Departmental Examination | PMC Pune | लेखनिकी संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे

Categories
Breaking News PMC पुणे

लेखनिकी संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे

| कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे | महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिक संवर्गासाठी (Clerical cadre)  विभागीय परीक्षा (Departmental Examination) आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिका सेवाभरती नियम २०१४ नुसार नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून ४ वर्षात ३ संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र लेखनिक संवर्ग हा हुशार, कायद्याचे माहिती असणारा व प्रशासकीय सर्व कामकाजा माहिती असणारा पाहिजे. म्हणून लेखनिक संवर्गसाठी असणारी विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी (Written paper) घेण्यात यावे. अशी मागणी कॉंग्रेस शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद शिंदे (congres president Arvind Shinde)  यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal corporation)

शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिक संगीसाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील परिशिष्ट ३ पुणे महानगरपालिका कर्मचान्यांसाठी (अर्हताकारी विभागीय परीक्षा) नियम २०१४ यामधील नियमानुसार व तरतुदीनुसार पुणे मनपा प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गातील दि. ३१.७ २०२२ अखेर नेमणूक झालेल्या कर्मचान्यांसाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. (PMC Pune)

त्यानुसार विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या सेवकांबाबतच्या  माहितीचे पृथ:करण करण्यात आलेले आहे.  परिशिष्टमधील काही सेवकांची पुणे महानगरपालिकेमधील लेखनिक संवर्गात नेमणूक दिनांक पाहता काही सेवकांचा परिविक्षाधीन कालावधी चालू आहे, काहींना लेखनिक संवर्गात नेमणूक होऊन फक्त ६ महिने, १ वर्ष व २ वर्षे झालेले आहेत. या सर्व सेवकांना आजपर्यंतचा महानगरपालिका प्रशासनाचा कायद्याचा, सेवाविनियिम, माहिती अधिकार, सेवानिवृत्त सेवकांचे पेन्शन प्रकाणे इ. कामकाजाचा कोणताही अनुभव नाही. त्यांना पुणे महानगरपालिकेचे कामकाजाची माहिती नाही. त्याचा परीविक्षाधिन कालावधी चालू आहे.. तसेच सेवकांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर कार्यालयतील कामजाबाबत व वर्तणूकीबाबत खातेप्रमुखांचा कोणताही अहवाल प्राप्त नसताना या सर्व सेवकांना विभागीय परीक्षा देण्यास कशी काय परवानगीदेण्यात आली याचा बोध होत नाही.  (Departmental Examination)

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, यापूर्वी २०१७ मध्ये लेखनिक संवर्गासाठी विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेमधील दोन पेपर दै ऑनलाईन घेण्यात आले होते. व एक पेपर लेखी घेण्यात आला होता. त्यानंतर जे लिपिक टंकलेखनिक विभागीय परीक्षा पास झाले, त्यामधील काही सेवकांची वरिष्ठ लिपिक म्हणून प्रशानाकडून नियमानुसार बढती करण्यात आली. परंतू आम्ही आपणास कळवू इच्छितो कि त्या सेवकांना आजपर्यंत कोणताही कायदा माहित नाही, कोणतेही प्रशासकीय कामकाज कोणत्या कायदयान्वये केले जाते याची माहिती नाही, कित्येक सेवानिवृत्त सेवकांचे पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहे त्यांना पेन्शन प्रकरणे कसे करायचे याची सुध्दा माहिती नाही. कोणतेही निवेदन लिहिता येत नाही. यासर्व बाबी पहाता आमचे स्पष्ट मत आहे ज्या सेवकांना कमी कमी तीन वर्षे व जास्तीत जास्त पाच वर्षे पुर्ण झाले आहेत अशांना विभागीय परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी. (clerical cadre exam)

सेवाप्रवेश नियमावली २०१४ मधील परिष्ट ३ यामधील पुणे महानगरपालिका कर्मचान्यांसाठी विभागी परीक्षा नियम २०१४ मधील नियम ४ मधील (ब) पुणे महानगरपालिका सेवाभरती नियम २०१४ नुसार नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून ४ वर्षात ३ संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याची सुध्दा आम्हांस कल्पना आहे. सध्या आपल्या महानगरपालिकेला ७ वा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे सर्वांचे वेतनात भरपूर वाढ झालेली आहे. आपली महानगरपालिका अ दर्जाची आहे. यासाठी आपले महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाजही त्याच दर्जाचे असयाला पाहिजे. यासर्व गोष्टी विचार केला असता लेखनिक संवर्ग हा हुशार कायद्याचे माहिती असणारा, व प्रशासकीय सर्व कामकाजा माहिती असणारा पाहिजे. म्हणून लेखनिक संवर्गसाठी असणारी विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे. असे शिंदे यांनी म्हटले आहे. (congress president Arvind Shinde)

