Tag: BJP
Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!
कोण आहेत सुनील देवधर?
सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली.
Pune BJP | PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही | धीरज घाटे
Pune BJP | PM Modi | सावित्रीबाई फुले विद्यापीठातील २ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह शब्दात टिपणी केली गेली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धिरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नेतृत्वाखाली विद्यपीठात तीव्र आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. (Savitribai Phule University Pune)
यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की सावित्रीबाई फुले विद्यापीठातील घटना ही पुणे शहराच्या दृष्टीने लज्जास्पद घटना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जगात आदर आहे असे असताना काही लाल माकडांनी काल पंतप्रधानांविषयी असे उदगार काढणे हे म्हणजे करंटेपणाचे लक्षण आहे मुळामध्ये जे विद्यार्थी विद्यपीठाशी संबंधित नाहीत अशा विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई करणे अपेक्षित आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे जे एन यु होते आहे की काय असा प्रश्न पडत आहे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही जशास तसे उत्तर देण्यात येईल’ असा इशारा घाटे यांनी यावेळी बोलताना दिला.
या आंदोलनाला शहराध्यक्ष घाटे , महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे , प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, वर्षा डहाळे , प्रवक्ते संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी ,रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर ,राजू शिळीमकर,राहूल भंडारे, वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे ,युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ , लोकसभा संयोजक श्रीनाथ भिमाले हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
PMC Sanitary Napkin Tender | शिक्षण विभागाच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी टेंडरमध्ये संगनमत केल्याचा आरोप | टेंडर रद्द करून फेरनिविदा करण्याची मागणी
| भाजपच्या चेतन चावीर यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना पत्र देत केली मागणी
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील प्राथमिक व माध्यमिक शाळातील मुलीना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करणे या कामी मध्यवर्ती भांडर कार्यालय मार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. निविदेचे ब पाकीट दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आले आहे. या निविदेमध्ये मे. स्टेझी हायजीन प्रा लि. यांची सर्व कागदपत्रे असताना देखील त्यांची निवीदा अपात्र करण्यात आली आहे. तसेच शासन निणर्य मध्ये किरकोळ कारणासाठी निविदा
अपात्र करण्यात येऊ नये. असे आदेश असताना देखील उपायुक्त डॉ. चेतना केरुरे यांनी आर्थिक हितासाठी मनमानी कारभार केलेला आहे. असा आरोप पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चावीर यांनी पुढे म्हटले आहे कि, निविदेमध्ये Menstrual Health Management Training Certificate हि अट मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत गेल्या २-३ वर्षात कधीही टाकण्यात आलेली नव्हती. अट मध्ये पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये Menstrual Health Management Training Certificate देणे बंधनकारक आहे. अशी अट टाकण्यात आलेली आहे. या अटी निविदेमध्ये टाकण्यापूर्वी कार्यालयीन परीपत्रकानुसार खरेदी उच्चधिकार समिती ची मान्यता अपेक्षित असताना उपायुक्तांनी समितीची मान्यता न घेता महापालिका आयुक्त यांची आदेशाचे पालन न करता आर्थिक हितासाठी ही अट टाकली आहे. हे प्रशिक्षण शासकीय/ निमशासकिय संस्था पैकी कुणालाही दिल्याचे चालत असताना उपायुक्तांनी फक्त पुणे मनपा अंतर्गत शाळामध्ये असे नमूद केले आहे. ही बाब ठराविक ठेकेदारला डोळ्यासमोर ठेऊन टाकण्यात आलेली आहे असे स्पष्ट होत आहे. (Pune Municipal Corporation)
प्राप्त आहे. त्यांनी सादर केलेले नमुने हे IS 5405:2019 स्पेसिफिकेशनुसार आहेत व त्याच दर्जा चांगला आहे.
PMPML Officer Transfer | महायुती सरकारने पीएमपी केली दिशाहीन
|भाजपच्या हितसंबंधांसाठी अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या
– माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
Railway Ticket Discount | भाजपची रेल्वेतही नफेखोरी | माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
| ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा चालू करण्याची मागणी
Railway Ticket Discount |पुणे | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत भाजपच्या (BJP) नफेखोर कारभाराने रद्द करण्यात आली आहे. ती सवलत लवकरात लवकर चालू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिला आहे.
रेल्वे खात्याकडून २०२० सालपर्यंत ६० वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीटावर ४० टक्के सवलत आणि ५८ वर्षे वयाचा पुढील महिलांसाठी ५० टक्के मिळत होती. ही सवलत सर्व रेल्वेगाड्यांसाठी होती. २०२० साली ‘कोरोना’चे निमित्त करून मोदी सरकारने ज्येष्ठांसाठीची ही सवलत बंद केली. आता कोरोना संपून दोन वर्षे झाली, तरीही ही सवलत चालू करण्यात आलेली नाही, हे अन्यायकारक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
वास्तविक कोरोना साथीच्या काळात सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडलेले होते. अशावेळेस रेल्वेकडून सवलतीची गरज होती. पण, मोदी सरकारने बेदरकारपणे सवलत रद्द केली. सरकारने सांगितलेली ‘कोरोना’ची सबब तकलादू आहे. भाजपचे नफेखोरीचे धोरण यातून दिसते. या नफेखोरी वृत्तीतून गेल्या दहा वर्षांत मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यात आलेली आहे. सरकारच्या अशा धोरणामुळे सामान्य माणसाची लुबाडणूक होत आहे, प्रवास महाग केलेला आहे. रेल्वेचे अपघात कमी होण्यासाठी मुलभूत उपाययोजना न करता सुधारणांच्या नावाखाली स्टंटबाजीच करण्यात येत आहे. हे निषेधार्ह आहे. सर्वसामान्य माणसाला परवडणारी वाहतूक सेवा, ही रेल्वेची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात पूर्ववत सवलत मिळावी. अन्यथा सवलत मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग
| कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या यांच्या पुढाकाराने महिलांना दिलासा
Kasba Constituency | BJP |पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi Birthday) उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Helath Check Up Camp for women) आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आज प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच दिवशी शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या नागरिकांना पुढील उपचाराची गरज आहे, त्यांनाही मदत केली जाणार आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) आणि शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वय वर्ष ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणात आले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला घरगुती कामांसोबतच त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी माझ्या माता – भगिनींसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या तपासणीमध्ये महिलांना काही आजार आढळल्यास त्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात येतील.
