MP Supriya Sule Award | खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न व संसद महारत्न पुरस्कार

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

MP Supriya Sule Award | खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न व संसद महारत्न पुरस्कार

|  दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण

MP Supriya Sule Award | णे | संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन (Prime Time Foundation) आणि ई- मॅगॅझीनतर्फे (E- Magazine) देण्यात येणारा संसद मानरत्न पुरस्कार (Sansad Manratna Purskar) जाहीर झाला आहे. याच संस्थेचा संसद महारत्न पुरस्कार (Sansad Maharatna Purskar) सुद्धा दुसऱ्यांदा त्यांना जाहीर झाला असून येत्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली (New Delhi) येथे या दोन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. (MP Supriya Sule Award)

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गेल्या तेरा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत असून येत्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील खासदार सुळे यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, मांडलेली खासगी विधेयके आणि एकूणच सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत सात वेळा संसद रत्न, विशेष संसदरत्न, तर दोन वेळा संसद महारत्न आणि यावर्षी संसद मानरत्न या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून विद्यमान १७व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २३८ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ६०९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार तसेच विशेष संसद महारत्न आणि संसद मानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गत सोळाव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत एकूण १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. ही त्यांची कामगिरी विद्यमान १७ व्या लोकसभेतही कायम आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्युरी कमिटीचे चेअरमन व केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि सह चेअरमन व भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहीताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

Baramati Loksabha Consistency | बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा | खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Baramati Loksabha Consistency | बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा | खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Baramati Loksabha Consistency | बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Consistency) सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न (Water issues in Baramati) हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्यांनी टॅग केले आहे.

दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

Walchandnagar Industries and VCB Electronics | वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान | खासदार  सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Walchandnagar Industries | VCB Electronics  | वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

| खासदार  सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव

Walchandnagar Industries | VCB Electronics  | दिल्ली : ‘चांद्रयान-३’ मोहिमेत (Chandrayaan 3) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency)  वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स (Walchandnagar Industries and VCB Electronics ) या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी लोकसभेत काढले. लोकसभेत ‘चांद्रयान-३’ मोहिम आणि भारताच्या अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित चर्चेत सहभागी होताना. त्यांनी आपला मतदार संघ आणि या दोन कंपन्यांचा आवर्जून उल्लेख केला.

प्रधानमंत्री आपल्या भाषणात नेहमी स्वदेशी बनावटीच्या उपकरणांचा उल्लेख करतात. तो धागा पकडून खासदार सुळे यांनी, चांद्रयान मोहिमेतील इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि इतर उपकरणे आपल्या मतदारसंघात तयार झाली ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. वालचंदनगर इंडस्ट्री ही शंभरहून अधिक वर्षांची तर व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्सची तेरा चौदा वर्षांची वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले. भानुदास भोसले, सुजाता भोसले, संदिप चव्हाण आणि सोमसुंदर यांनी या कंपनीच्या माध्यमातून चांद्रयान मोहीमेसाठी काम केले. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.

चांद्रयान मोहीमेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या साठ वर्षांतील आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परीक्षांचे ‘चांद्रयान-३’ हे फलित आहे. आपल्या शास्त्रज्ञांचे प्राविण्य, क्षमता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ‘इस्रो’ने हे शक्य करुन दाखविले. इस्रोच्या यशात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यासह इ. व्ही.‌ चिटणिस, प्राफेसर धवन, डॉ ब्रह्मप्रकाश, यू. आर. राव, डॉ. नायर, डॉ. के. कस्तुरीरंगन, डॉ कृष्णा, डॉ शिवम्, डॉ सोमनाथ अशा थोर शास्त्रज्ञांचे अतुलनिय योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.