 

Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन

      महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh koshyari) भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (sudhanshu trivedi)  यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (pune city president Arvind Shinde) यांच्य नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा येथे जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress Vs Governor Bhagat Singh koshyari)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने नेहमीच करीत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपाचा छुपा अजेंडा या संविधानिक पदावर बसून राबवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा खोटा दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे. सावरकरांबद्दल बोलल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जाणून बुजून केली जाते याच बरोबर काँग्रेसचे नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादालादेखील भारतीय जनता पार्टी घाबरली असून या यात्रेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती सहन करणार नसून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे यांनी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टिका केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल शिंदे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अविनाश अडसूळ, भगवान कडू, राजू साठे आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा

| कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत

| संघटनांसोबत राजकीय पक्ष रस्त्यांवर उतरणार

पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभाग द्वारे अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना चालवली जाते. मात्र या योजनेवरील खर्च वाढत चालल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याबाबत आता महापालिकेच्या कर्मचारी संघटनाकडून आता याविरोधात लढा उभारला जाणार आहे. याचाच भाग म्हणून  बुधवार  १६ नोव्हेंबर ला दुपारी ४.०० वाजता कामगार, कर्मचारी, अधिकारी व सेवानिवृत्त सेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत दिसून आले. गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील संघटना आणि राजकीय पक्षांनी केली आहे.
हा मेळावा पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व त्यांच्या सहयोगी संघटनांनी आयोजित केला होता. यामध्ये संघटनेच्या मुक्ता मनोहर, उदय भट, प्रदीप महाडिक, आशिष चव्हाण, अशा पदाधिकाऱ्यांबरोबर काँग्रेस प्रभारी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, आरपीआय चे डॉ सिद्धार्थ धेंडे, एमआयएम च्या अश्विनी लांडगे, माजी नगरसेवक दीपक मानकर, अविनाश बागवे, सुधीर जानज्योत, अजित दरेकर, अजय खेडेकर, आरती कोंढरे, आदी नेते उपस्थित होते.
  सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना (CHS), मोडीत काढून ही योजना खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या दावणीला बांधण्याचा प्रशासनाने चंगच बांधला आहे. सध्याची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना तशीच अबाधित ठेवावी व खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया रद्द करावी असे संघटनेने भेटून व वारंवार पत्रे देऊन प्रशासनाला यापूर्वीच कळवले आहे. त्याचबरोबर १२ मे २०२२ रोजी व त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी म.न.पा. भवनासमोर मोठी निदर्शने, आंदोलने करून मेडिक्लेम प्रक्रिया थांबवावी असे पुन्हा एकदा मांडले. तरीही ट वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्याकरीता, १) रंगनाल इन्शूरन्स ब्रोकिंग अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड व २) जे. के. इन्शुरन्स ब्रोकर लिमिटेड, या दोन कंपन्यांना दिनांक २१-१०-२०२२ च्या स्थायी समितीच्या ठरावात मान्यता देण्यात आली आहे.

पुणे मनपामध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ७१% टक्के आहेत व उर्वरीत अधिकारी व इतर कर्मचारी आहेत. हे सगळे मिळून पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण करणे व इतर नागरी सेवा पुरवणे अशी विविध कामे करतात. यातील अनेक कामे ही आरोग्याला घातक अशी आहेत. कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करताना ८८ कायम कर्मचाऱ्यांनी व १३ कंत्राटी कामगारांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण केले, यामुळे या कर्मचान्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे विशेष गरजेचे आहे. याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या हिताचाच विचार करणे हे आम्ही सहन करणार नाही. असे म्हणत संघटनेने लढा उभारला आहे.