समर्थ युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबीर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून आज प्रभाग १७ मधील शुक्रवार पेठेतील जैनमंदिर येथे फिरत्या आरोग्य तपासणी वाहिकेच्या माध्यमातून अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व आरोग्या संबंधीच्या तक्रारींवर योग्य ते उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर),रक्तदाब तपासणी (बी.पी.),छातीचा एक्स-रे,रक्त तपासणी (सीबीसी टेस्ट),कोलेस्ट्रॉल तपासणी,स्तनाचा कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) आदी ९५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या करण्यात आल्या. कसबा मतदारसंघातील सर्व ६ प्रभागांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कसबा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, सहसंयोजक श्री.अनिल बेलकर, फार्मासिस्ट, केमिस्ट तसेच कसबा मतदारसंघातील सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pune City BJP Jumbo executive | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर | वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, स्वरदा बापट यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारिणी कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर आज नवी कार्यकारणी जाहिर झाली आहे. यात माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, अजय खेडेकर, आदित्य माळवे, अनिल टिंगरे, हरिदास चरवड यांचा समावेश आहे.
यात प्रतीक देसरडा यांच्यावर शहर भा ज पा यु मो प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. तर गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, मंजूषा नागपुरे, रुपाली धाडवे, तुषार पाटील, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे, शाम देशपांडे यांच्या खांद्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपगी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नामदेव माळवदे व अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी भीमराव साठे तर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी इम्तियाज मोमीन व व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष-
१. विश्वास ननावरे
२. प्रशांत हरसुले
३. मंजुषा नागपुरे
४.जीवन जाधव
५. सुनील पांडे
६. शाम देशपांडे
७ . प्रमोद कोंढरे
८. अरुण राजवाडे
९. तुषार पाटील
१०. स्वरदा बापट
११. योगेश बाचल
१२. भूषण तुपे
१३. संतोष खांदवे
१४. महेंद्र गलांडे
१५. रुपाली धाडवे
१६. हरिदास चरवड
१७. गणेश कळमकर
१८. प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)
सरचिटणीस
१. वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
२. राजेंद्र शिळीमकर
३. रवी साळेगावकर
४. सुभाष जंगले
५. राघवेंद्र मानकर
६ . पुनीत जोशी
७. राहुल भंडारे
८. महेश पुंडे
चिटणीस
कुलदीप सावळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे, प्रविण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुष्यंत मोहोळ
Pune Market Yard Fish Market | मार्केट यार्डातील मच्छी मार्केट रद्द करण्याची उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
| आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती
Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप
Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Pune) भारतीय जनता पक्षाचे (BJP) बहुमत आहे. या भाजपच्या संचालकांनी नुकताच मार्केटयार्डमध्ये मासे, चिकन, मटण विक्रीसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला, आता या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आ. सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble) आंदोलन करण्याची नौटंकी करत आहेत. भाजपच्या या दुटप्पीवागण्याचा, ढोंगीपणाचा करावा तेवढा निषेध कमी असल्याची भूमिका पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली.
शिंदे पुढे म्हणाले, १८ पैकी १३ सदस्य बाजार समितीत भाजपाचे आहेत. या संचालकांनी घेतलेल्या निर्णयाला भाजपाचेच आमदार विरोध करतात यामध्ये कांहीतरी काळंबेरं नक्की आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैन बांधव राहतात. त्यांच्या श्रद्धा, भावनांशी खेळून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याची शंका यामुळे येत आहे. बहुमताच्या बळावर हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादायचा आणि त्या निर्णयाविरोधात भूमिका घेवून जैन आणि वारकरी समुदायाची सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून होतोय. याचा तिव्र निषेध पुणे शहर जिल्हा काँग्रेस कडून करण्यात येतं आहे.
लोकनेते अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून मोठया कष्टाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन करून मार्केटयार्ड इथे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी मालाच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले. यामध्ये जैन व्यापारी बांधवांचे योगदान ही मोठे आहे.
आज मासे चिकन मटण विक्रीला परवानगी देतं आहेत उद्या दारू विक्रीला सुद्धा परवानगी मिळेल अशी शंका आमच्या मनात निर्माण होतं आहे. यां सगळ्या गोष्टीला आत्ताच रोखले गेले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
मार्केटयार्डात चिकन, मटण, मासे विक्रीस आमचा विरोध आहे. यां निर्णया विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणारं आहे.
मार्केटयार्डात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळं आणि इतर कृषी उत्पादनं खरेदी विक्री झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. असे शिंदे म्हणाले.
—-
News Title | Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble MLA Misal, Kamble’s movement is a gimmick Arvind Shinde’s allegation