Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी!

Dilip Vede Patil | बावधन नगरीचे (Bavdhan Pune) आदर्श नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांच्या आजवरच्या समाजाभिमुख राजकिय कामगिरीची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य या पदावर नियुक्ती केली. (Dilip Vede Patil)

या पदाचे नियुक्तीपत्र बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी दिलीप वेडेपाटील यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वेडेपाटील यांच्याकडून प्रभागात वेळोवेळी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जातात. तसेच महापालिकेत देखील त्यांची कामगिरी महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या कामाची प्रदेश भाजपकडून दखल घेण्यात आली आहे.
The karbhari - Dilip vede patil appointment
नियुक्तीपत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजपच्या शहर अध्यक्ष पदी (BJP Pune President) पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ही घोषणा केली आहे. (Dheeraj Ghate | BJP Pune)
प्रदेश भाजप कडून शहर आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष पदी घाटे यांची वर्णी लागली आहे. याआधी शहर अध्यक्ष म्हणून जगदीश मुळीक हे काम पाहत होते.  घाटे हे महापालिकेत माजी सभागृह नेते देखील होते. तसेच पार्टी मध्ये विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. (Pune News)
——
News Title | Dheeraj Ghate | BJP Pune | Pune BJP City President Dheeraj Ghate

Ink Attack | पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात पुणे भाजपकडून निषेध आंदोलन !

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात निषेध आंदोलन !

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrkant patil) यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune president Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Aigation) केली. विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदरणीय दादांवर शाईहल्ला केला. दादांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या सुत्रधारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निषेध नोंदवला.(Agitation by BJP Pune)

विश्वासघाताने आणि संधी साधूपणामुळे राज्यात आलेली सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. राज्यातील शांततेचे वातावरण बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मर्यादेत राहून काम करणार आहे. असे भाजपकडून सांगण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,आमदार भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Naturopath Wing | BJP | भाजपा महाराष्ट्र प्रदेश “नॅचरोपॅथ विंग” चे थाटात उद्घाटन  | प्रदेश संयोजक म्हणून डॉ. सुनिल चव्हाण तर सहसंयोजक म्हणून डॉ. क्रांती कुमार महाजन यांची निवड

Categories
Breaking News Political आरोग्य महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र प्रदेश “नॅचरोपॅथ विंग” चे थाटात उद्घाटन

| प्रदेश संयोजक म्हणून डॉ. सुनिल चव्हाण तर सहसंयोजक म्हणून डॉ. क्रांती कुमार महाजन यांची निवड

| संपूर्ण राज्यातील निसर्गोपचारकांचा भरगच्च सहभाग

यंदाच्या जागतिक निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या वतीने नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये भव्य समारंभपूर्वक ‘नॅचरोपॅथी विंग’ चे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते मा. आमदार श्री. प्रविणजी दरेकर, महाराष्ट्राचे विधी, न्याय व पर्यटन मंत्री म   मंगलप्रभाजी लोढा, भाजपा आमदार  निलेशजी राणे, मा. आमदार श्री. प्रसादजी लाड, भाजपा प्रदेश प्रवक्तेl उपाध्ये, भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजितजी गोपछडे, सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपाळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मधुमेह चिकित्सक डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या शुभहस्ते भाजपा ‘नॅचरोपॅथी विंग’ चे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले.
याप्रसगी भाजपा प्रदेशाध्यक्ष    चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी  गिरीषजी महाजन (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व प्रदेश संयोजक डॉ. अजितजी गोपछडे यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या ‘नॅचरोपॅथी विंग’ ची कार्यकारीणी गठीत करून नियुक्त पदाधिका-यांना सन्मानपूर्वक ‘नियुक्ती पत्रे’ बहाल करण्यात आली. त्या अंतर्गत भाजपा नॅचरोपॅथी विंगचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून सुप्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ डॉ. सुनिल चव्हाण व सह-संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तिमान निसर्गोपचार लेखक डॉ. क्रांती कुमार महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचसोबत याप्रसंगी भाजपा नॅचरोपॅथी विंग च्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयाचे व विभागाचे संयोजक व सह संयोजक यांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयातील सर्व निसर्गोपचार व योग चिकित्सकांना एकत्र करणे, जिल्हास्तरावर शहर व ग्रामीण भागामध्ये कार्यकारीणी गठीत करणे, नॅचरोपॅथी व योगशास्त्राचे प्रशिक्षण देणा-या महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यक्ति, धर्मदाय संस्था, प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये व विद्यापीठे यांना एकीकृत करणे, निसर्गोपचार तज्ञ प्रशिक्षक तयार करणे, आरोग्य मेळावे आयोजित करणे, नॅचरोपॅथी हॉस्पिटल निर्माण करणे, निसर्गोपचार कार्यशाळा व अभ्यास दौरे आयोजित करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, स्वस्थ भारत अभियानाच्या ध्यये धोरणानुसार मानवी आरोग्यासाठी तत्पर राहून सेवा देणे, पंचगव्य चिकित्सेचा व पंचगव्य आयुर्वेद ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, गोशाळा निर्माण करणे, निसर्गोपचार तज्ञांना कायदेशीर संरक्षण देणे, निसर्गोपचार कायदे या विषयापर जनजागृती करणे, दरवर्षी ‘जागतिक निसर्गोपचार दिवस’ व ‘जागतिक योग ‘ साजरा करणे, महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावर नॅचरोपॅथी कॉन्सिल निर्माण व्हावी यासाठी कृतीशील ठोस कार्यक्रम अंमलबजावणी करणे, इत्यादी प्रमुख उद्दीष्टे महाराष्ट्र प्रदेश भाजपा ‘नॅचरोपॅथी विंग’ च्या वतीने जाहीर करण्यात आले.