी बंद असणार?

Pune Water Cut New Timetable | पुणे महापालिकेकडून (pune Municipal Corporation) पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणीकपात (water cut) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात दर गुरुवारी पाणी बंद (Pune water cut on Thursday) ठेवण्यात येत आहे. मात्र यातील तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Pune water Distribution Department) पाणी बंद ठेवण्याबाबत नवीन वेळापत्रक (water cut new Timetable) तयार करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात आता रोटेशन नुसार पाणी बंद ठेवण्यात येईल. येत्या गुरुवार पासून यावर अंमल करण्यात येईल. अशी माहिती विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली. (Pune Water cut New Timetable)

पुणे शहरामध्ये (Pune city) संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्व भुमीवर दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करणेबाबत जाहीर प्रकटन देण्यात आलेले होते व त्यानुसार दिनांक 18/05/2023 पासुन कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. तथापी भौगोलीक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रीक अडचणीमुळे वडगाव बु। झोनमधील वडगाव बु धनकवडी, आंबेगाव पठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बु।।, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरामधील एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवून दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा पुर्ववत करणे शक्य होत नसल्याने वडगाव बु. झोनमधील या भागामध्ये विभागवार पद्धतीने (रोटेशन) पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक 25/05/2023 पासून विभाग निहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे नमुद करीत आहोत. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे पावसकर यांनी म्हटले आहे. (Pune water cut news)

दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग

सोमवार:- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधवनगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसर
कांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर खोराडवस्ती परिसर, संपुर्ण वडगाव बु।। परिसर, वडगाव बु।।, चव्हाणबाग, डि. एस. के. रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगल कार्यालया परिसर, अभिरुची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनिसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ. हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु।। शिवसृष्टी परिसर विकासनगर, घुलेनगर, धबाडी, सर्वे नं. 45, 48,47, निवृत्तीनगर, विष्णुपुरम, तुकाईनगर,
मंगळवार:- आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, दत्तनगर आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचलफार्म
बुधवार:- वालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं. 23, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पीटल परिसर, संपुर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. 17 ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, श्रीमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मगील संपुर्ण परिसर इ.
गुरुवार : सहकारनगर भाग-1 दाते बसस्टॉप परिसर, धनकवडी सर्वे नं. 7.8,2,3 धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर चैतन्यनगर, सर्वे नं 34,35,36, 37 सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर इ.

शुक्रवार:- गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उक्तर्ष सोसायटी, शेलारमळा संदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागरनगर भाग-1 आंबामाता मंदिर मागील परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओसियन व हिरामन बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर इ.
 
 शनिवार:- साईनगर, गजानन नगर, राजीवगांधीनगर काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग-2, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बु।। (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा इ.
रविवार:- टिळेकरनगर, कामठेपाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनु मेहतानगर, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड, ई-स्कॉन मंदिरपरिसर, प्रतीभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, कोढवा बु।। ( अंशःता भाग), पारगेनगर, एच अॅण्ड एम. सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयवरी सोसायटी,
तालाब कंपनी परिसर, सर्वे नं. 15 सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रीयल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णु ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपुर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर इ.

News Title | Pune Water Cut New Timetable | New water supply schedule from Pune Municipal Corporation Know when the water will be shut off in your area?

Latest News on Water cuts in Pune |  Now from May 18, water will be shut off in the entire city of Pune every Thursday

Categories
Breaking News PMC social पुणे

Latest News on Water cuts in Pune |  Now from May 18, water will be shut off in the entire city of Pune every Thursday

 – Decision of Pune Municipal Administration

 Latest News on Water cuts in Pune |  Pune residents will have to use water sparingly in the future.  Because the decision to save water on the lines of El Nino storm has been taken by the municipal administration (Pune civic body).  Accordingly, from May 18, water will be shut off in the entire city every Thursday.  There will be another review in June and a decision will be taken whether to continue or stop the cuts.  This information was given by Chief Engineer Anirudh Pawaskar of Municipal Water Supply Department.  (Latest news on punes water supply)
 The state government is serious about water in the wake of Al Nino storm.  Along with reservation of drinking water, the government has given instructions to cut water wherever necessary.  Accordingly, the Municipal Corporation has made a plan.  Meanwhile, will water cut be implemented in Pune?  If it happens, will you get water every day?  That one day a week will be reduced?  The decision in this regard was to be taken in the canal committee meeting.  Accordingly this meeting was held.  Guardian Minister Chandrakant Patil had given instructions to review water reduction.  Accordingly, this decision has been taken after a review by the municipal administration.  Latest news on water cuts in Pune city
 In this regard, Pawaskar said that currently 9.70 TMC of water is available in the dam which supplies water to the city.  Water is less than last year by half TMC.  The intensity of summer is increasing.  Also, the weather department has said that there is going to be a crisis of El Nino storm.  So it is necessary to save water.  Also, the state government had also given an order regarding reduction.  Accordingly, from May 18 i.e. next Thursday, the water supply of the entire city will be shut off every Thursday.  Rain forecast will be reviewed in the month of June.  After that, a decision will be taken regarding water reduction.  Pune Municipal Corporation (PMC)
 The people of Pune will be suffering 
 Meanwhile, there are some areas in the city where water supply is shut off for one day and the problem of water shortage arises for the next three days.  Because of this, the citizens suffer.  The key issue is how the administration will plan in such areas.  (Pune water cut news)

