Kasba By-Election | कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु  | महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | भाजपच्या इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु

| महापालिकेकडे मागितले ना हरकत प्रमाणपत्र

पुणे | कसबा पोटनिवडणुकीमुळे (kasba by-ections) शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसू लागले आहे. भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक (Aspirants)असलेले उमेदवार जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. त्यातील काहींनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची (No Objection Certificate) देखील मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता यावर भाजप कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. कालच टिळक यांनी आमच्या कुटुंबाचा विचार व्हावा, असे म्हटले आहे. (Tilak Family)

तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुक जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. टिळक कुटुंबात उमेदवारी गेली नाही तर ती आपल्यालाच मिळेल, असा कयास बांधून हे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीची प्राथमिक तयारी म्हणून यातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या विभागाकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढताना दिसते आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. अशी भूमिका मी मांडली आहे. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. बाकीचे इच्छुक देखील आपल्या परीने प्रयत्न करू शकतात. मात्र उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी पक्षातील वरिष्ठांचा आहे.

शैलेश टिळक

Upcoming Elections : Ajit Pawar : आगामी महापालिका निवडणुका वेळेवर होणार की नाही? अजित पवारांनी दिले हे संकेत! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आगामी महापालिका निवडणुका वेळेवर होणार की नाही? अजित पवारांनी दिले हे संकेत! 

पुणे : राज्यातील आगामी निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

 

पवार म्हणाले, “निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आम्ही अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ठराव केला होता, तो निवडणूक आयोगाला पाठवला आहे. त्यानंतर राज्यातील परिस्थिती एकदम बदलली आहे. कारण अधिवेशन संपलं २७ तारखेला त्यानंतर बरेच मंत्री, आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह झाले. तुमच्या आमच्या घरातीलही अनेक लोक सध्या पॉझिटिव्ह झाले आहेत. ही सगळीपरिस्थती पाहता आता निवडणूक आयोगानं याबाबत निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील संसर्ग निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे”

Petrol price : पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? : जाणून घ्या राजकारण!

Categories
Commerce Political देश/विदेश

पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले?

नवी दिल्ली – देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पोटनिवडणुकांच्या निकालाचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम दिसला आहे. तर, जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असेही स्पष्ट झाले. एकंदरीत पोटनिवडणुकीत भाजपची चांगलची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील वाढती महागाई, इंधन दरवाढ यास जनता कंटाळल्यामुळे भाजपला पराभवाचा फटका बसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यातच, पोटनिवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्याचदिवशी केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलंय.

मोदी सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्यामुळे पेट्रोल 5 आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, हा पोट निवडणूक निकालांचा परिणाम असल्याची खोचक टीका दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. स्वाती यांनी ट्विट करुन, जनतेनं मोदी सरकारला दिलेल्या रिटर्न गिफ्टचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर तृणमूलने मुसंडी मारताना भाजपकडून दोन जागा जिंकल्या, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने दोन्ही जागांवर लालुप्रसाद
यांच्या पक्षाला पराभूत केले. मेघालयाच्या तिन्ही जागा एनपीपीच्या पारड्यात गेल्या. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा उमेदवार जिंकला.

मध्य प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मात्र काँग्रेस व भाजप थेट सामने झाले. त्यापैकी राजस्थानातील दोन, हिमाचल प्रदेशातील तीन व मध्य प्रदेशातील एक अशा सहा जागा काँग्रेसने जिंकल्या वा स्वत:कडे ठेवल्या. कर्नाटकातील एक जागाही काॅंग्रेसने मिळवली. भाजपने मध्य प्रदेशातील तीन व आसामच्या पाचही जागा जिंकल्या. मेघालयच्या तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्षाने विजय मिळविला.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला झटका

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठाच धक्का बसला मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार व माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या जागाही काँग्रेसने जिंकल्या. यापैकी भाजपने जुब्बल-काेटखाई जागा गमावली.

राजस्थानमध्ये काँग्रेस

राजस्थानचमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने सहजच जिंकल्या. त्या दोन्ही जागा याआधीही काँग्रेसकडेच होत्या. त्या मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.

मध्य प्रदेशात भाजपचे नुकसान

मध्य प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसने मिळवली. खंडवा लोकसभेची जागाही भाजपने राखली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी ८५ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला.

कर्नाटकमध्येही पिछेहाट

कर्नाटकमध्ये भाजपला दोनपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. सिंदगी येथे भाजपचे रमेश भुसानूर यांनी विजय मिळविला, तर हंगलमधून भाजपचा पराभव करून काँग्रैसचे श्रीनिवास माने विजयी झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात कौल

हरयाणाच्या एलनाबादमधून भारतीय लोकदलाचे अभय चौटाला विजयी झाले. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिबं देण्यासाठी त्यांना आमदाराकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून ते पुन्हा निवडून आले.