PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

 
 
PMC Officers Retirement | पुणे महापालिकेत  (Pune Municipal Corporation) तीन दशक काम करणारे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (PMC Chief Engineer V G Kulkarni) , मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) हे महापालिका सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. महापालिकेत नम्रता पूर्वक काम कसे करावे, याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. त्यांच्या कामाची नोंद महापालिकेच्या इतिहासात नेहमी घेतली जाईल. (PMC Pune) 
व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. शिपाई ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांमध्ये ते एक नम्र अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.  (Pune PMC News)
 
अरुण खिलारी यांनी कामगार अधिकारी म्हणून खूप काळ काम पाहिले. त्यांच्याकडे या कामासोबतच क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. खिलारी हे महापालिकेत 1987 साली रेडिओग्राफर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी food inspector म्हणून 5 वर्ष काम पाहिले. कामगार कल्याण विभागात ते 2003 साली रुजू झाले. 2 वर्ष त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात देखील काम पाहिले. प्रत्येक काम तंतोतंत आणि चोख करण्यावर त्यांचा भर होता.

PMC Labour Welfare Department | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा  सन्मान 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Labour Welfare Department | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा  सन्मान

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे (PMC Labour Welfare Fund) सन्मान करण्यात अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)

विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ चिटणीस यांनी 10 वी 12 वी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि बुद्धिमते नुसार योग्य शिक्षण पद्धतीची निवड करणे, जीवनाची पंचसुत्रे, करियर साठी असणारे नवनवीन मार्ग, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या संधी आणि शाखाबाबत डॉ गौतम बापट यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे.  यात पात्र ठरलेल्या 127 पाल्यांचा सन्मान केला करण्यात आला. यामध्ये 10 विच्या 96 आणि 12 विच्या 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना दप्तर आणि पेन ड्राइव्ह दिला गेला. (Pune Municipal Corporation)

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर काम करण्यास संधी देण्याची रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर काम करण्यास संधी देण्याची रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!

PMC Chief Labour Officer | पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) उद्या सेवानिवृत्त (Retire) होत आहेत. हे पद पदोन्नती (Promotion) ने भरले जाणार आहे. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) यांची पदोन्नती समितीने शिफारस देखील केली आहे. मात्र या पदासाठी आपण पात्र आहोत, असा दावा पर्यावरण व्यवस्थापक रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी केला आहे. शिवाय या पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. शेलार यांच्या मागणीवर आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Pune Municipal Corporation)

शेलार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, मुख्य कामगार अधिकारी हे पदनाम पुणे महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली ६ ऑगस्ट २०१४ रोजी मान्य झाले. त्या पदी पालिकेतील सल्लागार कामगार या पदावरती सरळसेवेने भरती
झालेले सेवक शिवाजी दौंडकर हे कार्यरत होते. ते वयोपरत्वे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. नंतर ०६ जून २०२३ पदोन्नतीने  अरुण खिलारी यांची मुख्य कामगार अधिकारी निवड झाली. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजे उद्या खिलारी सुद्धा सेवानिवृत्त होत आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा पदोन्नतीने हे पद भरले जात आहे. वास्तविक सेवा प्रवेश नियमावली २०१४ मध्ये पदोन्नतीने अशी विभागणी दाखविली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती अशा पद्धतीने हे पद भरले जाऊ शकते. प्रति नियुक्तीसाठी शासन सेवेतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील समकक्ष पद मागील 5 वर्षांपासून धारण करणारा अधिकारी यासाठी पात्र ठरू शकतो. त्याचाच आधार घेऊन शेलार यांनी ही मागणी केली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती देताना प्रशासनाने माझ्या नावाचा विचार करायला हवा होता. माझे हक्क हिरावले जाऊ नयेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे. (PMC Pune) 

