Chadrakant Patil | कलेच्या सादरीकरणाने भारावलेल्या चंद्रकांत दादांची कलाकारांना अनोखी भेट

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Chadrakant Patil |कलेच्या सादरीकरणाने भारावलेल्या चंद्रकांत दादांची कलाकारांना अनोखी भेट

 

Chandrakant Patil | नवरात्रोत्सवाच्या निमित्त ठिकठिकाणी नयनरम्य देखावे सादर करण्यात आले आहेत. काशेवाडी भागातील अशोक तरुण मंडळ संयुक्त अण्णाभाऊ साठे मंडळाच्या जिवंत देखाव्यातील कलाकारांच्या सादरीकरणाने भारावून जात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना बक्षीस देऊ केले.

समाजातील प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष देणारे नेतृत्व म्हणून असलेली चंद्रकांत दादांची ओळख यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शेकडो मंडळांना भेटी देताना वेळापत्रकाचा विचार न करता कालाकारांचे संपूर्ण सादरीकरण दादांनी बारकाईने पाहिले. या सादरीकरणानंतर कलाकारांशी आवर्जुन संवाद साधत त्यांना आपुलकीचे बक्षीस देऊ केले.
यावेळी उद्योजक समीर पाटील, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, खडक पो स्टे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrkant Patil | शहीद जवानाच्या मुलांना शिक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 लाखाची मदत

Categories
Breaking News Political social पुणे

शहीद जवानाच्या मुलांना शिक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 लाखाची मदत

| तुषार पाटील व अर्चना पाटील यांनी घरी जाऊन कुटुंबियांना दिला चेक

| भवानी पेठ भागातील शहिद वीर जवान कै. दिलीप ओझरकर (Dilip Ozarkar) यांच्या तेरावा विधीनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी या या वीर जवानाच्या कुटुंबाला पाहून भावना अनावर होऊन दादांनी तत्क्षणी त्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. या दिलेल्या शब्दानुसार दादांनी भाजपतर्फे या शहीद जवानांच्या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश आज भाजप पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील व मा. स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांच्या मार्फत कुटुंबीयांना दिला.


देशासाठी बलिदान दिलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी, त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलेला हा हात आयुष्य थोडेफार सुकर करेल. यावेळी शहीद कुटुंबातील जवानाची पत्नी, त्यांचे चिमुकली मुले आणि आई वडील उपस्थित होते. तसेच त्यावेळी स्थानिक गणपती मंडळाचे अध्यक्ष नीलेश राऊत, उमेश यादव, संध्या पवार दिनेश रासकर, राहुल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

दादांच्या या कृतीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.

Pune Potholes | BJP Women Wing | पुणे शहरातील खड्ड्यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक | महापालिका भवना समोर केले आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Potholes | BJP Women Wing | पुणे शहरातील खड्ड्यावरून भाजप महिला आघाडी आक्रमक | महापालिका भवना समोर केले आंदोलन

Pune Potholes | BJP Women Wing |  पुणे शहरातील (Pune city Potholes) मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा प्रशासक काळात पुणेकरांना प्रचंड त्रास होत आहे. यावरून भाजपची महिला आघाडी (BJP women Wing) आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरून महिला अध्यक्ष अर्चना पाटील (Women President Archana Patil) यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीकडून महापालिका भवनासमोर आंदोलन (Agitation) करण्यात आले. तसेच खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली. हे झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अर्चना पाटील (Archana Patil) यांनी दिला आहे. (Pune Potholes | BJP Women Wing)
 अर्चना पाटील यांच्या निवेदनानुसार रस्ते दुरुस्त केले तरी पँचवर्क व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांसह वाहन चालकांना आरामदायी प्रवास मिळत नाही. गेल्या दोन वर्षात समान पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी, मलवाहिनी, मोबाईल केवल यांसह इतर कारणांमुळे सर्वच भागांत खोदकाम झाले. महापालिकेला यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले; पण रस्ते दुरुस्तीवर हा निधी खर्च झाला नाही. रस्ते खोदाईनंतर सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून खड्डे बुजविले. पण हे काम निकृष्ट असल्याने पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिक टीका करत असले तरी अधिकाऱ्यांमध्ये खड्डयांबाबत उदासीनता असल्याचे प्रशासक काळात
दिसून आले. क्षेत्रीय कार्यालयांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यास विलंब केला. त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच पॅकेजमध्ये ३२५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. परंतु या कामाने अपेक्षित गती घेतलेली नाही. खड्डे बुजविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र अंदोलन केले जाईल. असा इशारा पाटील यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation)
——
News Title | Pune Potholes | BJP Women Wing | BJP women’s front aggressive from pit in Pune city A protest was held in front of the municipal building