चांद्रयान मोहिमेबाबत सरकारच्या वतीने करण्यात आलेले भाषण जोरदार होते. परंतु या भाषणाने किंचित निराशा हाती आली, असे सांगताना सुळे यांनी अंधश्रद्धेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या भाषणातून ‘चांद्रयान-४’ किंवा ‘आदित्य एल वन टू थ्री’ मोहिमेबाबत काही वाट दिसेल. भविष्याची दिशा दिसेल अशी अपेक्षा होती. गणित, मापनशास्त्र, अवकाशशास्त्र आदी क्षेत्रात भारतीयांनी प्राचीन काळापासून अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. ही कामगिरी लक्षात घेता आपण ते ज्ञान पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. पण काही लोक अंधश्रद्धेत अडकले आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. महाराष्ट्रात एका भाजपा आमदाराकडे एक बाबा आला होता. ती व्यक्ती अंगावर कांबळं टाकून लोकांना बरे करीत असल्याचा दावा करीत होता. चांद्रयानाची चर्चा करताना दुसरीकडे आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो हे बरोबर नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी आदींनी अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात आणि विज्ञाननिष्ठ विचारांसाठी बलिदान दिले, हे आपण विसरता कामा नये’. माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या, ‘झोपेत पडलेली स्वप्ने ही स्वप्ने नव्हेत, तर जी पूर्ण होईपर्यंत तुम्ही झोपत नाही ती खरी स्वप्ने’ या वचनाचा सुळे यांनी उल्लेख केला.


News Title | Walchandnagar Industries and VCB Electronics are rightly proud of us | MP Supriya Sule felicitated both the companies in the Lok Sabha

Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Jejuri | Supriya Sule | जेजुरी स्थानक अद्ययावत करा  | खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्य सरकारला पत्र

Jejuri | Supriya Sule | पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यासह अन्य सर्वच तालुक्यांतील एसटी स्थानकांच्या इमारती तसेच गाड्या आणि अन्य अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेषतः राज्य आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी स्थानकाची दुरुस्ती आणि सर्वत्र हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवन मंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली असून तसे पत्रही त्यांना पाठवले आहे. नुकताच खासदार सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. त्यावेळी भोर एसटी स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणीही केली आहे. याशिवाय ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून, एस. टी. प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती मिळाल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. परिवहन महामंडळाच्या गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, तसेच गाड्यांचे वेळापत्रक नियमितपणे पाळण्यात यावे. बऱ्याच गाड्या फार जुन्या झाल्या आहेत. अस्वच्छ असतात. प्रवासादरम्यान बंद पडतात. अशा गाड्यांची दुरुस्ती वेळोवेळी केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे. (MP Supriya Sule)
काही गावांच्या जवळ असलेल्या महामार्गावर उड्डाणपूल असलेल्या ठिकाणी एसटी गाड्या पुलावरून जातात परिणामी गावांतील प्रवाशांची गैरसोय होते. तरी गाड्या उड्डाण पुलावरून  न नेता, पुलाच्या खालील मार्गावरून नेली जावी.
काही एस. टी. स्थानकांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, गळत आहे. एस. टी. स्थानकांमध्ये अस्वच्छता, कचरा पसरलेला देखील असतो. अशा इमारतींची देखभाल दुरुस्ती होणे व वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहे. याबरोबरच प्रत्येक एस. टी. स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात यावा तसेच महिला, पुरुष व दिव्यांग प्रवाशांसाठी सोयीचे होईल अशा पद्धतीचे स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी, असे सुळे यांनी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे नावलौकिक असलेले तीर्थक्षेत्र व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक व पर्यटक जेजुरी येथे एसटीने येतात. अशा या जेजुरी एसटी स्थानकाची मात्र दुरवस्था झाली आहे. तरी या ठिकाणी सुसज्ज, अद्ययावत एसटी स्थानक असणे आवश्यक आहे, जेणेकरून येथे येणारे भाविकांना, वुद्ध, महिला, दिव्यांग व लहान मुले यांना सोयीचे होईल.
याबरोबरच भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील पौड व इंदापूर  एस. टी. स्थानकांची दुरावस्था झाली आहे. या सर्वच एसटी स्थानकातील डांबरीकरण पावसामुळे उखडले गेले असून खड्डे पडले आहेत. तरी या एसटी स्थानकांचे कॉंक्रीटीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत आपण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी प्रवाशांच्या सोयीचा सकारात्मक विचार करून राज्य परिवहन मार्गाच्या सेवेत सुधारणा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