 रमेश शेलार यांनी पुढे म्हटले आहे कि, माझी अभियांत्रिकी विभगाकडून सन २००९ मध्ये सरळसेवेने मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी पदासाठी एल.एल.बी पदविका धारकास प्राधान्य अशी अट होती. त्यानुसार माझी निवड झाली. मी या पदाचा कार्यभार पाहत होतो. आता हे पद एकाकी आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि  मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव तसेच मुख्य अभियंता या पैकी कुठलेहीपदावरती काम करण्याची संधी मला देण्यात यावी. (PMC Labour Welfare Department)

दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान शेलार यांनी नुकताच महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला होता.  तशी मागणी देखील प्रशासनाकडे केली होती. (Ramesh Shelar News)

——-

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट देण्यात आला होता.  त्यानुसार येत्या सोमवारी 127 पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांनी दिली. (PMC Employees and Officers)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित आहे. कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
यात पात्र ठरलेल्या 127?पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये 10 विच्या 96 आणि 12 विच्या 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना दप्तर आणि पेन ड्राइव्ह दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी सामग्री दिली जाते. तसेच त्यांच्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ठेवले जाते. या व्याख्यानाचा लाभ सन्मानास पात्र ठरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा. शिवाय ज्यां कर्मचाऱ्यांची  मुलं आता 10 आणि 12 वी ला आहेत त्यांनी देखील व्याख्यानाचा लाभ घेण्यासठी यावे.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी.
—-

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत फसवणुकीचा नवा फंडा!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत फसवणुकीचा नवा फंडा!

| अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे कामगार कल्याण आणि सुरक्षा विभागाचे आवाहन

Pune Municipal Corporation | पुणे | पुणे महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Employees and Officers) फसवण्याचे नवीन प्रकार समोर येत आहेत. हे फक्त महापालिका भवन (PMC Building) मधेच नाही तर क्षेत्रीय कार्यालयात (PMC Ward Offices) देखील अशाच गोष्टी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे काम नागरिकांकडूनच होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेच्या कामगार कल्याण (PMC Chief Labour Welfare Department) आणि सुरक्षा विभागाकडून (PMC Security Department) करण्यात आले आहे. (PMC Pune)
वेगवेगळ्या कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध विभागात येत राहतात. महापालिकेच्या सर्व गेटवर नागरिकांना पास देऊनच आत पाठवले जाते. असे असले तरी काही नागरिक मात्र खोडसाळपणा करत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक आपल्या वृद्धपणाचा फायदा घेत आहेत. शुक्रवारी आणि त्याआधी देखील अशा फसवणुकीला खुद्द मुख्य कामगार कल्याण अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Welfare Officer Arun Khilari) यांनाच सामोरे जावे लागले. मात्र याआधी देखील त्यांना असा प्रकार माहित असल्याने खिलारी यांनी फसवणूक होऊ दिली नाही. (Pune Municipal Corporation News)
याबाबत अरुण खिलारी यांनी सांगितले कि, एक वृद्ध महिला माझ्या कार्यालयात आली. 65 च्या पुढे वय असेल त्या महिलेचे. मी त्यांना पाणी, चहा द्यायला सांगितले. मग ती महिला मला तिची कर्मकहाणी सांगू लागली. मी कशी एकटी असते. मुलं सांभाळत नाहीत. आर्थिक अडचण, अशा बऱ्याच गोष्टी. तर आता तुम्ही मला आर्थिक मदत करा. खिलारी यांनी पुढे सांगितले कि, त्या महिलेची कर्मकहाणी ऐकल्यानंतर मला आठवले कि असेच याआधी मी ऐकले होते आणि पैसे पण दिले होते. तर हा प्रकार माझ्याबाबत याच महिलेने मी क्षेत्रीय अधिकारी असताना केला होता. त्यानंतर हीच महिला मला एकदा कामगार आयुक्तांच्या कार्यालयात भेटली होती आणि आपली कर्मकहाणी आर्थिक सहायता मागत होती. दुसऱ्या वेळेस मी टाळले होते. मात्र आता ही तिसरी वेळ होती. त्यामुळे मी त्या महिलेला कटवलं. अशाच पद्धतीने महापालिकेत आणि क्षेत्रीय कार्यालयात येऊन ही महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पैसे मागत असते. यावर आळा घालायला हवाय. याबाबत मी सुरक्षा विभागाला देखील कळवले आहे.
महापालिकेत अशाच पद्धतीने बरेच नागरिक फिरत असतात. कुणी पापड, चिक्की, पुस्तके विकायला येतात. प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांना त्रास देत बसतात. कर्मचारी दया दाखवून त्यांना मदत करत असतात. मात्र नेहमीच हे होत असल्याने कर्मचारी वैतागून जातात. अशा लोकांवर सुरक्षा विभागाकडून आळा घातला जायला हवाय.
—-
अशा प्रकाराबाबत आम्ही गंभीरपणे दखल घेतली आहे. आमचे सुरक्षा विभागाचे 3/4 कमर्चारी आम्ही महापालिका भवनात साध्या वेशात तैनात करणार आहोत. जेणेकरून अशा व्यक्ती आम्हांला ओळखता येतील आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांची फसवणूक थांबेल. तशा सूचना आम्ही आमच्या विभागाला दिल्या आहेत.
राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका. 
——–

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट देण्यात आला आहे. (PMC Employees and Officers)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित आहे. कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, त्यांनी  अर्जासोबत गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत व माहे एप्रिल पेड इन मे, २०२३ ची वेतनचिठ्ठी जोडून खातेप्रमुख यांचेमार्फत कामगार कल्याण विभागाकडे दिनांक २४/०८/२०२३ अखेर सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केले आहेत. (PMC Pune News)
महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी सामग्री दिली जाते. तसेच त्यांच्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ठेवले जाते.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी.
—-
News Title | PMC Employees and Officers | Children of Pune Municipal Corporation employees and officers will be honoured Application deadline is August 24

PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | महापालिका आयुक्तांनी दुजाभाव केल्याने कर्मचारी नाराज!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | महापालिका आयुक्तांनी  दुजाभाव केल्याने कर्मचारी नाराज!

PMC Accident Insurance | (Author – Ganesh Mule) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र यंदा रक्कम वाढवली आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी यात दुजाभाव केला असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. कारण वर्ग-१ साठी २५ लाख, वर्ग-२ साठी २० लाख, वर्ग-३ व ४ साठी १५ लाख इतका विमा असेल. 3-4 वर्गातील कर्मचाऱ्यांनाच याची खरी गरज असते. असे असतानाही त्यांनाच कमी रक्कम ठेवली आहे. योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे कि विमा कंपनीच्या लाभासाठी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शवत यात समानता आणण्याची मागणी केली आहे. (PMC Accident Insurance)

 – सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

 महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.  यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात.  आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता.  परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे.  कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात.  यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत.  अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे.  अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत आहे.  जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो.  कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे.  पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.  यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 19 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. (PMC Accident Insurance News)

आयुक्तांचा आदेश काय आहे?