Dr. Ambedkar Thoghts | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political social पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते

समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावे | चंद्रकांतदादा पाटील

आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रसृष्टी’चा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. आज सकाळी ७.३० वाजता भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाजवळ शंकर शेठ रोड मिरा सोसायटी समोर हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

उद्घाटन प्रसंगी सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीदिनी चित्रसृष्टीची कल्पना प्रत्यक्षात उतरविणे कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे योग्य वाटेल त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांना पिण्यासाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी सत्याग्रह केला नाही, त्यांनी समाजातील लोकांच्या अडचणी, त्रास समजून घेऊन त्यांच्यासाठी पाण्याचा सत्याग्रह केला. डॉ. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत राहणं म्हणजे त्यांनी समाज शिकावा यासाठी प्रयत्न केला, समाजाचे प्रबोधन होईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा महापुरुषाने लोकांना शिकून संघटित होऊन मग संघर्षाची वाट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. आपण एकजुटीने डॉ. आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!’ हा मूलमंत्र आचरणात आणून त्या दिशेने वाटचाल करायला हवी. यावेळी उद्घाटनाला नगरसेवक अजय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे, आरपीआयचे माजी शहर अध्यक्ष अशोकजी शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे दिनेश रासकर, विकी ढोले, मनीषा गायकवाड, नीता गायकवाड, युवराज अडसूळ उपस्थित होते.

BJP Mahila Aghadi | स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

Categories
Breaking News Political social पुणे

स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

पुणे: आपल्या कुटुंबापासून ते देश सांभाळण्याची अविरत शक्तीचे उदाहरण असलेल्या स्त्री शक्तीला सलाम करत समाजातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा भाजप महिला आघाडीच्या वतीने पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर व भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक हे प्रमुख उपस्थित होते.

भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात अनुरागजी ठाकूर यांनी महिलांच्या कामाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांचा सन्मान यावेळी संपन्न झाला. सांस्कृतिक आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी यावेळी प्रमुख उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी नव्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्याच्या प्रभारी अलका शिंदे, अपर्णा गोसावी, सर्व मंडलाध्यक्षा विनया बहुलीकर, हर्षदा फरांदे, स्वाती कुरणीक, ममताताई दांगट, अश्विनी पांडे या उपस्थित होत्या. सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला.

BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून सादर करण्यात आला. अशी माहिती पुणे महिला मोर्च्याच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरआण्णा मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे मार्गदर्शक खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच इतर महिला मैत्रिणी, आणि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.
यावेळी महिलांना प्रोत्साहन देताना चित्राताई म्हणाल्या, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल.
या बैठकीतून अनेक महिलांनी त्यांची मते मांडली. प्रश्न समोर ठेवले आणि त्यातून त्यांना अनेक धुरंधर राजकीय नेत्यांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन, सल्ले आणि सहकार्य लाभले. असे पाटील यांनी सांगितले.

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News Education Political देश/विदेश पुणे

क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लेखन पॅड आणि कंपास साहित्य भेट दिले. तसेच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. दहावी, बारावी झाल्यानंतर आता मागे पाहायचे नाही. नंतरच्या शिक्षणात तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर सांगा आपण ती नक्की सोडवू. शिकून आपल्याला चांगले काम करायचे आहे. ही जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.” यावेळी तुषार पाटील, क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेच्या मुख्याध्यापिका संकपाळ मॅडम, सतीश साठे, सीमा खेडेकर, विक्रम खेनट यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थिती होते.

Archana Patil | स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा  | माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्पायडरमशिन टेंडर प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

| माजी नगरसेविका अर्चना पाटील यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | महापालिकेच्या (PMC Pune) स्पायडरमशिन टेंडर (spider machine tender) प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप माजी नगरसेविका तथा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील (Former corporator Archana patil) यांनी केला आहे. राजकीय दबाव दाखवत जवळच्या ५ ठेकेदारांच्यात ५ निविदा वाटून देण्याचा भ्रष्ट घाट मलनिस्सारण विभाग घालत आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हा प्रकार हाणून पाडावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

