Thomas Cup 2022 | Badminton | थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

Categories
Breaking News Sport देश/विदेश

थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

नवी दिल्ली : भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच शुभेच्छांच्या वर्षावात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी या संघाला 1 कोटी (1 Crore) रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून 1 कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. ठाकूर यांनी ट्विट केले की, ‘भारतीय संघाने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियचा 3-0 असा पारभव केला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप पटकावला. भारतीय क्रीडाविभागाला या दैदिप्यमान विजयानंतर संघासाठी 1 कोटी रूपये बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. आम्ही यासाठी नियमात शिथीलता देत आहोत.’भारताच्या विजयी संघात लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, एचसी प्रणॉय, दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिरा शेट्टी यांचा समावेश आहे.

Sport Competitions for PMC Employees : महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन 

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे :  पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीद्वारा मनपा अधिकारी/सेवकांच्या सुप्त गुणांना वाव देवून परस्परांमध्ये सहकार्य, समन्वयाची भावना व गुणवत्तावाढ करण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन अशा चार क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 30 आणि 31 मार्च या कालावधीत या स्पर्धा होतील.

: अशा असतील अटी

१. क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि.३०/३/२०२२ रोजी सकाळी १० वा. सणस मैदान, पुणे येथे होईल. सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे.
२. उपरोक्त सर्व स्पर्धापैकी केवळ दोनच स्पर्धांमध्ये स्पर्धकाला सहभागी होता येईल,
३. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खात्यामार्फत कामगार कल्याण विभागाकडे अर्ज दिनांक २८/३/२०२२ अखेर सादर करण्यात यावेत.
४. सहभागी खेळाडूंनी वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून समन्वयकाशी संपर्क साधावा.
५. सर्व सहभागी खेळाडूंनी आपापली ओळखपत्रे संबंधित समन्वयकास दाखविणे आवश्यक आहे.
६. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील.
७. सहभागी खेळाडूंनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग न घेतल्यास त्यांची गैरहजेरी संबंधित कार्यालयास कळविण्यात येईल.
8. सदर क्रीडा स्पर्धा फक्त कामगार कल्याणनिधी सभासदांसाठीच आहेत.

असे कार्यकारी समिती, कामगार कल्याण निधी, पुणे महानगरपालिका यांनी कळवले आहे.