| लेखी निवेदन देत तातडीने कामे करण्याची मागणी

Baramati Lok Sabha Constituency | दिल्ली : बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Road Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली. (Baramati Lok Sabha Constituency)
दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. यात पालखी मार्गावरील नीरा जंक्शन आणि लोणंद सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करणे, पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भुयारी मार्ग तयार करणे तसेच लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस आदी गावांतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे ही कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात वरवंड विभागात भुयारी मार्ग आणि सहजपुर येथे उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असून याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. ही बाब आपण यापूर्वीही लक्षात आणून दिल्याचे पत्रात म्हटले आहे. पुरंदर तालुक्यात सासवड रस्त्यावर हडपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गाचे रुंदीकरण, भोर तालुक्यात करंदी-कांबरे आणि भाटघर धरणाकडे राजगड वेळवंड खोऱ्यातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेल्हा तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मढेघाट मार्गे महाड मध्ये जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याबाबत खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा आठवण करून देत निधीचीही मागणी केली आहे. याबरोबरच मुळशी तालुक्यातील भुगाव आणि घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारणी करण्याबाबत त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. हवेली तालुक्याच्या शहरी भागात येणाऱ्या खडकवासला मतदार संघात मुंबई बंगळूर बाह्यवळण महामार्गाला संलग्न असा वडगाव बुद्रुक येथील उड्डाण पुलापासून वारजे पर्यंत मुठा नदीवर बारा मीटर रुंदीचा पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबाबत या वरील सर्व मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्ली येथे केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना आपल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि लेखी निवेदन दिले.
—-
News Title | Baramati Lok Sabha Constituency | Street in Baramati Lok Sabha Constituency. Sule’s detailed discussion with Gadkari

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ४५ कोटी रुपये मंजूर

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी  ४५ कोटी रुपये मंजूर

| खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

Baramati Lok Sabha Constituency |  खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Baramati Lok Sabha Constituency)
या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सुळे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघातील तालुकानिहाय मंजूर निधी आणि त्यातून करण्यात येणारी कामे पुढीलप्रमाणे –
भोर तालुका – रा.मा १३२ पासून भोगवली फाटा- माहूर परिचे, प्रजिमा ४९ कि.मी ०/०० ते ५/०० ची सुधारणा करणे -रु. ४००.०० लाख (चार कोटी)
वेल्हे तालुका – चिरमोडी साखर मार्गासनी वांगणी निगडे कुसगाव रस्ता, प्रजिमा ४१. कि.मी ०/०० ते ६/०० व १३/०० ते १८/०० चे रुंदीकरण व सुधारणा करणे – ५००.०० लाख (पाच कोटी)
मुळशी तालुका – पाषाण- सुस-लवळे-मुठा- बहुली रस्ता. रा.मा. ११५ कि.मी. २०/०० ते ३०/०० ची  सुधारणा करणे – ५०० .०० लाख.
पानशेत मोसे आडमाळ पडळघर दासवे मुगाव भोईनी रस्ता करणे प्रजिमा १६४ कि.मी २८/०० ते ३७/०० -५००.०० लाख (पाच कोटी)
पुरंदर तालुका – रा.मा.क्र १२० ते दिवे- सोनोरी- कुंभारवळण- कोथळे-नाझरें क.प – पांडेश्वर ते इजिमा १०९ पर्यंतचा रस्ता, प्रजिमा २०३ कि.मी १५/०० ते ३५/०० ची सुधारणा करणे – ५००.०० लाख (पाच कोटी)
सटलवाडी-पिंगोरी-कवडेवाडी-कोळविहिरे- मावडी क.प – पांडेश्वर नायगाव- माळशिरस रस्ता प्रजिमा १३४ कऱ्हा नदी २८/१०० वर पूल बांधणे – ६००.०० लाख (सहा कोटी), पिंगोरी येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे – १०.०० लाख, पिंगोरी येथील बंधारा दुरूस्त करणे – १०.०० लाख,  पिंगोरी ते भोसलेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे – १०.०० लाख.
हवेली तालुका – प्रजिमा ३६ डोणजे-गोळेवाडी ते कोंढणपूर फाटा रस्ता करणे( लांबी ७ कि.मी)  – ३००.०० लाख (तीन कोटी), रा. मा. ११५ वारजे ते बहुली, कि.मी ३१/०० ते ३७/०० रस्ता करणे – ३००.०० लाख (तीन कोटी), खडकवाडी येथे व्यायामशाळा आरसीसी स्ट्रक्चर व बांधकाम करणे – २५.०० लाख, गोऱ्हे खु. येथे दलित समाज मंदिर इमारत बांधकाम करणे १५.०० लाख, मणेरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयावर पत्रा शेड बांधकाम करणे- १०.०० लाख
दाैंड तालुका
नानवीज ते रा.मा ६८ रस्ता ग्रा.मा ९२ कि.मी ०/०० ते ५/०० रस्त्याची सुधारण करणे ( भाग- नानवीज ते गार) – २००.०० लाख (दोन कोटी, (गिरिम) धनगरवस्ती ते प्रजिमा ९६ रस्ता, ग्रा. मा १४४ कि.मी ०/०० ते २/५००  रस्त्याची सुधारणा करणे ( भाग-गिरिम ते धनगरवस्ती) – २००.०० लाख (दोन कोटी), कुसेगाव रोटी पांढरेवाडी कुरकुंभ ते प्रजिमा ६७ रस्ता प्रजिमा १७७. कि.मी १३/०० ते १४/५०० रस्त्याची सुधारणा करणे ( भाग- कुरकुंभ ते काैठडी) २००.०० लाख (दोन कोटी), नवीन गार ते बेटवाडी धनगरवस्ती रा. मा ६५ ते रोटी रस्ता प्रजिमा १८५ कि.मी १०/९०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे ( गिरिम ते कुरकुंभ रस्त्यावर कॅनाॅल वर)- २००.०० लाख (दोन कोटी)
———
News Title | Baramati Lok Sabha Constituency | 45 crore sanctioned for road and other development works in Baramati Lok Sabha Constituency

Primary Health Centers | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Primary Health Centers | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर

| खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Primary Health Centers | राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha constituency) बारामती आणि दौंड तालुक्यांत (Baramati and Daund taluka) प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health centers) तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ही माहिती दिली. (Primary Health Centers)

या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. (MP supriya Sule News)

याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. (Baramati News)


News Title |12 crores 63 lakhs sanctioned for primary health centers and staff accommodation in Baramati and Daund talukas Information from MP Supriya Sule

MP Supriya Sule Marathi news |  रखरखत्या उन्हात  प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

Categories
Breaking News Political social पुणे

MP Supriya Sule Marathi news | रखरखत्या उन्हात  प्रवाशांच्या मदतीला धावून गेल्या खासदार सुप्रिया सुळे

| बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले

MP Supriya Sule Marathi news | कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते…. वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) मायेची पाखर होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह मागून आलेल्या एसटी बसमधून सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका (Khed Shivapur Toll plaza) आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले. (MP Supriya Sule Marathi news)

आज दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान सातारा रस्त्यावर शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. पुण्याहून सांगलीकडे निघालेली शिवशाही बस शिंदेवाडी जवळ बंद पडली होती. त्या बस मधील सर्व प्रवाशी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा उन्हाच्या काहिलीने हैराण होत बसजवळ उभे होते. भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याठिकाणी पोहोचला, त्यावेळी रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली आणि स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडल्याने ते सर्वजण थांबल्याचे कळताच सुळे यांनी तातडीने हालचाल करत काही प्रवाशांना स्वतःच्या गाडीत घेतले, काहींना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसवून घेण्याच्या सूचना दिल्या. मागून काही एसटी गाड्या सातारा रस्त्यावर धावत होत्या, त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यांपैकी सांगली जिल्ह्यातील पेठ येथे निघालेल्या एसटीचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांनी सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाडी थांबवली आणि काही प्रवाशांना आपल्या बसमध्ये बसवून घेतले. अशा रीतीने सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका परिसरात सावली असलेल्या ठिकाणी हलवले.

उन्हाने हैराण झालेल्या त्या प्रवाशांसाठी सुळे यांनी पाण्याची व्यवस्था करायला लावली. मागे आणखी काही प्रवाशी राहिले असतील तर त्यांना पण घेऊन येण्याबाबत आपल्या सोबतच्या पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्यांना सूचना दिल्या. सर्व प्रवाशांची संपूर्ण सुविधा झाली असून सर्वजण सुखरूप सावलीत पोहोचले आहेत, याची खात्री करूनच त्या पुढे रवाना झाल्या. त्यानंतर काही वेळाने बंद पडलेली शिवशाही बस दुरुस्त होऊन पुढे आल्यानंतर तीत बसून सर्व प्रवाशी पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या प्रसंगानंतर भर उन्हात मायेची पाखर घेऊन धावून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गाडीतील सर्व प्रवाशांनी भरभरून आभार मानले.

एसटी महामंडळाने गाड्या तपासूनच सोडाव्यात – खा. सुळे

दूरच्या प्रवासाला सोडण्यात येणारी प्रत्येक एसटी बस एसटी महामंडळाने तपासूनच पाठवायला हवी, अशी अपेक्षा यावेळी सुळे यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.


News Title | MP Supriya Sule Marathi news | MP Supriya Sule rushed to help the passengers in the scorching sun