या मेळाव्यात मुक्ता मनोहर म्हणाल्या, आम्ही काम करत असताना जनतेला कधीही वेठीस धरले नाही. कोरोना सारख्या महामारीत देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाचे बलिदान देत शहरासाठी काम केले आहे. असे असताना आमचे हक्क हिरावून घेणे दुर्दैवी आहे. काँग्रेस चे अरविंद शिंदे म्हणाले, कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य सभेला असतो. मात्र प्रशासक त्यांना हवे तसे निर्णय घेत आहेत. प्रशासकाने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार मुख्य सभेला आहे. आम्ही तो अधिकार वापरू. शिंदे पुढे म्हणले, प्रशासकांना अजून  कामगारांची ताकद माहित नाही. याबाबत त्यांनी एक दाखला देत कामगारांच्या शक्तीपुढे प्रशासकांना माघार घ्यावी लागेल असे नमूद केले. कामगारांना काम बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे ही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, योजना मोडीत काढण्यामागे कुठली अदृश्य शक्ती असेल तर तिला शोधून काढावे लागेल. अशी मनमानी आम्ही चालू देणार नाही. डॉ सिद्धार्थ धेंडे म्हणाले चतुर्थ श्रेणी कामगारांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर जास्त पैसे खर्च होतात, असे म्हणण्याचा प्रशासनाला अधिकार नाही. प्रशासकांनी अशी मनमानी करू नये. अशाच पद्धतीने सर्वच राजकीय नेत्यांनी योजना मोडीत काढण्याबाबत प्रशासनाला दोष देत ठराव रद्द करण्याची मागणी केली. 
| अखेर  कामगार संघटना न्यायालयात 
दरम्यान स्थायी समितीचा ठराव आणि योजनेच्या खाजगीकरण यावरून महापालिका कर्मचारी संघटनानी कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याबाबतची पहिली सुनावणी देखील झाली आहे. न्यायालयाने महापालिकेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

University Senate Election | विद्यापीठ सिनेट निवडणूक | महाविकास आघाडी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची? | काँग्रेसचा स्वतंत्र पुरस्कृत पॅनेल 

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

विद्यापीठ सिनेट निवडणूक | महाविकास आघाडी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची? | काँग्रेसचा स्वतंत्र पुरस्कृत पॅनेल

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र तयार होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे यात उमेदवार आहेत. हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र ही आघाडी मानायला तयार नाही. काँग्रेस ने या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नसला तरी मात्र काँग्रेस ने एक पुरस्कृत पॅनल उभा केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त करत आघाडी नसल्याची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस ने यात पुरते बळ लावण्याचे मनावर घेतले आहे. राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल च्या कचेरीचा शुभारंभ केला. राष्ट्रवादी व शिवसेनेने  दहा ते दहा ठिकाणी  तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनामाचे प्रकाशन देखील  संपन्न झाले.
या निवडणुकीत काँग्रेस ने मात्र वेगळा सूर आळवला आहे. काँग्रेस ने या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नसला तरी मात्र काँग्रेस ने एक पुरस्कृत पॅनल उभा केला आहे.  काँग्रेसने  ‘छत्रपती शाहू महाराज परिवर्तन’ पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे.  पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस – एन. एस. यू. आयने ‘छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पत्रा द्वारे पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत नाही. तसा उल्लेख देखील काँग्रेस ने कधी केला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करत आहेत. काँग्रेस मात्र हे मानायला तयार नाही. यावरून आता आघाडीत बिघाडी मानली जात आहे. तर काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी मात्र चांगलीच नाराज झाली आहे. राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे कि आघाडीबाबत काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी.
सिनेट च्या निवडणुकीत आमचा काँग्रेस पुरस्कृत पॅनेल आहे. याबाबत पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस ने देखील आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आमचा कुठलाही नेता उपस्थित नव्हता.
अरविंद शिंदे, प्र. शहर अध्यक्ष, काँग्रेस
सिनेट निवडणुकीत उमेदवार देताना आम्ही काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी सल्लामसलत करूनच उमेदवार दिले आहेत. आम्ही ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढतो आहोत. सगळ्या पातळ्यांवर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस असे आम्ही आघाडी म्हणूनच एकत्र आहोत. पण काँग्रेस ला तसे वाटत नसेल तर काँग्रेस चे शहर अध्यक्ष आणि विद्यार्थी काँग्रेस ला माझे आव्हान आहे कि त्यांनी आघाडी नसल्याची अधिकृत भूमिका जाहीर करावी.
प्रशांत जगताप, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन

|पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

काँग्रेस नेते  खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तीस्थळांवरील मातीचे संकलन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक ॲड. अभय छाजेड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पुणे शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी सबंधित शक्ती स्थळांवरील माती सकंलन आज करण्यात आले. पुणे शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातील लाल महालातून माती संकलन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस भवन हे देखील स्वातंत्र्य पूर्व काळातील एक अग्रगण्य स्थान असून १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये याच ठिकाणी देशातील पहिला हुतात्मा नारायण दाभाडे हे होते. आद्य क्रांतीकारक उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी ज्या ठिकाणी फाशी दिली त्या मामलेदार कचेरी येथील त्यांच्या स्मारकातून माती संकलन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज सुधारणेबरोबरच स्वातंत्र्याचे महत्व ज्यांनी पटवून दिले व स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला अशा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळावरून (समताभूमी) येथून मातीचे संकलन केले. महात्मा गांधीजींचे गुरू ना. गोपाळकृष्ण गोखले यांच्या राहत्या घरातून म्हणजेच गोखले इन्स्टिट्यूट गोखले स्मारक येथून माती संकलनीत करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचे जहाल नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुणे येथील राहते घर या ठिकाणाहून देखील माती संकलित करण्यात आली. आद्य क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमंवाडी स्मारकाची माती संकलित करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी असलेले, तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावून, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू ब्रु. येथून व भीमा कोरोगाव येथील विजय स्तंभ येथून व तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातून मातीचे संकलन केले गेले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, सुजित यादव, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, विजय खळदकर, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, ऋषीकेश बालगुडे, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bike Rally | Pune Congress | भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये  खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी गृहराज्य मंत्री मा.आ. सतेज पाटील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली फिरून आगाखान पॅलेस येथे तीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी गृहराज्य मंत्री मा.आ. सतेज पाटील म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुलजी गांधी हे कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत भारतात तयार झालेले विषमतेचे वातावरण धर्म व जातीमधील तेढ तसेच देशातील याच्या विरोधात भारत जोडण्यासाठी यात्रा करीत आहेत. या यात्रेला संपूर्ण भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून पुण्यात देखील आज या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.’’

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षांमध्ये या देशामध्ये माणासांमाणसांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काही जातीयवादी शक्ती करीत आहेत. काँग्रेस नेते राहुलजी गांधी या विरोधात भारत जोडो यात्रा काढीत आहेत या यात्रेमध्ये सर्वसामान्यांबरोबरच बुध्दीजीवी वर्ग सुध्दा जोडला जात असून देश एकसंघ ठेवण्यासाठी या यात्रेचा उपयोग होत आहे.’’

यावेळी भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, शुक्राचार्य वांजळे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, नगरसेवक चंदूशेठ कदम, दत्ता बहिरट, बाळासाहेब दाभेकर, विजय खळदकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, नीता रजपूत, शिवाजी केदारी, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनोद रणपिसे, साहिल केदारी, सुनिल शिंदे, राहुल शिरसाट, विशाल मलके, प्रशांत सुरसे, रजनी त्रिभुवन, शानी नौशाद, लेखा नायर, अरुण वाघमारे, भुजंग लव्हे, सुनील मलके, बाबा नायडु, भरत सुराना, मीरा शिंदे, वैशाली रेड्डी, सुनिल पंडित, भगवान कडू, अनिल अहिर, ॲड. राहुल ढाले, सेल्वराज ॲथोनी, संदिप मोकाटे, राजू मगर, दत्ता जाधव, शिवराज भोकरे, अक्षय माने, आयुब पठाण, हेमंत राजभोज, योगेश भोकरे, सौरभ अमराळे, नितीन परतानी, रवि आरडे, राहुल तायडे, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, अजित ढोकळे, कुणाल काळे, स्वाती शिंदे, पपिता सोनावणे, सुबकडेताई, शारदा वीर, आनंद दुबे, विशाल गुंड, ज्योती परदेशी, सुरेश कांबळे आदींसह पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. शहर काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीत स्वबळाचा नारा देत एकमताने तसा निर्णय घेण्यात आला. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेस संपूर्ण शहरात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने महाविकास आघाडी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला.आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, असे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नाही, अनेकदा काँग्रेसच्या विरोधातही काम केले जाते. त्यामुळे आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात नव्हते, तर बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले होते, ही बाबही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली.निवडणुकीत उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा, अशी सूचना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. अनेक जण निवडणुकीतील उमेदवारीपुरते पक्षाकडे येतात. यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात येऊ नये, पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार व्हावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्व नेते मंडळीं व कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीनुसार निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लाढणार आहे.  आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला.

