Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा

| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप 

| महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

पुणे | वारजे परिसरात गेल्या तीन दिवसापासून नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी सुरु आहेत. नागरिकांची याबाबत ओरड सुरु आहे. नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांवर ही वेळ  आली आहे. असा आरोप माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
याबाबत धुमाळ यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि आमच्या परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच closure घेतले जाते. गांधीभवन, एसएनडीटी या पाण्याच्या टाक्या बंद आहेत. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. धुमाळ यांनी सांगितले कि, नागरिकांच्या तक्रारी आम्ही पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना सांगण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमचा फोन देखील उचलत नाही. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त देखील आमच्याशी संवाद साधून दखल घेतात. शिवाय स्थानिक अधिकारी देखील सहकार्य करतात, मात्र पावसकर आमच्याकडे फिरकण्यास देखील तयार नाहीत. धुमाळ म्हणाल्या, काही परिसरात टँकरने पाणी पुरवठा होतो, मात्र तो पुरेसा नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर परिसरातील नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा आणू. असा इशारा धुमाळ यांनी दिला आहे.
गुरुवारी एक दिवस पाणी नसेल तर पुढील चार-पाच दिवस आम्हाला अजिबात पाणी येत नाही ….कारण पाण्याला प्रेशर कमी असते व ते उताराने खाली जाते ….काल आज मी पाण्याचे बिसलेरी जार आणून घरात वापरत आहे पिण्यासाठी देखील दोन-तीन हंडे पाणी येत नाही…
– नागरिक
…बरेच दिवस सांगत आहे की वरती जो वाल बसवलेला आहे सरोदे एडगे घराजवळ तो काढून टाकावा किंवा  तो काढून खाली बसवावा ..आम्हाला वरील 10 घराणं 1 वर्ष होऊन गेले पाणी खूप कमी येते…आत्ता पाणी उताराने सर्व खाली जात आहे… कृपया लक्ष लक्ष घालून लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा.
– नागरिक
वारजे भागात सलग 3 दिवस पाण्यावाचून नागरिकांचे हाल. सुस्त पाणी पुरवठा यंत्रणा आणि यांना जागे करण्यासाठी कोणीच वाली नसल्यामुळे मागील काही काळा पासून वारजे भगातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल चालू आहेत.
– नागरिक

आपण फारच सहनशील आहोत. ठीक आहे एक दिवस पाणी येणार नाही समजू शकतो पण पुढील दोन दिवस पाणी येत नाही हे मात्र योग्य नाही. दर 15 दिवसांनी गुरुवारी पाणी नसते आणि पुढील दोन दिवस पाण्या साठी वणवण करायची. हे नेहमीचेच झाले आहे. आपल्या भागातील नगरसेवक काय करतात?

– नागरिक
—-
तांत्रिक अडचण समजू शकतो पण मग महापालिकेने स्वतःचे टँकर्स पाठवून स्वखर्चाने टाक्या भरून द्याव्यात.
– नागरिक

Water for a day | सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी  | पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

Categories
Breaking News PMC social पुणे

सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी

| पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक

पुणे |  यंदाचे वर्षी पाऊस खूप लांबल्याने, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणी साठा अत्यंत कमी झालेला आहे. सद्य:स्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरु ठेवल्यास व पाऊस लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठयाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास व पर्यायाने धरणांमधील पाणी साठा योग्य प्रमाणात न वाढल्यास, पुणे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी पुणे महानरपालिकेने पुणे शहरामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे.
 नियोजन हे सोमवार दिनांक ०४.०७.२०२२ पासून करण्यात येऊन, सुरुवातीला ०८ दिवसांसाठी म्हणजेच दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत करण्यात येणार आहे. या दरम्यान पडणारा पाऊस व धरणांमधील पाणी साठा याचा विचार करून, पाणी वितरण व्यवस्थे संदर्भात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सोबत एक दिवसा आड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक ०४.०७.२०२२ पासून दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत सदर नमूद वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.
| वेळापत्रक इथे पहा