Latest News on Water cuts in Pune | आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

Latest News on Water cuts in Pune | आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार

– महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest News on Water cuts in Pune | पुणेकरांना आगामी काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण अल निनो (El-Nino) वादळाच्या धर्तीवर पाणी बचत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. जून महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येईल आणि कपात सुरु ठेवायची अथवा बंद करायची याचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर )chief engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली. Latest news on punes water supply
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणीमिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. Latest news on water cuts in Pune city
याबाबत पावसकर यांनी सांगितले कि, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सद्यस्थितीत 9.70 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी पेक्षा अर्धा टीएमसी ने पाणी कमी आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसेच अल निनो वादळाचे संकट असणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पाणी बचत करणे आवश्यक आहे. तसेच कपात करण्याबाबत राज्य सरकारने देखील आदेश दिले होते. त्यानुसार 18 मे म्हणजे पुढील गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जून महिन्यात पावसाचा अंदाज घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर पाणी कपात बाबत निर्णय घेण्यात येईल. Pune Municipal Corporation (PMC) 
 
पुणेकरांची होणार तारांबळ 
 
दरम्यान शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे. (Pune water cut News) 
—-
Latest News on Water cuts in Pune | Now from May 18, water will be shut off in the entire city of Pune every Thursday. Decision of pune civic body

Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता

|  अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा

| बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, म्हाळुंगे ची २४x७ समान पाणी पुरवठा योजना आढावा बैठक संपन्न
२४x७ अंतर्गत असणाऱ्या या प्रकल्पाचे ट्रान्समिशन लाईन्स चे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होऊन, वारजे येथील पंपांचे काम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्वांना २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा मिळेल. असे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आश्वस्त केले.
२४×७ समान पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे मनपाचे आयुक्त   विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सफा बँक्वेट हॉल, लक्ष्मण नगर, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी जवळ, बालेवाडी हाय स्ट्रीट-२ येथे संपन्न झालेल्या या बैठकीत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर साहेबांनी सदरील २४x७ पाणी पुरवठा योजनेचा आढावा व बाणेर-बालेवाडी येथे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यावरील उपाय योजना बाबत सादरीकरण केले व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
२४ x ७ समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत वारंवार आढावा घेत असुन पुढील दोन महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करण्यात येईल. तसेच तो पर्यंत ज्या सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांना माझ्या स्वःखर्चातुन टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठीची उपाय योजना करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरीकांना सागितले.
 यावेळी २४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. असे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,  प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, शिवम बालवडकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, उमाताई गाडगिळ, मा.सरपंच नारायण चांदेरे, मा.सरपंच काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, अस्मिता करंदिकर, सुभाष भोळ, मंदार राराविकर, रोहित पाटील, मीना पारगावकर तसेच पुणे मनपा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, परिसरातील सोसायटींचे सभासद  यावेळी उपस्थित होते.
—-
२४ x ७ हा भाजपाचा पुणे शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प असुन सुरुवातीपासुनच हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मधल्या कोरोना काळामुळे या कामास विलंब झाला असुन आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. तसेच सुस म्हाळुंगे येथेल नवीन पाण्याच्या ट्रान्समिशनचे लाईन व टाकीच्या कामाचे भूमिपूजन येत्या १५ दिवसात होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल.
– अमोल बालवडकर 

Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

Categories
Breaking News PMC पुणे

वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

| पाटबंधारेने मागितली आहे 435 कोटींची थकबाकी

पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारे विभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये आज महापालिकेतच वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान महापालिकेने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने सांगितले. यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही महापालिकेला कुठलेच आश्वासन न देता निघून गेले.

पाटबंधारे विभागाकडून पाणी वापराच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. त्यावर पाटबंधारे विभागाने बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा वाढीव बिल दिले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे 99 कोटी बिल देत आजपर्यंतची थकबाकी 435 कोटी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. शिवाय याबाबत पत्र देत बिल देण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला कायदा समजावून सांगत एवढे बिल नसल्याचे म्हटले होते.

महापालिका प्रशासनानुसार महापालिका फक्त घरगुती वापरासाठी पाणी देते. औद्योगिक वापरासाठी नाही. महापालिका कायद्यात तसे म्हटले आहे. त्यामुळे दंड वगैरे धरून महिन्याला फक्त 5 कोटी बिल येऊ शकते. त्यानुसार बिले द्यावीत असे महापालिकेने पाटबंधारे ला पत्र लिहिले होते. शिवाय आजपर्यंत ज्यादा घेतलेले पैसे देखील देण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने आपलाच हेका लावून 435 कोटींचे बिल पाठवले आहे.

दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज महापालिकेत आले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि अकाऊंटंट यांचा समावेश होता. सुरुवातीला मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता रामदास तारू यांच्याकडे ही बैठक झाली. यावेळी तारू यांनी सांगितले कि तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात. कायद्यानुसार फक्त घरगुती पाणी वापराचे बिल देणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही औदयोगिक वापराचे बिल देणार नाही. मात्र पाटबंधारे विभागाला ही भूमिका पटली नाही. त्यामुळे तिथे चांगलाच वाद झाला. तारू यांनी या अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता यांना भेटण्यास सांगितले. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देखील असाच वाद झाला. पावसकर यांनी देखील घरगुती वापराचे बिल देण्याची मागणी लावून धरली. पाटबंधारे विभागाने यावर काही आश्वासन दिले नाही. ते तसेच उठून गेले.

MWRRA | Pune Municipal Corporation | वाढीव पाण्याच्या तक्रारीबाबत MWRRA चा पुणे महापालिकेला दिलासा  | आता सुनावणी देखील घेण्याची गरज नाही 

Categories
Breaking News PMC पुणे

वाढीव पाण्याच्या तक्रारीबाबत MWRRA चा पुणे महापालिकेला दिलासा

| आता सुनावणी देखील घेण्याची गरज नाही

पुणे | पुणे महापालिका मापदंडानुसार पाणी वापरत नाही. अशी तक्रार महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावर सध्या सुनावणी आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत प्राधिकरणाने महापालिकेला दिलासा दिला आहे. शिवाय जलसंपदा विभागाला आदेश दिले आहेत कि शेती क्षेत्राचे जिथे निवासी क्षेत्र झाले आहे, त्याबदल्यात पाण्याचा कोटा महापालिकेला वाढवून देण्यात यावा. मात्र महापालिकेला हळू हळू का होईना पाणी वापर कमी करावा लागणार आहे.
पुणे महापालिकेचा पाणी वापर जास्त आहे, अशी तक्रार तक्रारदार शिवाय पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. शिवाय सांडपाण्यावर देखील महापालिका प्रक्रिया करत नाही, अशी देखील तक्रार सातत्याने करण्यात येते. यावर प्राधिकरणाने महापालिकेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जायका प्रकल्पा विषयी माहिती दिली आणि 2025 सालापर्यंत stp प्लांट पूर्ण होतील. त्यामुळे सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होईल. वाढीव पाण्याबाबत मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती दिली. पावसकर यांनी सांगितले शहराच्या भौगोलिक रचनेमुळे शहरात असमान पाणीपुरवठा होत आहे. वाढीव पाणी वापर असून देखील सर्वांना पाणी मिळत नाही. मात्र समान पाणीपुरवठा योजनेमुळे हा प्रश्न निकाली निघेल. ही योजना देखील 2025 पर्यंत पूर्ण होईल. पावसकर यांनी पुढे सांगितले कि सध्याचा वाढीव पाणी वापर कमी करणे, ही दोन तीन महिन्यात करण्यासारखी गोष्ट नाही. त्याला अजून जास्त कालावधी लागेल.
महापालिकेच्या या बाजूवर प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि महापालिकेची ही बाजू मान्य केली. त्यानंतर तक्रारदार जराड यांना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यांनी महापालिकेच्या ज्यादा पाणी वापराबाबत तक्रार केली. त्यावर प्राधिकरणानेच सांगितले कि ज्यादा पाणी वापराचे पाटबंधारे विभागाकडून दुप्पट दराने बिल आकारण्यात येते. महापालिकेची गरज असल्यानेच ते पाणी उचलले जाते. तक्रादाराला देखील ही गोष्ट मान्य झाली. दरम्यान यावेळी प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला आदेश दिले आहेत कि शेती क्षेत्राचे जिथे निवासी क्षेत्र झाले आहे, त्याबदल्यात पाण्याचा कोटा महापालिकेला वाढवून देण्यात यावा. कारण हे क्षेत्र पूर्वी 78 हजार हेक्टर होते. मात्र काही भाग निवासी झाल्याने हे क्षेत्र कमी झाले आहे.
प्राधिकरणाने नंतर आदेश दिले कि आता याबाबत सुनावणी होणार नाही. या अगोदर जे आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी होते कि नाही याबाबत नियुक्त केलेल्या कॉम्प्लायन्स समितीने पाठपुरावा करून अहवाल द्यायचा आहे. यामुळे आता महापालिकेला आता वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत.

Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही

| महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा मधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि  बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६  जुलै नंतर पाणी  वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो अलाहिदा कळवण्यात येईल, असे अनिरुद्ध पावसकर  मुख्य अभियंता  (पाणीपुरवठा), यांनी कळवले आहे.

| धरणात 7.74 TMC पाणी जमा

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील 4 धरणामध्ये 7.74 tmc पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवसात 8.66 tmc पाणी होते. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणामध्ये दररोज 1 टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. या पावसामुळे पुणेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे.