Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार | खासदार सुप्रिया सुळे

| टेकडीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांचे समितीच्या सदस्यांना आश्वासन

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिले.

सुळे यांनी आज वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसोबत टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. शहराचा विकास झालाच पाहिजे. आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विकासाच्या बाजूनेच आहोत, तथापि विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यासाठी स्थानिक नागरिकांशी चर्चा करायलाच हवी. त्यासाठी आपण विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.

कोथरूड हून पुणे विद्यापीठ तसेच पाषाण-बाणेर-औंध या भागात जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करून वाहतूक कोंडी कमी।करण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या रस्त्याचे नियोजन केले आहे. यात बालभारती ते पौड फाटा रस्ता तसेच कोथरुड, पाषाण आणि सेनापती बापट रस्ता या दोन रस्त्यांना जोड देण्यात येणार आहे. यासाठी वेताळ टेकडी फोडून दोन बोगदे आणि एक पूल उभारण्यात येणार आहे. तथापि याला शहरातील पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असून गेल्या आत्यावड्यापासून हा विषय शहरात चांगलाच गाजत आहे. यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीही स्थापन झाली असून या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. १६) खासदार सुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते.

त्यानुसार आज दुपारी खासदार सुळे यांनी समितीच्या सदस्यांसोबत वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या भावना समजून घेत महापालिका आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. टेकडी फोडून प्रस्तावित रस्ता आणि बोगदे रद्द करावेत तसेच वेताळ टेकडीला ‘नैसर्गिक वारसास्थळ’, ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर करावे, अशी समितीची मागणी आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच हवी असे त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सुमिता काळे, प्राजक्ता दिवेकर, हर्षद अभ्यंकर, सुषमा दाते, प्रदीप घुमरे, अवंती गाडगीळ, गौरी मेहेंदळे, अंगद पटवर्धन यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP | Balbharti-paud Fata Road | विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको | राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको

| राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे प्रस्तावित केलेल्या बालभारती ते वनाज या नव्या रस्त्याच्या कामास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून वेताळ टेकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन, पर्यावरणाची खूप मोठी हानी होणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहारात विकास नक्कीच व्हायला हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान होवून नाही, ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका असुन पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते शनिवारी होणा-या टेकडी बचाव कूती समितीच्या बालभारतीपासून निघणा-या मोर्चात सहभागी होणार आहेत.

या बैठकीसाठी खा.वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, निलेश निकम , उदय महाले व पदाधिकारी उपस्थित होते.

Balbharati to Paud Fata road | बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

Categories
Breaking News PMC पुणे

बालभारती ते पौड फाटा रस्ता | महापालिकेला सल्लागाराने दिले तीन पर्याय

पुणे – बालभारती ते पौड फाटा रस्ता तीन प्रकारे करण्याचे पर्याय सल्लागाराकडून देण्यात आले आहेत. यामध्ये १.८ किलोमीटरचा बोगदा करणे, उन्नत मार्ग (इलोव्हेटेड) किंवा थेट डोंगरातून रस्ता करणे या तीन पर्यायांचा समावेश आहे. यावर आता पथ विभाग यापैकी एका मार्ग अंतिम करून तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी दिली.
 सेनापती बापट रोड ते कोथरूड तसेच शहराच्या आग्नेय भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही.  त्यामुळे सेनापती बापट रोडसह लॉ कॉलेज रोडवर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे.  येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा हा रस्ता महापालिका प्रशासनाने हनुमान डोंगरापासून शहराच्या विकास प्रारूपात प्रस्तावित केला होता.  विकास मॉडेलला मंजुरी मिळाल्याने आता या रस्त्याच्या कामाची तयारी मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.  यापूर्वी त्याचे कामही महापालिकेने सुरू केले होते.  मात्र मनपाच्या विरोधात अनेक पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेले होते.  त्यामुळे या रस्त्याचे काम बंद पडले.  दरम्यान, या रस्त्याच्या वरच्या भागात एचसीएमटीआरही होत आहे.  यामुळे आता या भागात दोन रस्त्यांऐवजी एकाच ठिकाणी हा रस्ता करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.  त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होणार नाही.  त्यामुळे मैदानावरील रस्त्याऐवजी एलिव्हेटेड रोडबाबतही पालिकेचे लक्ष आहे.
या रस्त्याचे काम करण्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला होता, या सल्लागाराचे काम पूर्ण झाले असून. त्याचा अहवाल येत्या आठवड्याभरात सादर केला जाणार आहे. दरम्यान या बालभारती ते पौड रस्ता हा रस्ता तीन प्रकारे केला जाऊ शकतो, पण पर्यावरणाचे रक्षण व खर्चाचा विचार करून यातील एक पर्याय निश्‍चीत केला जाणार आहेत. बालभारती ते पौड फाटा रस्ता करताना तो थेट जसा डोंगर आहे तसा रस्ता केला जाईल. त्यामुळे चढ, उतार याचा समावेश असेल. आवश्‍यक तेथे नाले किंवा डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी छोटे पूल असतील. पण यामुळे या टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ शकतो. या रस्त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  १.८ किलोमीटरचा रस्ता मेट्रोप्रमाणे उन्नत मार्ग करावा. साधारणपणे तीन मीटरचे पिलर उभारून त्यावरून हा रस्ता केला जाईल. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडथळा होणार नाही. या मार्गासाठी १७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  या दरम्यान टेकडीच्या खालून बोगद्याचा पर्याय सल्लागाराने दिला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. पण बोगदा केल्याने पाण्याचे झरे खंडित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शहरातील कोणत्याही टेकडीच्या खालून बोगदा करण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे. खर्चाचा विचार करता महापालिका या पर्यायाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.
 एक किंवा पर्याय दोन निवडला या टेकडीवरील १ हजार ४०० झाडे तोडावे लागणार आहेत. त्याबदल्यात शासनाच्या नियमानुसार वृक्षारोपण केले जाईल.