अर्चना पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार  ड्रेनेज विभागाचे अधीक्षक अभियंता यांची  निविदा प्रक्रियेतील भूमिका वादग्रस्त, भ्रष्ट आहे. मर्जीतील ठेकेदारास काम न मिळाल्याने त्या बाबत अख्खी निविदा प्रक्रिया रद्दबातल करण्याचा पॅकेज ४ पथ विभाग प्रमाणे भूमिका खाते प्रमुख, मलः निसारण विभाग बजावत आहेत.  शुद्धीपत्रक काढून जिल्ह्यात अवघ्या ५ लोकांकडे उपलब्ध मॉडेल बंधनकारक करून नवीन निविदा प्रक्रिया राबवित आहेत. राजकीय दबाव दाखवत जवळच्या ५ ठेकेदारांच्यात ५ निविदा वाटून देण्याचा भ्रष्ट घाट मलनिस्सारण विभाग घालत आहे. प्रशासनाने तात्काळ हा प्रकार हाणून पाडावा … असे पाटील यांनी म्हटले आहे. (PMC pune)

याबाबत खालील मागण्या पाटील यांनी केल्या आहेत 
१) स्पायडरमशीन निविदा व कामे दक्षता विभागाच्या
वतीने करण्यात यावीत
२) सदर कामे तास पद्धतीने मागविण्या ऐवजी मापन पद्धतीने मागवावी
३) स्पायडर मशीनचा DSR दर पोकलेन पेक्षा जास्त कसा याची चौकशी करून सुधारणा करावी
(४) मनपाने स्वतःची स्पायडर विकत घ्यावी
५) अधीक्षक अभियंता यांची भ्रष्ट कार्य पद्धती बद्दल चौकशी करून अहवाल येई पर्यंत त्यांचे आर्थिक अधिकार गोठवण्यात यावेत.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, मनपाची यथेच्छ  बदनामी प्रसार माध्यमे व सोशल मीडियातून स्पायडर कामांमुळे होत असते. अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट
आचरणामुळे नगरसेवकांना जनतेच्या रोषास पात्र व्हावे लागते. स्पायडरमशीन कामातील अनियमितता, भ्रष्टाचार रोखण्यासाठी या पत्रात मागणी केलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने  विचार करावा. तसेच विषयांकित प्रकरणाची अँटी करप्शन ब्यूरो कडे तक्रार दाखल करण्यात येत आहे. असा इशारा ही पाटील यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)

Archana patil | महिलांच्या भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

महिलांच्या भव्य तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवावा आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्सव व्हावा असे आवाहन  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले होते. देशाबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटावा आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना जिवंत राहावी यासाठी पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या माध्यमातून आज महिलांसाठी भव्य तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन केले होते.

यावेळी कार्यकर्ते, नागरिक आणि असंख्य महिलांचा सहभाग होता. यावेळी शहाराध्यक्ष जगदीशजी मुळीक आणि उमाताई खापरे यांच्या हस्ते ध्वज फडकावून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
जंगली महाराज रस्ता येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरभरातून सुरू झालेल्या या रॅलीचा डेक्कन- दत्तवाडी- सिंहगड रस्ता- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला.

देशाप्रती असलेल्या प्रेम, अभिमान, आदर या भावनेतून असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. या जनजागृतीतून ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची खरी पूर्तता होणार असल्याची भावना पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केली.

Sukanya cards | वेशा व्यवसायाला सन्मानाची वागणूक द्या – अमृता फडणवीस

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

वेशा व्यवसायाला सन्मानाची वागणूक द्या – अमृता फडणवीस

| पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने लालबत्ती भागातील महिलांच्या मुलींना सुकन्या कार्ड वाटप

पुणे – वेशा व्यवसायातील महिला हा आपल्याच समाजातील एक अविभाज्य घटक आहे. हा व्यवसाय आजचा नसून पुरातन काळा पासून हा व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायाला ही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे कारण या वेशा व्यवसायामुळे समाजामध्ये आज शांतता आणि सुरक्षा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लालबत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबीर आणि मुलीसाठी सुकन्या कार्ड चे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अर्चना पाटील म्हणाला, महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न असतात. याभगतील महिलांना अनेक कारणांमुळे आरोग्याची काळजी घेता येत नाही यामुळे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय या महिलांच्या वृध्दपकाळात यांना हकाचे छत मिळावे म्हणून या महिलांसाठी वृध्दाश्रम करण्यात यावे अशी मागणी यावेळी पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्या कडे केली.

यावेळी पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, महिला आघाडीच्या सर्व उपाध्यक्षा, सरचिटणीस, पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील आणि अश्विनी पवार यांनी केले.