दरम्यान यंदा मात्र या योजनेला मान्यता देताना उशीर झाला आहे. तसेच मान्यता देतानाही यात वर्गवारी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी मात्र नाराज झाले आहेत. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार वैयक्तिक अपघात योजना गट-अ ते ड मधील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू असेल. वैयक्तिक अपघात योजनेचा राशीभूत विमा (Capital Sum Assured) रक्कम १) वर्ग-१ साठी रु.२५ लाख, २) वर्ग-२ साठी रु. २० लाख, ३) वर्ग-३ व ४ साठी रु. १५ लाख इतका असेल. अपघातामध्ये आलेला मृत्यु, कायमचे अपंगत्व / विकलांगता किंवा दोन हात, दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व / विकलांगता आल्यास त्यास १००% लाभ अनुज्ञेय असेल. कायमचे अंशत: अपंगत्व / विकलांगता आल्यास अंपगत्वाच्या स्वरूपानुसार लाभाची टक्केवारी विहीत करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
त्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे माहे जुलै २०२३- पेड इन ऑगस्ट २०२३ चे वेतनातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी समुह अपघात वार्षिक सभासद वर्गणी १) वर्ग-१ साठी प्रत्येकी ४७२ २) वर्ग-२ साठी प्रत्येकी ३७१.१०, ३) वर्ग-३ व ४ साठी प्रत्येकी २६५.५०/- कपात करण्यात येणार आहे.  पुणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे माहे जुलै २०१३ — पेड इन ऑगस्ट २०२३ वेतनातून वर्गणी कपात न केल्यास वा कमी वर्गणी कपात केल्यामुळे संबंधित व्यक्ति लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित वेतनपत्रक लेखनिक व आहरण व संवितरण अधिकारी (पगारपत्रकावर स्वाक्षरी करणारे) यांची राहील, याची नोंद घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.  समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी कपात न करणे, कमी कपात करणे, प्रलंबित वर्गणी अन्य/अंतिम देय रकमेतून कपात करणे या व अशा सर्व बाबीस वेतनपत्रक लेखनिकास जबाबदार धरून त्यांचेविरुध्द शास्तीची कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव निर्माण केल्याची भावना निर्माण झाली आहे. कारण याची खरी गरज वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना आहे. त्यांनाच विम्याची कमी रक्कम मिळणार आहे. योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे कि विमा कंपनीच्या लाभासाठी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यात समानता आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
—-
आगामी वर्षात यात समानता आणली जाईल. शिवाय चालू वर्षी जर मागणी आली तर कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार वर्ग 3 व 4 साठी वेगळी विमा योजना राबवली जाईल.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा 
—-
News Title | PMC Accident Insurance | Group Accident Insurance Plan | The municipal commissioner is angry with the employees!

PMC Pune Chief Labour Officer | अरुण खिलारी यांची पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Chief Labour Officer | अरुण खिलारी यांची पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नती

PMC Pune Chief Labour Officer | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी पदी (Chief Labour Officer) अरुण खिलारी (Arun Khilari) यांची वर्णी लागली आहे. खिलारी हे कामगार अधिकारी (Labour Officer) म्हणून काम पाहत होते. तसेच नुकताच त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. आता खिलारी हे पूर्ण वेळ मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहतील. (PMC Pune chief Labour Officer)
पुणे महापालिकेचे (PMC Pune) मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहणारे शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे मुख्य कामगार अधिकारी हे पद रिक्त झाले होते. हे पद पदोन्नती ने (Promotion) भरले जाते. त्यानुसार यासाठी कामगार अधिकारी अरुण खिलारी पात्र ठरत होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून पदोन्नती समितीत (Promotion Committee) याला मान्यता दिली आहे. सेवाज्येष्ठतेने त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खिलारी हे पूर्ण वेळ मुख्य कामगार अधिकारी म्हणून काम पाहतील. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी (PMC commissioner Vikram Kumar) जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)
News Title | PMC Pune Chief Labour Officer | Arun Khilari has been promoted to the post of Chief Labour Officer of Pune Municipal Corporation

PMC Pune Marathi News | मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Marathi News |  मुख्य कामगार अधिकारी म्हणून आता अरुण खिलारी काम पाहणार

PMC Pune Marathi News | पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) मुख्य कामगार अधिकारी (Chief Labour Officer) तथा सहायक आयुक्त (PMC Assistant commissioner) शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) हे 31 मे ला सेवानिवृत्त (Retire) होत आहेत. त्यामुळे 1 जून पासून मुख्य कामगार अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार कामगार अधिकारी अरुण खिलारी (Labour Officer Arun khilari) यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Marathi News)
शिवाजी दौंडकर हे 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी विविध खात्यात काम केले आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी आणि प्रभारी नगरसचिव (Pune Municipal Corporation Municipal secretary) या पदाची जबाबदारी आहे. सेवानिवृत्त झाल्यांनतर त्यांची जबाबदारी इतर अधिकाऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यानुसार याआधीच नगरसचिव पदाचा पदभार राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले (Protocol officer Yogita Bhosale) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर आता मुख्य कामगार अधिकाऱ्याचा पदभार कामगार अधिकारी अरुण खिलारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)
News Title | PMC Pune Marathi News |  Arun Khilari will now work as the Chief Labor Officer