अरविंद शिंदे, प्र. अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Pune Congress | भाजप आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे

भाजप आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी  – अरविंद शिंदे

      गंगाधाम चौक नजीकच्या आंनदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करा म्हणणाऱ्या भाजपाचे आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशा मागणीचे निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलीस आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, कमलताई व्यवहारे, संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सचिन आडेकर उपस्थित होते.

     यावेळी पोलीस आयुक्त मा. अमिताभ गुप्ता यांना आनंदनगर झोपडपट्टीवासियांवर अत्याचार करून झोपड्या खाली करून घेतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला व आमदार, नगरसेवक आणि माजी नगरसेविकेचे पती व त्यांच्या सोबत असलेले रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे या कारवाईमध्ये दिसत आहेत हे निदर्शनास आणून दिले. याबाबत योग्य ते कायदेशिर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी तसेच आनंदनगर वसाहत येथे २४ तास पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. अनाधिकृत इमारतीत झालेल्या सक्तीच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

   पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांना २०५ अंतर्गत रस्ता महापालिकेच्या शेवटच्या पुणे मनपाच्या सार्वजनिक सभेमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाने करून घेतला. त्यासाठी सदर ठिकाणच्या हिलटॉप, हिलस्लोप जागेवरील अनाधिकृत बांधलेल्या ५ मजली इमारतीमध्ये बेकायदेशिररित्या पुनर्वसनाचे काम केले जात आहे. SRA चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र निंबाळकर यांनी सदर ठिकाणचे एस.आर.ए. प्रकल्प रद्द झाल्याचे आक्षेपार्हरित्या पत्र पुणे मनपास दिले आहे परंतु गेली ४० वर्षापासुन असलेली ही झोपडपट्टी पुणे मनपाकडे घोषित झोपडपट्टी आहे हे निदर्शनास आणून दिले. तसेच आनंदनगर वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांचे नियमानुसार नागरिकांच्या मागणीनुसार पुनर्वसन करण्यात यावे. आनंदनगर वसाहतीतील अघोषित भागातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे ज्या अनाधिकृत इमारतीत पुनर्वसन केले आहे त्या अनाधिकृत इमारतीची कायदेशिर वैधता तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी. भाजपाने बहुमताच्या जोरावर शासनाने जाहिर केलेल्या अधिसूचनेच्या विसगंत मान्य केलेला पुणे मनपा मुख्य सेभेचा ठराव व आयुक्तांनी दिलेली ऑफिस ऑर्डर विखंडीत करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

Congess Pune | काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे

Categories
Political पुणे

काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे

   या देशामध्ये काँग्रेसच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती त्यामुळे काँग्रेस अभिमानाने नेत्यांचे फोटो लावू शकतात परंतु सत्तेत बसलेल्यांकडे एकही स्वातंत्र्य सैनिक नाही ज्याचा फोटो ते लावू शकतील. आज देशात जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच लोकशाही व संविधान पायदळी तुडविणारे बसलेले असून स्वातंत्र्याचा दुसरा लढा लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. असे शहर कॉंग्रेस चे प्रभारी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने या देशामध्ये लोकशाही टिकवलीच नाही तर देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनात रुजविली परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर त्यावेळेस तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली त्या शामाप्रसाद मुर्खीजींना आपला प्रमुख मानून आज देशामध्ये बसलेले हे सरकार तिरंग्याचे महत्व सांगत आहेत. काँग्रेस ती आहे ज्यांनी या तिरंगी झेंड्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. छातीवर गोळ्या झेलल्या, आपल्या संसाराची राखरांगोळी केली. काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहे. आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देशामध्ये चाललेल्या जाती धर्माच्या राजकारणाच्या विरोधात व खोटी देशभक्ती दाखविणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून काँग्रेसने या देशासाठी केलेले बलिदान सांगण्याची गरज आहे. या देशामध्ये काँग्रेसच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती त्यामुळे काँग्रेस अभिमानाने नेत्यांचे फोटो लावू शकतात परंतु सत्तेत बसलेल्यांकडे एकही स्वातंत्र्य सैनिक नाही ज्याचा फोटो ते लावू शकतील. आज देशात जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच लोकशाही व संविधान पायदळी तुडविणारे बसलेले असून स्वातंत्र्याचा दुसरा लढा लढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.’’

यानंतर स्वातंत्र्य सैनिक श्रीमती. अन्नपूर्णा गुलाब माथवड यांचा सन्मान व लोकायतचे श्री. निरज जैन यांचा सन्मान ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.    यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, वीरेंद्र किराड, दिप्ती चवधरी, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, अनिल सोंडकर, नितीन परतानी, दिलीप ढमढेरे, भीमराव पाटोळे, नीता रजपूत, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे, शिवाजी बांगर, द. स. पोळेकर, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, ॲड. अनिल कांकरिया, शानी नौशाद, सुंदरा ओव्‍हाळ, दिपक ओव्‍हाळ, प्रकाश पवार, विठ्ठल गायकवाड, भुषण रानभरे, रॉर्बट डेविड, सुमित डांगी, किशोर मारणे, रवि ननावरे, दिपक ओव्‍हाळ, अशोक लांडगे, राजेंद्र पडवळ, सुनिल दैठणकर, राजू अरोरा, रजिया बल्लारी, मनोहर गाडेकर, ॲड. शाबिर खान, आयुब पठाण, प्रकाश आरणे, चैतन्य पुरंदरे, गौरव बोराडे, राजू शेख, स्वाती शिंदे, पपिता सोनावणे, वैशाली रेड्डी, बाळासाहेब प्रताप, प्रा. वाल्मिक जगताप, शिवानंद हुल्याळकर, शोभना पण्णीकर, भारती कोंढे, शमशाद बेलिम, आबा जगताप, सिमा महाडिक, प्रल्हाद खेसे, अंजली सोलापूरे, जयश्री पारेख, आशा बुजवे, आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress | Nana Patole | भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही | नाना पटोले

          काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. असा आरोप   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांनी  केला.   

      भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली ‘‘आझादी गौरव पदयात्रा’’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅपिटल थिएटर, कॅम्प ते लोकमान्य टिळक, मंडई पर्यंत काढण्यात आली.

       मंडई येथे सभेमध्ये बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘ज्या विचारांनी तिरंगा झेंड्याचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, इंग्रजांबरोबर छुपी युती केली ते आज हर घर तिरंगा अभियान राबवित आहेत. हिंदू महासभा व मुस्लिमलीगने एकत्र येऊन त्याकाळी इंग्रजांच्या विरोधात लढायचे सोडून सरकार स्थापन केले. देशाच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या विचारसरणीचे केंद्र सरकार आज घरावर तिरंगा लावावा म्हणून सांगत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनात तिरंगा हा अभिमानाने डौलत होताच परंतु आता जाती धर्माचे तेढ निर्माण करून तिरंगा आपल्या घरावर लावावा म्हणून सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहित नसावे. तिरंगा देशाची शान आहे, करोडो भारतीयांची प्रेरणा आहे पण भाजपाने त्याचा बाजार मांडला आहे. आमचे त्यांना एकच सांगणे आहे की तुम्ही तिरंग्याचा अवमान करू नका.’’

 

       या पदयात्रेचे चौका चौकात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक मंडळे, स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

       यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांची भाषणे झाली.

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्‍यवहारे, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे आबा बागुल, अजित दरेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, बाळासाहेब मारणे, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, बाळासाहेब दाभेकर, मुख्तार शेख, मंजूर शेख, अनिल सोंडकर, रवि मोहिते, रमेश अय्यर, साहिल केदारी, सचिन आडेकर, प्रविण करपे, राजेंद्र भुतडा, प्रदीप परदेशी, सुनील घाडगे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, शोएब इनामदार, विजय खळदकर, रमेश सकट, नरेंद्र व्‍यवहारे, बाळासाहेब अमराळे, अमीर शेख, राहुल शिरसाट, भुषन रानभरे, भरत सुराणा, नितीन परतानी, अक्षय माने, शिवराज भोकरे, दादु अधिकारी, सुरेश कांबळे, नरेश नलावडे, जुबेर खान, द. स. पोळेकर, यासीन शेख, प्रकाश पवार, विनोद रणपिसे, निलेश बोराडे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, विश्वास दिघे, कान्होजी जेधे, सुनील पंडित, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, ॲड. अनिल कांकरिया, सचिन सावंत, राधिका मखामले, अविनाश गोतारणे, रजिया बल्लारी, ज्योती परदेशी, सीमा महाडिक, अनुसाया गायवाड आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले तर आभार बाळासाहेब मारणे यांनी मानले.